HomeArchiveयेत्या शनिवारी दाखल...

येत्या शनिवारी दाखल होतेय खंदेरी!

Details
येत्या शनिवारी दाखल होतेय खंदेरी!

    23-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे..
 
भारतीय नौदलात आयएनएस कलवरीनंतर एकापाठोपाठ एक अशा सहा स्कॉर्पियन गटातील पाणबुड्या दाखल होतील असे वाटत असताना नेमक्या खंदेरीत निघालेल्या त्रुटींमुळे याचं वेळापत्रकच काहीसं कोलमडून गेलं. करंजच्या विविध कसोट्या चाचण्या सुरू आहेत तर वेलाला पाण्यात ढकलून बराच वेळ गेलाय. येत्या शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दिवसभर मुंबईत आहेत तर रविवारी ते आयएनएस विक्रमादित्य या एकमेव विमानवाहू नौकेची पाहणी करणार आहेत.
 
गुरूवारी माझगाव गोदी आणि भारतीय नौदलात खंदेरी हस्तांतरणाचा करार झाला. या पाणबुडीत आढळलेल्या नाना त्रुटींमुळे हिला ताफ्यात दाखल होण्यास वर्षभराचा उशिर झाला. नौदल पश्चिमी कमांड तांत्रिक प्रमुख रिअर ऍडमिरल बी सीवाकुमार, माझगाव गोदीचे अध्यक्ष नि व्यवस्थापकीय संचालक निवृत्त कमोडोर राकेश आनंद यांनी याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी दोन्हीकडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
यापूर्वी भारतीय नौदलात खंदेरीने आपली सेवा दिली आहे. ६ डिसेंबर १९६८ ते १८ ऑक्टोबर १९८९ या काळात २० वर्षांहून अधिक काळ तिने सेवा बजावली. आरमारी परंपरेनुसार तिने दिलेल्या सेवेबद्दल तिची आठवण म्हणून तिला नव्या अवतारात राष्ट्र सीमांच्या संरक्षणासाठी माझगाव डॉकने घडवले आहे. मूळची रशियन बनावटीची फॉक्सट्रोट गटातील ही देशाची दुसरी पाणबुडी! कमांडर एम एन वासुदेव यांनी रशियन रीगा बंदरातून तिला भारतात आणली. पुढे एप्रिल १९६९मध्ये इतिहास घडवला. ८० नॉटिकल मैल अंतर पार करीत काँगो नदीत जाणारी नि मटॅडी या जगातील सर्वोच्च बंदरात ती दाखल झाली. याआधी अमेरिका, रशिया आणि इतरांचे प्रयत्न वाया गेले होते. १९७१च्या लढाईत ती पूर्वेकडील भागात तैनात होती. निरोपानंतर विशाखापट्टणम येथील आय एन एस विरबाहूच्या संचालन मैदानात तिची स्मृती पुढील पिढ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जतन करण्यात आली.
 
एम डी एल यार्ड ११८७६मध्ये खंदेरीच्या बांधणीसाठी सात एप्रिल २००९ रोजी पहिल्यांदा पत्रा कापला गेला. पाच विविध भागात तिची उभारणी करून नोव्हेंबर २०१६ ते एकत्रित जोडण्यात आले. त्याला इंग्रजीत ‘बुटिंग टुगेदर’ असं म्हणतात. पुढे जानेवारी २०१७ला तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पत्नी डॉ. बीना यांच्या हस्ते नारळ वाढवून तिचे जलावतरण करण्यात आलं. प्रत्यक्ष समुद्रात एक जूनला ढकलण्यात आलं. ६७.५ मीटर लांब नि १२.३ मीटर रूंद असून ७५० किलोच्या बॅटरी तिच्यावर आहेत. तिच्या लोगोत अरेबियन समुद्रात सापडणारा कंनेरी नावाचा मासा स्थापित केला आहे. तो सागर तळाशी आढळून येतो नि त्याचा धारधार सुळा भक्ष्य मारण्यासाठी वापरतो. तिच्या चिन्हातील ‘अखंड, अभेद्य, अदृश्य’ हे शब्द पाणबुडीवरील पथकाला प्रेरित करतात.
 
एका मर्यादित काळात स्कॉर्पियन गटातील ही नौका उभारणे हे मोठे आव्हान होते. मात्र हे आव्हान पेलण्यात नि यशस्वीपणे समस्यांचा निपटारा करीत कोणत्याही तडजोडीशिवाय उद्दिष्ट साध्य करण्यात माझगाव गोदीला यश आले. यासाठी सर्वोत्तम तांत्रिकतेचा वापर करून ही पाणबुडी घडवली गेली. या बांधणीमुळे भारताची ओळख उत्तम पाणबुडी निर्माता म्हणून जगाला झाली आहे नि शिरपेचात नवा तुरा खोवला गेला असल्याचे माझगाव गोदीने म्हटले आहे.
 
यातील तिसरी करंज ही ३१ जानेवारी २०१८ला पाण्यात ढकलण्यात आली. तिच्याही समुद्री चाचण्या कठोरपणे चालू आहेत. मे २०१९ला वेलाचे जलावतरण करण्यात आले. तिलाही त्यासाठी सज्ज करणे सुरू आहे. यातील पुढच्या दोन वगीर आणि वागशीर बांधणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. या श्रेणीच्या पाणबुड्या वजनाला हलक्या असल्याने जलद नि चपळ हालचालींसाठी योग्य समजल्या जातात. बालाकोटवरील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावावेळी अरबी समुद्रात आय एन एस कलवरी गस्त घालत होती. जुन्यापैकी अनेक पाणबुड्या दुरूस्ती, डागडुजीसाठी बंदरात असल्याने नव्या लवकर याव्यात म्हणून नौदल आग्रही आहे. त्यामुळे करंजदेखील वर्षअखेरीस मिळावी अशी मागणी केली आहे.
 
या नव्या पाणबुडीची कमान कॅप्टन दलबीर सिंह यांच्याकडे असेल असे विश्वसनीयरित्या कळते. भारतीय नौदलासाठी पी-७५ खास प्रकल्प असून स्कॉर्पियन पाणबुडी याद्वारे तयार होत आहे. स्टेल्थ वर्गातील या पाणबुड्या शत्रूच्या रडारला चकवा देऊन अचूक हल्ला करतात. कोणत्याही सागरी युद्धक्षेत्रात नि हवामानात सागरी सीमांचे प्रहरी होऊन शत्रूवर पाणतीर नि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने मारा करून नष्ट करू शकतात. खोल समुद्रात गुप्तपणे शत्रू नौकांचा माग काढून माहिती देऊ शकते.
 
अत्याधुनिक शिवलीक श्रेणीतील सहा युद्धनौका तयार होत आहेत. त्यातील निलगिरीचे आगमन यावेळी होईल. डिजिटल पद्धतीचे रडार हे वैशिष्ट्य असलेली ही फ्रिगेट ‘ब्राम्होस’ क्षेपणास्त्र डागू शकते. गेली दोन वर्षे इथे तयार होत असलेल्या निलगिरीच्या अन्य पाच आवृत्त्या बांधणीत आहेत. जलावतरणानंतर तिच्या कठोर चाचण्या होतील. मग तिला शस्त्रसज्ज केले जाईल. पी १७ ए अंतर्गत या युद्धनौकांची उभारणी होत आहे. पी १७द्वारे शिवलीकची निर्मिती झाली असून एकूण खर्च ४५ हजार कोटी रूपयांवर गेला आहे.
 
अत्याधुनिक गोदी
 
देशाची युद्धसज्जता नि अत्याधुनिक नौका लक्षात घेता दिलेल्या वेळेत देखभालदुरूस्ती व्हावी म्हणून अधिकच्या गोदीचे उदघाटन यावेळी होणार आहे. पश्चिम कमांडच्या लढाऊ जहाजांना विशेषतः विक्रमादित्यसारख्या विमानवाहू जहाजांना कारवार किंवा कोचीकडे दुरूस्तीसाठी वळवावे लागते. मुंबईत ती सुविधा आता उपलब्ध होणार आहे. ओली सुकी (वेट अँड ड्राय) प्रकारची ही गोदी एचसीसी कंपनीने अन्य सुविधांसह बांधली आहे. ब्रिटनच्या हस्कोनिंगच्या सल्ल्याने ती तयार झाली आहे. सुमारे सहाशे कोटी रूपये खर्चून उभारलेल्या या गोदीचे उदघाटनही होणार आहे.
 
ही गोदी २८१ मीटर लांब तर ४५ मीटर रूंद असेल. तर आय एन एस विक्रमादित्य यापेक्षा काहीशी मोठी म्हणजे २८३×५९ मीटर अशी असली तरी दुरूस्तीसाठी पुरेसा आकार आहे असे सूत्रांनी सांगितले. वास्तविक याची उभारणी करण्याचा निर्णय २०१० सालीच घेण्यात आला तर नंतर ही नौका आली. ही गोदी सागरी सुरक्षा सज्जतेसाठी मोठा टप्पा असून नौदलाचा महत्त्वाचा भाग आहे. या मोठ्या आकाराने इतरवेळी एकाचवेळी दोन नौकांची दुरूस्तीही होऊ शकते असे वरिष्ठ गोदी तांत्रिक अधिकाऱ्याने सांगितले.
 
नौदल गोदी नि पाणबुडी आयएनएस खंदेरी यांचे राष्ट्रार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे तर निलगिरीचे जलावतरण त्यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ते होईल असे सूत्रांनी सांगितले. वास्तविक पाहता मराठा आरमाराचा इतिहास मोठा आहे. याची उभारणी करण्याचे श्रेय कान्होजी आंग्रे यांच्याकडे जाते. समुद्री मार्गाने येणारे इंग्रज, पोर्तुगीज, डच यांच्याकडे लक्ष देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार बांधण्यास घेतले. त्याआधीच आंग्रे समुद्रावर सत्ता ठेऊन होते. सिद्दीदेखील आपले आरमार बाळगून होता. परकीय आक्रमणाचा धोका पाहून महाराजानी आंग्रेंची मदत घेतली. पुढे काही किल्ले समुद्रात बांधून सिद्दी, इंग्रज आदींना वचक बसवला. पुढे मराठा आरमाराचा धाक निर्माण झाला. अलिबागजवळील खंदेरी, उंदेरी बेट आंग्रेंच्या ताब्यात होते. त्याचे स्थानमहात्म्य ओळखून राजांनी त्यास रसद पुरवून आपल्याकडे वळवले नि काही किल्ले बंधावयास घेतले. त्यापैकी एक सिंधुदूर्ग!
 
जमिनीवरील बरेच किल्ले विविध तहात प्रसंगानुसार घेतले, गमावलेदेखील. पण स्वराज्यनिष्ठा नि जिवास जीव देणाऱ्या मावळ्यांना अंतर दिले नाही. या इतिहासाची आठवण म्हणून नौदलाने पहिल्या पाणबुडीस ‘खंदेरी’ नाव दिले. ही आता जुन्याची स्मृती जागवेल. एकूणच खंदेरी पुढील काळात तिच्या लौकिकास साजेशी कामगिरी केल्यावाचून राहणार नाही. तिची सागरातील उपस्थिती शत्रूला धडकी भरवणारी असेल. हिंद सागरात चिनी आरमाराच्या हालचाली वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हिचे आगमन नि पुढे येणारी करंज, याला पायबंद घालण्यास यशस्वी होवो या शुभेच्छांसह ‘जय हिंद’!”

विनय गजानन खरे..
 
भारतीय नौदलात आयएनएस कलवरीनंतर एकापाठोपाठ एक अशा सहा स्कॉर्पियन गटातील पाणबुड्या दाखल होतील असे वाटत असताना नेमक्या खंदेरीत निघालेल्या त्रुटींमुळे याचं वेळापत्रकच काहीसं कोलमडून गेलं. करंजच्या विविध कसोट्या चाचण्या सुरू आहेत तर वेलाला पाण्यात ढकलून बराच वेळ गेलाय. येत्या शनिवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दिवसभर मुंबईत आहेत तर रविवारी ते आयएनएस विक्रमादित्य या एकमेव विमानवाहू नौकेची पाहणी करणार आहेत.
 
“गुरूवारी माझगाव गोदी आणि भारतीय नौदलात खंदेरी हस्तांतरणाचा करार झाला. या पाणबुडीत आढळलेल्या नाना त्रुटींमुळे हिला ताफ्यात दाखल होण्यास वर्षभराचा उशिर झाला. नौदल पश्चिमी कमांड तांत्रिक प्रमुख रिअर ऍडमिरल बी सीवाकुमार, माझगाव गोदीचे अध्यक्ष नि व्यवस्थापकीय संचालक निवृत्त कमोडोर राकेश आनंद यांनी याबाबतच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी दोन्हीकडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.”
 
“यापूर्वी भारतीय नौदलात खंदेरीने आपली सेवा दिली आहे. ६ डिसेंबर १९६८ ते १८ ऑक्टोबर १९८९ या काळात २० वर्षांहून अधिक काळ तिने सेवा बजावली. आरमारी परंपरेनुसार तिने दिलेल्या सेवेबद्दल तिची आठवण म्हणून तिला नव्या अवतारात राष्ट्र सीमांच्या संरक्षणासाठी माझगाव डॉकने घडवले आहे. मूळची रशियन बनावटीची फॉक्सट्रोट गटातील ही देशाची दुसरी पाणबुडी! कमांडर एम एन वासुदेव यांनी रशियन रीगा बंदरातून तिला भारतात आणली. पुढे एप्रिल १९६९मध्ये इतिहास घडवला. ८० नॉटिकल मैल अंतर पार करीत काँगो नदीत जाणारी नि मटॅडी या जगातील सर्वोच्च बंदरात ती दाखल झाली. याआधी अमेरिका, रशिया आणि इतरांचे प्रयत्न वाया गेले होते. १९७१च्या लढाईत ती पूर्वेकडील भागात तैनात होती. निरोपानंतर विशाखापट्टणम येथील आय एन एस विरबाहूच्या संचालन मैदानात तिची स्मृती पुढील पिढ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी जतन करण्यात आली.”
 
“एम डी एल यार्ड ११८७६मध्ये खंदेरीच्या बांधणीसाठी सात एप्रिल २००९ रोजी पहिल्यांदा पत्रा कापला गेला. पाच विविध भागात तिची उभारणी करून नोव्हेंबर २०१६ ते एकत्रित जोडण्यात आले. त्याला इंग्रजीत ‘बुटिंग टुगेदर’ असं म्हणतात. पुढे जानेवारी २०१७ला तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या पत्नी डॉ. बीना यांच्या हस्ते नारळ वाढवून तिचे जलावतरण करण्यात आलं. प्रत्यक्ष समुद्रात एक जूनला ढकलण्यात आलं. ६७.५ मीटर लांब नि १२.३ मीटर रूंद असून ७५० किलोच्या बॅटरी तिच्यावर आहेत. तिच्या लोगोत अरेबियन समुद्रात सापडणारा कंनेरी नावाचा मासा स्थापित केला आहे. तो सागर तळाशी आढळून येतो नि त्याचा धारधार सुळा भक्ष्य मारण्यासाठी वापरतो. तिच्या चिन्हातील ‘अखंड, अभेद्य, अदृश्य’ हे शब्द पाणबुडीवरील पथकाला प्रेरित करतात.”
 
एका मर्यादित काळात स्कॉर्पियन गटातील ही नौका उभारणे हे मोठे आव्हान होते. मात्र हे आव्हान पेलण्यात नि यशस्वीपणे समस्यांचा निपटारा करीत कोणत्याही तडजोडीशिवाय उद्दिष्ट साध्य करण्यात माझगाव गोदीला यश आले. यासाठी सर्वोत्तम तांत्रिकतेचा वापर करून ही पाणबुडी घडवली गेली. या बांधणीमुळे भारताची ओळख उत्तम पाणबुडी निर्माता म्हणून जगाला झाली आहे नि शिरपेचात नवा तुरा खोवला गेला असल्याचे माझगाव गोदीने म्हटले आहे.
 
“यातील तिसरी करंज ही ३१ जानेवारी २०१८ला पाण्यात ढकलण्यात आली. तिच्याही समुद्री चाचण्या कठोरपणे चालू आहेत. मे २०१९ला वेलाचे जलावतरण करण्यात आले. तिलाही त्यासाठी सज्ज करणे सुरू आहे. यातील पुढच्या दोन वगीर आणि वागशीर बांधणीच्या विविध टप्प्यांवर आहेत. या श्रेणीच्या पाणबुड्या वजनाला हलक्या असल्याने जलद नि चपळ हालचालींसाठी योग्य समजल्या जातात. बालाकोटवरील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावावेळी अरबी समुद्रात आय एन एस कलवरी गस्त घालत होती. जुन्यापैकी अनेक पाणबुड्या दुरूस्ती, डागडुजीसाठी बंदरात असल्याने नव्या लवकर याव्यात म्हणून नौदल आग्रही आहे. त्यामुळे करंजदेखील वर्षअखेरीस मिळावी अशी मागणी केली आहे.”
 
या नव्या पाणबुडीची कमान कॅप्टन दलबीर सिंह यांच्याकडे असेल असे विश्वसनीयरित्या कळते. भारतीय नौदलासाठी पी-७५ खास प्रकल्प असून स्कॉर्पियन पाणबुडी याद्वारे तयार होत आहे. स्टेल्थ वर्गातील या पाणबुड्या शत्रूच्या रडारला चकवा देऊन अचूक हल्ला करतात. कोणत्याही सागरी युद्धक्षेत्रात नि हवामानात सागरी सीमांचे प्रहरी होऊन शत्रूवर पाणतीर नि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने मारा करून नष्ट करू शकतात. खोल समुद्रात गुप्तपणे शत्रू नौकांचा माग काढून माहिती देऊ शकते.
 
अत्याधुनिक शिवलीक श्रेणीतील सहा युद्धनौका तयार होत आहेत. त्यातील निलगिरीचे आगमन यावेळी होईल. डिजिटल पद्धतीचे रडार हे वैशिष्ट्य असलेली ही फ्रिगेट ‘ब्राम्होस’ क्षेपणास्त्र डागू शकते. गेली दोन वर्षे इथे तयार होत असलेल्या निलगिरीच्या अन्य पाच आवृत्त्या बांधणीत आहेत. जलावतरणानंतर तिच्या कठोर चाचण्या होतील. मग तिला शस्त्रसज्ज केले जाईल. पी १७ ए अंतर्गत या युद्धनौकांची उभारणी होत आहे. पी १७द्वारे शिवलीकची निर्मिती झाली असून एकूण खर्च ४५ हजार कोटी रूपयांवर गेला आहे.
 
अत्याधुनिक गोदी
 
देशाची युद्धसज्जता नि अत्याधुनिक नौका लक्षात घेता दिलेल्या वेळेत देखभालदुरूस्ती व्हावी म्हणून अधिकच्या गोदीचे उदघाटन यावेळी होणार आहे. पश्चिम कमांडच्या लढाऊ जहाजांना विशेषतः विक्रमादित्यसारख्या विमानवाहू जहाजांना कारवार किंवा कोचीकडे दुरूस्तीसाठी वळवावे लागते. मुंबईत ती सुविधा आता उपलब्ध होणार आहे. ओली सुकी (वेट अँड ड्राय) प्रकारची ही गोदी एचसीसी कंपनीने अन्य सुविधांसह बांधली आहे. ब्रिटनच्या हस्कोनिंगच्या सल्ल्याने ती तयार झाली आहे. सुमारे सहाशे कोटी रूपये खर्चून उभारलेल्या या गोदीचे उदघाटनही होणार आहे.
 
ही गोदी २८१ मीटर लांब तर ४५ मीटर रूंद असेल. तर आय एन एस विक्रमादित्य यापेक्षा काहीशी मोठी म्हणजे २८३×५९ मीटर अशी असली तरी दुरूस्तीसाठी पुरेसा आकार आहे असे सूत्रांनी सांगितले. वास्तविक याची उभारणी करण्याचा निर्णय २०१० सालीच घेण्यात आला तर नंतर ही नौका आली. ही गोदी सागरी सुरक्षा सज्जतेसाठी मोठा टप्पा असून नौदलाचा महत्त्वाचा भाग आहे. या मोठ्या आकाराने इतरवेळी एकाचवेळी दोन नौकांची दुरूस्तीही होऊ शकते असे वरिष्ठ गोदी तांत्रिक अधिकाऱ्याने सांगितले.
 
“नौदल गोदी नि पाणबुडी आयएनएस खंदेरी यांचे राष्ट्रार्पण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे तर निलगिरीचे जलावतरण त्यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ते होईल असे सूत्रांनी सांगितले. वास्तविक पाहता मराठा आरमाराचा इतिहास मोठा आहे. याची उभारणी करण्याचे श्रेय कान्होजी आंग्रे यांच्याकडे जाते. समुद्री मार्गाने येणारे इंग्रज, पोर्तुगीज, डच यांच्याकडे लक्ष देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार बांधण्यास घेतले. त्याआधीच आंग्रे समुद्रावर सत्ता ठेऊन होते. सिद्दीदेखील आपले आरमार बाळगून होता. परकीय आक्रमणाचा धोका पाहून महाराजानी आंग्रेंची मदत घेतली. पुढे काही किल्ले समुद्रात बांधून सिद्दी, इंग्रज आदींना वचक बसवला. पुढे मराठा आरमाराचा धाक निर्माण झाला. अलिबागजवळील खंदेरी, उंदेरी बेट आंग्रेंच्या ताब्यात होते. त्याचे स्थानमहात्म्य ओळखून राजांनी त्यास रसद पुरवून आपल्याकडे वळवले नि काही किल्ले बंधावयास घेतले. त्यापैकी एक सिंधुदूर्ग!”
 
“जमिनीवरील बरेच किल्ले विविध तहात प्रसंगानुसार घेतले, गमावलेदेखील. पण स्वराज्यनिष्ठा नि जिवास जीव देणाऱ्या मावळ्यांना अंतर दिले नाही. या इतिहासाची आठवण म्हणून नौदलाने पहिल्या पाणबुडीस ‘खंदेरी’ नाव दिले. ही आता जुन्याची स्मृती जागवेल. एकूणच खंदेरी पुढील काळात तिच्या लौकिकास साजेशी कामगिरी केल्यावाचून राहणार नाही. तिची सागरातील उपस्थिती शत्रूला धडकी भरवणारी असेल. हिंद सागरात चिनी आरमाराच्या हालचाली वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हिचे आगमन नि पुढे येणारी करंज, याला पायबंद घालण्यास यशस्वी होवो या शुभेच्छांसह ‘जय हिंद’!”

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content