HomeArchiveमिलिंद चित्ताल यांच्या...

मिलिंद चित्ताल यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

Details
मिलिंद चित्ताल यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मिलिंद चित्ताल यांच्या शास्त्रीय गायनाचा बहारदार कार्यक्रम मुंबईच्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरतर्फे आयोजित करण्यात आला होता .श्रोत्यांच्या भरगच्च उपस्थितीत ही मैफल सुमारे साडेतीन तास सुरू होती. अनेक वर्षांची साधना आणि बुजूर्ग गुरूंचे मार्गदर्शन यामुळे चित्ताल यांचे संगीताच्या दुनियेत एक विशिष्ट स्थान आहे. आपल्या घुमार्दार आवाजाने त्यांनी श्रोत्यांना गुंगवून ठेवले.

त्यांनी सुरूवातीला राग मुलतानी निवडला होता. अल्लासाहेब जमाल हा पारंपरिक ख्याल त्यांनी शिस्तबद्ध रीतीने मांडला. क्रमवार बधंत, मींडकाम तसेच मध्य लय तान ही आयुधं वापरून त्यांनी ख्याल सजवला. मुलतानीनंतर त्यांनी ‘मारवा’ रागातील मध्य लयरचना ऐकविली. ही त्यांचे पहिले गुरू पंडित फिरोझ दस्तूर यांची रचना होती. कोमल रिषभ या स्वराचा कलात्मक वापर करून त्यांनी हा ख्याल रंगवला. सूरदासाचे एक फारसे प्रचलित नसलेले भजनही त्यांनी ऐकवले. ते ‘गारा’ रागावर आधारित होते. त्यातील भावदर्शन भावणारे होते.

मध्यंतरानंतर त्यांनी ‘अभोगी’ रागात नोमतोम आलाप गाऊन सुरूवात केली. पंडित दिनकर कायकिणी यांची तालीमही त्यांना लाभल्याचा यातून प्रत्यय आला. ‘शंकरा’ रागातील एक रचनाही त्यांनी पेश केली. उत्तरांगप्रधान रागातील मुरक्या सुंदर होत्या. बाजूबंद खुलं खुलं जा.. या भैरवीने त्यांनी या मैफलीची समर्पक समाप्ती केली. अभय दातार (तबला) आणि श्रीनिवास आचार्य (हार्मोनियम) यांची संगत उत्तम होती. तानपुऱ्यावर प्रकाश नाईक व स्वप्नीत मनोहर होते. हा कार्यक्रम डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी त्यांचे वडीलव संस्थेचे संस्थापक डॉ. स. गो. जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला होता.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content