HomeArchiveमोफत आवाज प्रशिक्षण...

मोफत आवाज प्रशिक्षण शिबीर!

Details
मोफत आवाज प्रशिक्षण शिबीर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पाचवी ते दहावीतल्या विद्यार्थ्यांसाठी आवाजाची मोफत कार्यशाळा दिनांक 13 ते 17 मे (सोमवार ते शुक्रवार) या कालावधीत राजे शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर-पूर्व, मुंबई येथे सकाळी 11 ते 1 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती व्हॉईसगुरू दीपक वेलणकर यांनी दिली.
अनलिमिटेड व्हॉईस अॅवकेडमी ही कार्यशाळा घेत आहे. पुढची पिढी बोलण्यात तरबेज व्हावी या हेतूने ही कार्यशाळा संपूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे. कोणतेही कारण देऊन फी आकारण्यात येणार नाही किंवा छुपे खर्च पालकांवर लादण्यात येणार नाहीत, असे वेलणकर यांनी स्पष्ट केले आहे. कार्यशाळेसाठी रेंजो वेंचर्स, मुंबई आणि हंसराज दामोदर चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांची भरीव मदत झाली आहे. कार्यशाळा मोफत असली तरी नोंदणी आवश्यक आहे. पहिल्या फक्त 35 जणांनाच प्रवेश मिळेल, असे वेलणकर यांनी सांगितले.

बोलणे ही माणसाची स्वाभाविक क्रिया आहे. मात्र, चांगले बोलता येण्यासाठी त्यावर काही संस्कार करावे लागतात. हे संस्कार लहान वयात घडले तर आयुष्यभर त्याचा फायदा होतो. परंतु असे संस्कार होताना मात्र दिसत नाहीत. आजचा विद्यार्थी दैनंदिन अभ्यासाखाली दबला गेला आहे. त्याला हे नवे तंत्र शिकायला वर्षभर वेळ मिळणे कठीण आहे. हे तंत्र शास्त्रशुद्धपणे न शिकल्यास शाळा-महाविद्यालयात वक्तृत्वात मुले (हुशार असूनही) मागे पडतात. प्रेझेन्टेशन्स, इंटरव्यू, स्वतःमधल्या गुणांविषयी सांगणे त्यांना जमत नाही. कधी ती फार मोठ्याने मोठ्या माणसासारखे बोलतात तर कधी घुमी घुमी राहतात. यासाठी ही कार्यशाळा आहे. नोंदणी करण्यासाठी समन्वयक वैशाली जोगळेकर यांच्याशी 9372548192 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा याच क्रमांकावर व्हाट्सअप मेसेजद्वारे नाव नोंदवावे. व्हाट्सअप वर नाव नोंदवले म्हणजे प्रवेश मिळाला असे नाही. प्रथम येणार त्याला प्रथम प्रवेश मिळणार या तत्त्वावर प्रवेश देण्यात येतील. कार्यशाळेला पाचही दिवस उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यात कुठल्याही कारणाने सूट मिळणार नाही. 13 तारखेला येताना विद्यार्थ्यांनी शाळेचे आयडी कार्ड (झेरॉक्ससह) किंवा शाळेत असल्याचा पुरावा व त्याची झेरॉक्स, एक फोटो, वही-पेन, पाण्याची बाटली सोबत आणावी, असे सुचविण्यात आले आहे.”
 
“5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

Continue reading

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...
Skip to content