Details
राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे ६०व्या वर्षात पदार्पण!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
राज्याचे गृहनिर्माण तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या ६० व्या जन्मदिनानिमित्त जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील विविध शाखांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘भव्य कला-क्रीडा महोत्सवा’चा बक्षिस वितरण समारंभ रविंद्र वायकर यांच्या हस्ते श्रमिक विद्यालय येथे नुकताच झाला. यावेळी विधानसभा समन्वयक विश्वनाथ सावंत, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, शालिनी सावंत, नगरसेवक बाळा नर, उपविभागप्रमुख कैलासनाथ पाठक, डॉ. अमेय पोतनीस, विविध शाखांचे शाखाप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी, युवा सेनाचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, ट्रॉफी तसेच मेडल देण्यात आले. विधानसभा क्षेत्रात कब्बडी, खो-खो, धावणे, गोळाफेक, लांबउडी, क्रिकेट, सांघिक नृत्य, आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
”
“केएचएल न्यूज ब्युरो