HomeArchiveमुंबईकरांचा जीव इतका...

मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का?

Details
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
मुंबई रेल्वेस्थानकाजवळच्या ब्रिजवर होत असलेल्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. गुरूवारी मुंबईतील प्राईम लोकेशन समजल्या जाणाऱ्या सीएसएमटी स्टेशनला आझाद मैदानाकडे जोडणारा फुटओव्हर ब्रिज कोसळला. सायंकाळी साडेसात वाजता ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या अपघातात सहा जणांचे प्राण गेले तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा 2017 मधील एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीची आठवण झाली व मुंबईकरांच्या मनात पुल दुर्घटनेच्या भीतीची एक लहर पुन्हा एकदा चमकून गेली.

29 सप्टेंबर 2017 रोजी तेव्हाच्या एल्फिन्स्टन रोड व आताच्या प्रभादेवी स्थानकातील पुलावर झालेल्या दुर्घटनेत 23 प्रवाशांचा बळी गेला होता तर 50 जण जखमी झाले होते. त्याचीच आठवण आज सीएसएमटी स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना झाली. सायंकाळी गर्दीच्या वेळी पश्चिमेकडील बाजूचा एक पूल कोसळल्याची घटना घडली व एकच गदारोळ उडाला. अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पूल थेट खाली रस्त्यावर कोसळल्याने अनेकजण त्याखाली दबले गेले. कोसळण्याइतपत जीर्ण झालेल्या पुलाची अवस्था इतके दिवस कुणाच्याही कशी लक्षात आली नाही हा सर्वात मोठा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेला आहे.

खरेतर यासारखे अनेक पूल मुंबई व उपनगरांतील अनेक स्थानकांमध्ये आहेत. मात्र प्रवाशांच्या जीवावर बेतणाऱ्या या पुलांबद्दल ना रेल्वेला सोयरसुतक आहे ना इतर कुणाला. त्यामुळे असे अपघात घडल्यावरच प्रशासनाला जाग येते. एल्फिन्स्टन पूल दुर्घटना घडल्यावर हा पूल नव्याने अगदी विक्रमी वेळेत बांधला गेला होता. त्याचवेळेस मुंबईच्या सर्वच रेल्वे स्थानकांतील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अपेक्षित होते. प्रवाशांचा प्रमाणापेक्षा अधिक भार वाहणाऱ्या ह्या पुलांची वेळेवर डागडुजी होणे आवश्यक आहे. मात्र केवळ दुर्घटना घडल्यावरच प्रशासनास जाग येणार असेल तर मुंबईकरांची सुरक्षा बेभरवशी आहे असेच म्हणावे लागेल.

आज अनेक रेल्वेस्थानक परिसरांत अगदी ब्रिटिशकालीन ब्रिज अस्तित्त्वात असून त्यांचा वापर मोठ्या संख्येने लोक करताना दिसतात. या पुलांचा साचा व त्यांची मजबुती याची पाहणी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाने करायला हवी. मात्र तसे होताना फार अपवादानेच आढळते. मुंबईची वाढती लोकसंख्या व रेल्वे सेवेवर त्याचा वाढत चाललेला भार पाहता प्रत्येक रेल्वेस्थानकात फूटओव्हर ब्रिजची संख्या वाढवणे अत्यावश्यक झाले आहे. सकाळ-संध्याकाळ गर्दीच्या वेळी तर अनेक उपनगरीय रेल्वेस्थानकांत चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती असते. यात त्या पुलाची क्षमता पाहण्याची व त्याची अंतर्गत निगा राखण्याची खबरदारीदेखील कुणी घेत नसेल तर मुंबईकरांचा जीव खूपच स्वस्त झालाय हे भीषण वास्तव नाकारता येणार नाही.

मुंबईकरांनो, तुमचे जीवन खरंच इतके
स्वस्त झालेय का?
लोकलप्रवासाच्या समस्यांना पारावारच नाही
जीव मुठीत घेऊन जो-तो करतो स्टेशनवर घाई
ना मरणाची भीती ना जगण्याची आस
पोटाची खळगी भराया, लावला लोकलचा फास
गर्दीने गाठलीय परिसीमा हे कुणालाच दिसत नाहीय का
मुंबईकरांनो, तुमचे जीवन खरंच इतके स्वस्त झालेय का?
सीएसएमटीच्या “त्या” पुलावरून जाणारा प्रत्येकजण होता मुंबईकर
काळाने झडप नसती घातली, पूल वाचवला असता वेळीच तर
घर झाले पारखे, कुटुंब झाले पोरके
व्याकुळ झाले आठवणीने घराचे कोपरे सारे
देवा तूच सांग ना रे निर्जीव पूल हा कोपला का

कुणी दादा, कुणी ताई, कुणी आई, कुणी काका, कुणी मामा तर कुणी बाबा
गेलेला प्रत्येकजण होता कुटुंबाचा आधार अन अन कुणाचा तरी जिवलगा
जीवाच्या आकांताने अनेक जण लागले जेव्हा गुदमरायला
कठोर पूल अन निष्ठुर प्रशासन नाहीच धावले वाचवायला
किती गेले व किती जाणार, फक्त हेच मोजत बसायचे का?

त्याक्षणी पुलाची फरशी अन फरशी किंचाळत होती
प्रशासनाच्या ढिम्म कारभाराची लक्तरे वेशीवर टांगत होती
स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, लोक मदतीसाठी ओरडत होते
नियतीच्या घावाने दबलेले जीव, जीवाच्या आकांताने किंचाळत होते
पुलावरील गर्दीतील लोकांना सोडवण्याचा
मरणाशिवाय अन्य कोणताच मार्ग नव्हता का

सहा जणांचे जीव जाण्याला कोण आहे जबाबदार?
याच प्रश्नाभोवती राजकारण आता अनेक दिवस फिरत राहणार
मुंबईही लागणार लगेच त्याच जोमाने धावायला
नाहीच पडली कुणा इथे रोज मरणाऱ्यांची आठवण काढायला
अपघातांची मालिका येथील कधीतरी थांबेल का?
मुंबईकरांनो, तुमचे जीवन खरंच इतके स्वस्त झालेय का?”
 
“वैभव मोहन पाटील

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content