Details
मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांनी घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या मागाठाणे येथील 2000 ज्येष्ठ नागरिकांनी काल रविवारी सकाळी खास बोटीने गंगेच्या पलीकडील तीरावर जाऊन गंगास्नान केले. मग त्यांनी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. बोरिवली रेल्वेस्थानकातून 21 डब्याच्या खास तारामती एकप्रेसने काशी विश्वनाथ यात्रेला रवाना झालेले या भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. 85 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेनेसुद्धा काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. या यात्रेची नोंद गिनीज बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे.
मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातील 2000 ज्येष्ठ नागरिकांना मोफत काशी विश्वानाथ यात्रेला घेऊन जाण्याचा संकल्प केला होता. सायंकाळी मागाठाणे येथील वारकरी व भक्त मंडळींनी जंगममठ ते दशास्वमेधघाटपर्यंत भव्य दिंडी काढली आणि महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचे यथेच्छ दर्शन काशी नगरीत दिसले. यावेळी आमदार प्रकाश सुर्वेदेखील या दिंडीत सामील झाले होते. टाळ, मृदुगं, ढोलकी यांच्या गजरात ज्ञानोबा.. माऊली.. तुकाराम असा गजर करत त्यांनी येथील सारा परिसर दुमदूमुन सोडला होता. सायंकाळी 7 ते 8 पर्यंत दशास्वमेधघाटावर चालललेल्या गंगा आरतीत आमदार सुर्वे यांच्यासह येथील नागरिकांनी सहभाग घेतला. त्यानंतर भोजन करून सोमवारी पहाटे तारामती यात्रा स्पेशल ट्रेनने ही सर्व भक्त मंडळी मुंबईकडे परतीसाठी रवाना झाली.
उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व तेथील पोलीस आयुक्तांनी या ज्येष्ठ नागरिकांची खास दर्शनाची व्यवस्था केली होती. प्रवासादरम्यान या नागरिकांची नाष्टा, चहा तसेच जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारे 7 डॉकटर्स, विविध प्रकारच्या औषधांचा साठ्यासह सुमारे 100 शिवसैनिक व महिला आघाडीचे कार्यकर्ते प्रत्येक डब्यात तैनात होते.
आयुष्यात एकदातरी काशीला जायचे आहे अशी मनापासून आमची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण होऊन आमच्या काशी विश्वनाथ मंदिर दर्शन व मोफत काशी यात्रेचा योग आमदार प्रकाश सुर्वे यांच्यामुळे सफल झाला आणि जीवनाचे सार्थक झाले अशी ऋतज्ञता अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नंतर व्यक्त केली.”
“केएचएल न्यूज ब्युरो