HomeArchive`मातोश्री’, `सिल्वर ओक’...

`मातोश्री’, `सिल्वर ओक’ हादरले!

Details

 
 
“किरण हेगडे
 
kiranhegde17@gmail.com
 
राज्यातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार हा अपघात नसल्याचे जाहीर करत शिवसेनेबरोबर सत्तास्थापनेचा आपला पूर्वनियोजित प्लॅन होता, असे सूचित करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांचे कुटूंबीय सध्या हादरले आहेत. बॉलीवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन आणि त्यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन यांना काल कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आणि योगायोगाने त्याचदिवशी ठाकरे आणि पवार कुटुंबियांना हादरवणारी घटना घडली. ठाकरे कुटुंबियांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या आणि शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सामना दैनिकातील एका ज्येष्ठ पत्रकाराला तसेच कार्यालयातल्या एका शिपायाला कोविड-१९ (कोरोना) झाल्याचे निष्पन्न झाले. शरद पवार यांची एक शरद, सगळे गारद.. म्हणून बहुचर्चित झालेल्या या मुलाखतीच्या वेळी घटनास्थळी हेच ज्येष्ठ पत्रकार आणि शिपाई उपस्थित होते. त्यामुळेच शनिवार संध्याकाळनंतर पवार आणि ठाकरे कुटुंबाबरोबरच सामन्याचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांचे कुटूंबीय चिंताग्रस्त झाल्याचे समजते.
 

 
 
चार-पाच दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी शरद पवार यांची ही प्रदीर्घ मुलाखत घेतली. मुंबईतल्या गँड हयात हॉटेलमध्ये साधारण दोन तास हे दोन्ही नेते यानिमित्ताने एकत्र होते. त्यावेळी सामन्यातील सध्या कोरोनाबाधित असलेले पत्रकार व शिपाई हॉटेलमध्ये हजर होते. या मुलाखतीचे दोन भाग सध्या प्रकाशित झाले असून उरलेले भाग प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या पत्रकाराला दोन दिवसांपासून त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी झाली. शनिवारी त्यांना तसेच त्यांच्याबरोबर हॉटेलला गेलेल्या शिपायाला कोरोना झाल्याचे आढळून आले असून सध्या हे पत्रकार ठाण्यातल्या एका खाजगी रूग्णालयात उपचार घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या शिपाई कर्मचाऱ्यावरही नवी मुंबईतल्या एका रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जाते.
 
या दोघांना किंवा त्यापैकी एकाला राऊत आणि पवार यांच्या भेटीवेळी कोरोना झाला होता का, याची खात्री करून घेतली जात असतानाच या दोन्ही नेत्यांना त्यांच्या डॉक्टरांनी स्वतःवर बारीक लक्ष ठेवायला सांगितल्याचे कळते. त्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या की नाही हे स्पष्ट होऊ शकले नसले तरी तशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही दोन ते तीन बैठका झाल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांचे कुटूंबीय यांनाही सावधतेचा इशारा देण्यात आल्याचे बोलले जाते. त्यांच्याही चाचण्या घेतल्या जाण्याची शक्यता जाणकार वर्तवित आहेत. त्याशिवाय सामनामधील इतर कोणकोण या दोघा कोरोनाबिधितांच्या संपर्कात आले होते, याचीही चौकशी केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 “

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content