Details
राजकीय मेगाभरती!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
प्रचंड पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर म्हणजेच या पुढच्या सप्ताहाच्या मध्यावर महाराष्ट्रात एका नव्या राजकीय परिवर्तनाची सुरूवात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस सज्ज झाले आहेत. येत्या 1 ऑगस्टपासून ते राज्यभर महाजनादेश यात्रेचा रथ घेऊन फिरणार आहेत. भाजपाचा झेंडा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे पहिले काम केले होते ते गोपीनाथ मुंडे यांनी. मुंडेंनी संघर्षयात्रा काढली होती आणि त्यानिमित्ताने त्यांनी राज्य पिंजून काढले होते. विविध पक्षांतील नेते भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली गोळा करण्याची प्रक्रिया तेव्हापासून सुरू झाली होती. 2014 पासून या प्रक्रियेने चांगलाच वेग घेतलेला आहे. सध्या सर्वच पक्षांतील नेते भाजपात येण्यासाठी उत्सुक आहेत. अशा सर्वांना भाजपात घेतले जातेच आहे. पण या यात्रेदरम्यान गावोगोवी पक्ष प्रवेशाचेही कार्यक्रम घेतले जाणार यात शंका नाही.
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र येथे १ ते ९ ऑगस्टदरम्यान पार पडेल. यात १४ जिल्हयांतून फडणवीस फिरतील तर यादरम्यान ५७ विधानसभा मतदारसंघांतून १६३९ किमींचा प्रवास करण्यात येईल. पहिल्या टप्प्याचा समारोप नंदुरबार इथे होणार असून यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्ट रोजी सुरू होईल. यात १८ जिल्हे आणि ९३ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. एकूण २७४५ किमीची ही यात्रा असणार आहे. या यात्रेचा एकूण प्रवास ३२ जिल्हयांत होणार असून दोन्ही टप्पे मिळून १५० विधानसभा मतदारसंघांत ही यात्रा फिरणार आहे. ८७ मोठ्या सभा, ५७ स्वागत सभा, होणार असून २३८ गावांमध्ये ते जाताजाता जनतेचे हारतुरे स्वीकारणार आहेत. प्रवासाचा तपशील पाहता राज्याच्या सर्व विभागात ते भरपूर फिरणार आहेत. विदर्भात त्यांचा प्रवास होईल तब्बल १२३२ कि.मी.चा. यात विधानसभेच्या ४४ मतदारसंघांत ते जातील. उत्तर महाराष्ट्रातील त्यांचा प्रवास होईल ६२२ कि.मी. इतका. या टप्प्यात ते विधानसभेच्या ३४ मतदारसंघांत जाणार आहेत. मराठवाड्यात ते 28 विधानसभा मतदारसंघांमध्ये १०६९ कि.मी. इतका प्रवास करतील. पश्चिम महाराष्ट्रात ८१२ कि. मी. (२९ मतदारसंघ ) तर कोकणात 15 मतदारसंघांमधून ६३८ कि. मी. प्रवासाचे नियोजन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या यात्रेच्या उद्घाटनाचा नारळ फोडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण दिले असून मुंबईत होणाऱ्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावण्यात येणार आहे अशी घोषणा प्रांताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच केली आहे. भाजपाच्या दृष्टीने निवडणुकीचे रणशिंग या दोन्ही कार्यक्रमातच फुंकले जाणार आहे. नव्या प्रांताध्यक्षांसाठीही हे दोन्ही कार्यक्रम अतिमहत्त्वाचे असतील, कारण चंद्रकांतदादांच्या प्रांताध्यक्षपदाच्या कालावधीमधील मोदी व शाहंच्या पहिल्याच महाराष्ट्र भेटीची ही वेळ असेल.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युती झाली असली तरी मुख्यमंत्री नेमका कुणाचा, हा वाद काही मिटता मिटत नाही हेच खरे. कधी शिवसेनेच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असे सांगितले जाते तर कधी भाजपाच्या नेत्यांकडून मुख्यमंत्री भाजपाचा असेल अशी विधाने येत असतात. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक विधान करून टाकले की, मुख्यमंत्रीपदाची मागणी शिवसेनेकडून होणे किंवा आमचा मुख्यमंत्री व्हावा असे शिवसेनेला वाटणे यात काही गैर आहे असे नाही. पण प्रत्येक महत्त्वाकांक्षा व्यवहारात येतेच असेही नाही! पाटलांच्या या बोलण्यातून जाताजाता शिवसेनेला एक टोलाच लगावलेला आहे. शिवाय मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असेही अप्रत्यक्षपणे त्यांनी सुचवून टाकले आहे. त्यापूर्वी शिवसेनेच्या युवराजांनी राज्यभरात जन आशिर्वाद यात्रा काढत अन्य पक्षातून निवडून येण्याची क्षमता या निकषावरील किती विद्यमान आमदार, ज्येष्ठ नेते शिवबंधनात येऊ शकतात याचा आढावा घेतला आहे. भाजप आणि शिवसेना या दोन राजकीय पक्षात सध्या इन्कम असल्याने इनकमिंगची जणू स्पर्धा लागली आहे. त्यातही कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या असे म्हणत कोणत्या पक्षात कुणी यावे किंवा कुणाला कोणत्या पक्षात घ्यावे याचे निर्णय ठरवूनच घेतले जात आहेत.
