HomeArchiveराजीवजी, शंकररावजी आणि...

राजीवजी, शंकररावजी आणि पवार साहेब..

Details
“राजीवजी, शंकररावजी आणि पवार साहेब..”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राजीवजींनी, १९८९ साली, शंकरराव चव्हाण यांच्या जागी, एक वर्षापूर्वी काँग्रेस प्रवेश केलेल्या, शरद पवार यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. शंकररावजींना केंद्रीय मंत्री केले. त्यानंतर काही दिवसांनी शंकरराव मुंबईत आले होते. ते सह्याद्री गेस्टहाऊसवर उतरले होते. बाबा त्यांना भेटण्यास निघाले तेव्हा आम्हीदेखील त्यांच्यासोबत गेलो. शंकररावजी नेहमीप्रमाणेच आनंदी मूडमध्ये होते. हास्यविनोद करीत होते. दोन मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. तेव्हा आमच्यातील पत्रकार जागा झाला. आम्ही शंकररावांना विचारले, “साहेब, तुमच्या जागी पवार साहेबांना नियुक्त करण्याआधी राजीवजींनी तुम्हाला विचारले होते का?” त्यावर शंकरराव म्हणाले, “हो. विचारले होते ना. त्यांनी मला बोलवून सांगितले की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मी शरद पवारांना नेमण्याचा विचार केला आहे. आपले काय मत आहे?“ मी म्हटले, “आपण शत्रूच्या हाती महाराष्ट्र देत आहात. नंतर म्हणू नका की मी सांगितले नाही. त्यावर राजीवजी म्हणाले, ‘मी निर्णय घेतला आहे.’ मग मी म्हटले, आपली इच्छा. मला काही बोलायचे नाही.”
(नरेंद्र वि. वाबळे यांच्या आगामी आत्मचरित्रातून..)”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content