HomeArchiveराण्याचो झील!

राण्याचो झील!

Details
राण्याचो झील!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
नारायण राण्याचो झील खुळो झालो हां का? त्येका येड लागला हां का? तेंका बापाशीन शानपणा शिकयिला नाय का? राण्याचो झील निलेश राणे याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लोकनेते आनंद दिघे यांची हत्त्या करण्यापासून ते गायक सोनू निगम याच्या हत्त्येचा प्रयत्न करण्यापर्यंत अनेक बदनामीकारक आरोप निलेश राणे यांनी केले आहेत. आपले वडील नारायण राणे यांच्यापेक्षा चार पावले पुढे जात निलेशने हे आरोप केले आहेत. अर्थात त्यासोबत कोणतेही पुरावे जोडलेले नाहीत. आरोप करणे सोपे असते. पण पुरावे नसतील तर त्या आरोपाला काही अर्थ नसतो.

एकेकाळी गो. रा. खैरनार असेच शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत सुटले होते. आपल्याकडे पवार यांच्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचे ते सांगत होते. प्रत्यक्षात ते पुरावा म्हणून कागदाचा एक चिटोरादेखील देऊ शकले नाहीत. खैरनार यांच्याप्रमाणेच समाजसेवक अण्णाहजारे हेदेखील अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत सुटले होते. त्यांनी असेच काही आरोप तत्कालीन मंत्री बबनराव घोलप यांच्यावर केले. घोलप यांनी अण्णांना कोर्टात खेचले. त्यांनी निलेश पावसकर या सुप्रसिद्ध वकिलाकडे आपले वकिलपत्र सोपविले. डॉ. पावसकर यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांना नम्रपणे दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले. मात्र अण्णांनी नकार दिला. नंतर कोर्टात झालेल्या लढाईत अण्णा दोषी ठरले. त्यांना दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण मनोहर जोशी सरकारने आपल्या अधिकारात ही शिक्षा दोन दिवसांत रद्द करून अण्णांना मुक्त केले.

सारांश, आरोप करतांना जवळ भक्कम पुरावे असणे आवश्यक असते. त्यात जे व्यक्तिमत्व लाखो लोकांचे श्रद्धास्थान असते त्यांच्यावर आरोप करणे तर अधिकच गंभीर मानले जाते. अशा आरोपांमुळे लाखो लोकांच्या भावना दुखावून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.आज निलेश राणे यांनी बाळासाहेबांवर गंभीर आरोप करून मोठी चूक केली आहे. त्यांना जर उद्या शिक्षा झाली तर कोणतेही सरकार, अण्णा हजारेंना सोडले तसे, दोन दिवसांत मुक्त करणारनाही. न्यायालय देईल ती शिक्षा निलेश राणे यांना भोगावी लागेल.

वास्तविक गेलेल्या माणसांबद्दल वाईट बोलणे ही आपली संस्कृती नाही. मग निलेश राणे असे का पिसाटले? शिवसेनेचे विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर जहाल टीका केल्यामुळेच निलेश यांचा तोल गेला. पण विनायक राऊत म्हणजे उद्धव ठाकरे नव्हेत. निलेश यांना टीका करायचीच होती तर ती त्यांनी राऊत यांच्यावर करायला हवी होती. त्यांचे वाभाडे काढायला हवे होते. या जगात नसलेल्या बाळासाहेबांवर आरोप करून त्यांनी काय साधले? नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर बाळासाहेबांनी त्यांच्यावर वारंवार ठाकरी भाषेत जहरी टीका केली. पण नारायणरावांनी आपला संयम कधीच ढळू दिला नाही. बाळासाहेबांवरची श्रद्धा कधी हटू दिली नाही. अखेरपर्यंत त्यांनी बाळासाहेबांचा आदर केला. निलेश राणे यांना हे सारे ठाऊक आहे. आपले वडील नारायण राणे यांना बाळासाहेबांनी जमिनीवरून उचलून नगरसेवक पदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत अनेक मोठी पदे दिली, हेदेखील त्यांना ठाऊक आहे. मग बाळासाहेबांच्या बाबतीत अशी कृतघ्नता त्यांनी का दाखवावी? बाळासाहेब हे लाखो शिवसैनिकांप्रमाणे नारायणरावांचेदेखील दैवत आहे. आपल्या वडिलांच्या दैवतावर चिखलफेक करूननिलेश यांनी मोठा नैतिक गुन्हा केला आहे. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. जे झाले ते झाले. आता निलेश राणे यांनी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त करून या प्रकरणावर पडदा टाकावा. त्यांनी तसे न केल्यास त्यांचे वडीलही त्यांना क्षमा करणार नाहीत. एमबीए असलेल्या तरुणाला आम्ही आणखी काय शहाणपण शिकविणार?”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content