HomeArchiveराज्यपाल नि मुख्यमंत्र्यांच्या...

राज्यपाल नि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एअर मार्शल अरोरा!

Details
राज्यपाल नि मुख्यमंत्र्यांच्या भेटीला एअर मार्शल अरोरा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
राज्यपाल सी. विद्यासागर राव नि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या भागातील हवाई तयारीबद्दलची माहिती देत इतर प्रश्नांवर दक्षिण पश्चिम विभागाचे हवाई दल प्रमुख एअर मार्शल एच. एस. अरोरा यांनी नुकतीच चर्चा केली.

अरोरा आपल्या तीन दिवसांच्या भेटीवर आले असता त्यांनी मुंबई नि लगतच्या परिसरातील हवाई आस्थापनांची भेट घेऊन आढावा घेतला. त्याचबरोबर नौदलाच्या व्हॉईस ऍडमिरल अजित कुमार यांच्याशीही चर्चा केली. आपल्या दौऱ्यात हरजित सिंह अरोरा यांनी मुंबईतील हवाईदल तळांना भेट दिली. यात आरमारी हवाई तळ, ए. एफ. एस. मुंबई तळ, ठाणे, कान्हेरी हिल्स यांचा समावेश आहे. त्यांच्या पत्नी नि हवाई दल पत्नी संघटनेच्या अध्यक्षा बलजीत अरोरा समवेत होत्या. २० ते २२ जून या तीन दिवसांच्या दौऱ्यात त्यांना जाणवलेल्या महाराष्ट्र भागातील हवाई प्रश्नांबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री यांना त्यांनी अवगत केले. कोणतीही घटना घडल्यास मानवी मदत नि आपत्ती निवारणार्थ सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पश्चिम नौदलाच्या व्हॉईस ऍडमिरल अजित कुमार यांच्या भेटीत पश्चिम विभागाने मानवंदना देऊन स्वागत केले. त्यांनी पुढील कामांविषयी चर्चा करीत पश्चिम किनारपट्टी परिसरातील एकत्रित मोहिमा नि उपाययोजनांची देवाणघेवाण केली. मुंबई हवाईदलाच्या कार्याविषयी नि तयारीबाबत एअर मार्शल अरोरा यांना स्थानिक अधिकाऱ्यांनी माहिती दिली. प्रत्येक तळ नि कामाविषयी माहिती घेताना अरोरा यांनी अधिकारी जवानांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करीत पाठ थोपटली आणि तळाच्या सुरक्षेसाठी अधिक जागरूक राहून कार्य करण्याचे आवाहन केले.

हवाई दलाच्या जवानांच्या पत्नीसाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेत बलजीत अरोरा यांनी समाधान व्यक्त केले. जवानांना प्रोत्साहन देण्यासाठी घराकडे आपणही लक्ष दिले तर ते निर्धास्तपणे सेवा देतील असे त्या म्हणाल्या. त्यांनी हवाईदल संचालित शाळांना भेट देऊन या संघटनेची इतर कामं जाणून घेतली. शारीरिक व्यंगत्वावर मात करीत शिकणाऱ्या ठाण्यातील ‘जिद्द’ शाळेच्या मुलांना त्यांनी उपयोगी खेळणी भेट दिली. दरम्यान, ठाण्यातील कोलशेत हवाई तळाच्या भेटीवेळी गुरूवारी दुपारी वाहतूक रोखून धरण्याविषयी कोणीही अधिकारी भाष्य करण्यास तयार नव्हता. काही भाग वगळून इतर भागात लष्करी अधिकाऱ्यांसाठी स्थानिक वाहतूक रोखू नयेत असे स्पष्ट आदेश असताना ते डावलण्यात आले.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content