HomeArchiveमुंबईच्या प्रगतीत नौदलाचा...

मुंबईच्या प्रगतीत नौदलाचा सिंहाचा वाटा – प्रवीण दीक्षित

Details

 

 

“मुंबई शहराच्या संरक्षणाची जबाबदारी नौदल सांभाळत असल्यामुळे त्यांचा या आर्थिक राजधानीच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी व्यक्त केले.”

“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने भारत सरकारच्या सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल म्हणजेच `सागर’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आयोजित `सागर’शक्ती प्रदर्शनाचा समारोप प्रसंगी ते बोलत होते. हे प्रदर्शन भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केल्याचे प्रशंसोद्गारदेखील त्यांनी याप्रसंगी काढले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नौदलातील नौका, पाणबुड्या, क्षेपणास्त्रे तसेच सरक्षणविषयक बाबींची माहिती देणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. यात प्रामुख्याने युवा आणि विद्यार्थी वर्गाचा सहभाग विशेष होता.”

“स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानात असताना सशक्त नौदलाचे पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलंय, त्यामुळे भारतीय नौदलाचा दबदबा जगभरात आहे तसेच आपल्या सागरी सीमादेखील सुरक्षित आहेत, असे स्मारकाच्या विश्वस्त मंजिरी मराठे यांनी यावेळी सांगितले.”

 
 
 

“श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती, रायगडचे प्रमुख सुनील पवार यांनी शिवरायांची आरमारविषयी दूरदृष्टी, मोगलांना तसेच समुद्री शत्रूंना नामोहरम करण्याच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर, या प्रदर्शनाचे नेटके संयोजन केल्याबद्दल विनायक काळे तसेच नौदलाच्या अधिका-यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले.”

 
 
 

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content