Details
मुस्लिम खाटीक समाजाच्या मागण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा! राम शिंदे यांची हाजी अरफात शेख यांना ग्वाही
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
राज्यातील मुस्लिम खाटीक समाजाचा समावेश इतर मागास प्रवर्गात झाला आहे. मात्र, त्यांना यासंबंधी दाखले मिळण्यात येणाऱ्या अडचणीसंदर्भात तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल, अशी ग्वाही विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे मंत्री प्रा. राम शिंदे यांनी मंगळवारी दिली.
मुस्लिम समाजातील खाटीक समाजातील विविध समस्यांसंदर्भात आज राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या नेतृत्त्वाखाली एका शिष्टमंडळाने प्रा. शिंदे यांच्या दालनात भेट घेऊन चर्चा केली. खाटीक समाजाचे प्रतिनिधी शहानवाज ठाणवाला, इसहाक खडके, जुल्फेकार पवार आदी यावेळी उपस्थित होते.
मुस्लीम कसाई, मुस्लिम कुरेशी, खाटीक हे एकच असूनही अनेक ठिकाणी त्यांना इतर मागास वर्गाचा दाखला मिळण्यास अडचणी येतात. त्यासाठी शुद्धीपत्रक काढावे. या समाजास दाखले देताना 1967 चा व्यवसाय दाखला मागू नये. जातदर्शक आडनाव असल्यास त्यांना जात प्रमाणपत्र मिळावे आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. या सर्व मागण्यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी तातडीने बैठक घेऊ व मार्ग काढू, असे प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.”
“केएचएल न्यूज ब्युरो