Details
मानसिक-शारीरिक आरोग्य परस्परांशी संबंधित : शशिकांत खामकर
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मानसिक स्वास्थ्य हे शारीरिक आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे प्रत्येकाने मानसिकदृष्ट्या सदृढ राहण्यासाठी निरोगी राहण्यावर भर दिला पाहिजे, असे विचार विनर्स लाईफ ट्रेनिंगचे मार्गदर्शक व अध्यात्मिक गुरू शशिकांत खामकर यांनी व्यक्त केले.
न्युरॉन फिटनेस सेंटरचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. या केंद्रातून 10 हजार प्रशिक्षणार्थींना मानवी जीवनशैलीत सकारात्मक उर्जा आणि दृष्टीकोन अंगीकारण्याबाबत शिकविले जाणार आहे. मानसिक, शारीरिक व अध्यात्मिक पातळ्यांवर याठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे. न्युरॉन केंद्राचे संचालक आदित्य अग्निहोत्री असून त्यांनी याठिकाणी अत्याधुनिक सामग्रीदेखील उपलब्ध करून दिली आहे. न्यूरॉन फिटनेस, हेल्दी फूड यांच्या माध्यमातून 1 हजार तरूणांना स्वयंरोजगार देऊन उद्योजकतेकडे प्रवृत्त करण्यावरदेखील या केंद्राच्या माध्यमातून भर दिला जाणार आहे, अशी माहिती सहसंचालक निलेश आवटे यांनी यावेळी दिली.”
“केएचएल न्यूज ब्युरो