असे सांगण्यात येते की, सध्या अस्तित्त्वाच्या अखेरीकडे झुकलेल्या विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षात बसलेल्या किमान ६० जणांना भाजप किंवा सेनेत सामावून घेतले जाणार आहे. तर भाजप आणि सेनेच्या उमेदवारांसमोर केवळ काही मतांनी पराभूत झालेल्या ५५ जणांची यादीही भाजप नेत्यांकडे तयार आहे. हे सारे भाजपात किंवा सेनेत प्रवेश करतील आणि त्यासाठी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या कार्यकालाच्या बाबतीत फारसा विचार न करता केवळ निवडून येण्याची क्षमता याच निकषावर मेगाभरतीत त्यांचा समावेश केला जाईल. दुसऱ्या शब्दात या साऱ्या नेत्यांना निवडणुकीत सत्तारूढ पक्षांची तिकीटे दिली जातील. भाजप किंवा सेनेत या आणि स्वतःच्या हिंमतीवर निवडून या असे खुले आवाहन सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला १ ऑगस्टपासून सुरूवात होत असताना मुख्यमंत्री जातील त्या-त्या ठिकाणी दिग्गजांच्या गाठीभेटी आणि लगेचच ‘महामेगाभरतीची प्रक्रिया’ होणार आहे. बेरोजगारांसाठी, मेगाभरती करू असे सरकारचे आश्वासन होतेच. गेल्या पाच वर्षांपासून राजकीय बेरोजगारीत गेलेल्यांची मेगाभरती करून त्याचीही पूर्तता होणार आहे.
भाजपच्या विद्यमान १२३ आमदारांपैकी किमान ४० जणांना निवडणुकीत घरी बसवले जाईल. भाजपाने लोकसभा निवडणुकीत तसेच अन्य राज्याच्या विधानसभा निवडणुकीतही हेच धोरण घेतले होते तेच महाराष्ट्रातही राबवले जाणारच. त्याजागी नव्याने येणाऱ्यांना पसंती दिली जाईल. असे दिसते आहे की १५० आमदार हमखास निवडून आणण्याच्या दिशेने भाजपाचे काम सुरू आहे. त्याचवेळी नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आणखी एका विधानाकडे निरीक्षक शंकेने बघत आहेत. इतके दिवस ठाकरे व फडणवीस इतकेच सांगत होते की आमचे ठरले आहे. आता पाटील म्हणत आहेत की कोणाचा मुख्यमंत्री होणार हे अजून ठरायचे आहे. निवडणुकीनंतर अमित शाहच मुख्यमंत्री ठरवतील! या साऱ्या पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्य़ा भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यानी जे भाष्य केले ते खूपच मनोरंजक आणि वास्तवाचे आकलन करून देणारे आहे. भाजपाचा पहिलाच मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाल्यानंतर आपल्या सरकारने पाच वर्षांत काय केले ते सांगून झाल्यावर त्यांनी सोबतच्या जानकर, मेटे, खोत, मातोश्री, आठवले या साऱ्या गोतावळ्याची आठवण करून दिली! शिवसनेनेचाही मुख्यमंत्री मीच आहे, जानकर, मेटे व आठवलेंचाही मुख्यमंत्री मीच आहे असे त्यांनी ठामपणाने सांगून टाकले. पक्षाच्या त्या बैठकीत समोरच्या रांगेत कोणकोण बसले होते? विखे पाटील, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे, विजयकुमार गावित, लक्ष्मण जगताप, राजेंद्र गावित.. असे सारे अन्य पक्षांचे नामांकित नेते तिथे चमकत होते. भाजपाच्या सर्वपक्षसमभाव धोरणाचे ते प्रतिकच भासत होते.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी