Details
यंदाही शिर्डीचे श्री साई समाधी मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर खुले! विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू
01-Jul-2019
”
केएचएल ब्युरो
शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने नाताळची सुट्टी तसेच चालू वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन समाधी मंदिर सोमवारी, ३१ डिसेंबर २०१८ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी दिली.
दरवर्षी नाताळची सुट्टी, चालू वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणाऱ्या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे या उद्देशाने सोमवारी, ३१ डिसेंबर २०१८ रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरची शेजारती व ०१ जानेवारीला पहाटेची काकड आरती होणार नाही, असे त्यांनी सांगितले.
यानिमित्ताने २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ याकालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २२ डिसेंबर रोजी सायं. ७.३० ते ९.०० यावेळेत व्दारका मंडळी, बेंगलुरू, २३ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ८.३० यावेळेत मनीषा धिंग्रा, दिल्ली व रात्रौ ८.३० ते ९.४५ यावेळेत रमेश ओबेरॉय, मुंबई, २४ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ यावेळेत सुबरत, ओडिसा, २५ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ या वेळेत विनया कुलकर्णी, नाशिक, २६ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ या वेळेत अनिलकुमार मिस्किन, कर्नाटक, २७ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ रोजी सुधांशू लोकेगावकर, शिर्डी, २८ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ यावेळेत श्रृती कंकण, येवला, २९ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ यावेळेत रविंद्र पिंगळे, शिर्डी, ३० डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.४५ यावेळेत नारायण मुंदडा व सार्थक (आप्पा) गायकवाड, मुंबई आणि ३१ डिसेंबर रोजी सायं. ७.०० ते ९.३० या वेळेत जगदीश मारूती पाटील, मुंबई व रात्रौ ९.३० ते ११.४५ या वेळेत साई स्वरांजली संगीत संच, नागपूर, आदी कलाकारांचे साईभजन संध्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे त्या म्हणाल्या.
नाताळ व नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे मंगळवार, २५ डिसेंबर, सोमवार, ३१ डिसेंबर व मंगळवार, ०१ जानेवारी २०१९ रोजी श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा बंद राहील. याबरोबरच सोमवार, ३१ डिसेंबर व मंगळवार, ०१ जानेवारी २०१९ रोजी वाहन पूजा बंद राहतील. हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल व सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशील आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.”
“केएचएल ब्युरो