Details
“महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा मैलाचा दगड, “”आरोग्यवर्धिनी””!”
01-Jul-2019
”
वैभव मोहन पाटील
[email protected]
राज्यातील १५१ केंद्रांचे शानदार लोकार्पण
गुरूवार, दिनांक 21 फेब्रुवारी 2019 राज्याच्या आरोग्यसेवेला एक वेगळी कलाटणी देणारा दिवस ठरला. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी “आयुष्मान भारत” योजनेंतर्गत राज्यात राबवण्यात येत असलेल्या “आरोग्यवर्धिनी” केंद्रांचा लोकार्पण सोहळा मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात रंगला. राज्यातील तब्बल १५१ आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तसेच आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर, विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव व विभागाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत झाले. लोकार्पण करण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या ठिकाणीदेखील यादिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील काही आरोग्यसंस्थासोबत मान्यवरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधला.
राज्यातल्या 151 आरोग्य उपकेंद्रांचे व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्यात आले आहे. पुढील वर्षीच्या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सहा हजार आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने नंदुरबारमध्ये बोट ऍम्ब्युलन्स सुरू केली आहे. त्याच धर्तीवर रायगड-कोकणामध्ये बोट ऍम्ब्युलन्स सुरू करण्याची सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. त्यामध्ये शस्त्रक्रिया करण्याची सुविधाही उपलब्ध करा अशीही सूचना त्यांनी केली. या सेवेमुळे अलिबाग-उरणमधील लोकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच 108 टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध करण्यात आलेल्या रूग्णवाहिका सेवेसाठी एप्लिकेशन विकसित करण्याची सूचनादेखील यावेळी ठाकरे यांनी केली. विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी पुस्तिकेचे प्रकाशनदेखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
केंद्र व राज्य सरकारच्या पुढाकाराने राज्यातील शासकीय आरोग्य संस्था दिवसेंदिवस अधिक बळकट व स्वयंपूर्ण होताना दिसत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून आरोग्य संस्थांना मुबलक प्रमाणात औषधी, साधनसामुग्री व मनुष्यबळ उपलब्ध होऊ लागल्याने येत्या काळात सरकारी दवाखाने खाजगी रूग्णालयांशी स्पर्धा करू शकणार आहेत. आज सरकारी आरोग्य संस्थांमध्ये सर्व प्रकारचे उपचार मोफत उपलब्ध असताना केवळ डॉक्टरांची वानवा व सरकारी दवाखान्यांबददल काही लोकांच्या मनात असलेले गैरसमज यामुळे परिणामकारक उपचारांसाठी हे लोक खाजगी रूग्णालयांकडे वळतात. मात्र खाजगी क्षेत्रामध्ये रूग्णांवरील वाढता आर्थिक भार पाहता अधिकाधिक रूग्णांना सार्वजनिक आरोग्य सेवेकडे वळवण्याचे उददीष्ट शासनाकडून ठेवण्यात आले आहे. यासाठी सरकारी आरोग्य संस्थांचा कायापालट करण्याचे प्रयत्न आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आरोग्य संस्थांचे रूपांतर आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये करण्यात येत आहे. आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत सध्या कार्यान्वित असलेल्या उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये (Health & Wellness Centre) रूपांतरण करण्याचा कार्यक्रम सन २०१६-१७ पासून सुरू करण्यात आला आहे. हा केंद्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे व त्याअंतर्गत टप्प्याटप्प्याने राज्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व नागरी आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये (Health & Wellness Centre) रूपांतर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात चालू आर्थिक वर्षात 1012 आरोग्य उपकेंद्रांचे, 479 ग्रामीण भागातील व 125 शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतरण करण्यात येणार आहे. गडचिरोली, वाशिम, उस्मानाबाद, नंदुरबार या चार आकांक्षित जिल्हयातील (Aspirational District) प्रत्येकी पाच याप्रमाणे एकूण 20 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. याचाच एक टप्पा म्हणून 151 आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. येत्या दीड दोन महिन्यांत आणखी शेकडो आरोग्यवर्धिनी केंद्रे लोकसेवेत रूजू होणार आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्राच्या कार्यक्षेत्रातील लोकांना आरोग्य शिक्षणासोबत प्रतिबंधात्मक, प्रबोधनात्मक व उपचारात्मक आरोग्यसेवा दिली जाणार आहे. महानगरपालिका क्षेत्रामधील नागरी आरोग्य केंद्रेदेखील आरोग्यवर्धिनी केंद्रात परावर्तित होणार आहेत.
आरोग्यवर्धिनी, ही नेमकी काय संकल्पना आहे हे आपण थोडे पाहूया. आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये 12 प्रकारच्या सेवा रूग्णांना दिल्या जाणार आहेत. यामध्ये प्रसूतीपूर्व व प्रसूती सेवा, नवजात अर्भक व नवजात बालकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, बाल्य व किशोरवयीन आजार व लसीकरण सेवा, कुटूंब नियोजन, गर्भनिरोधक व आवश्यक आरोग्यसेवा, संसर्गजन्य रोग नियोजन व सामान्य रोगांची बाह्य रूग्णसेवा, संसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी, असंसर्गजन्य रोग नियोजन व तपासणी, मानसिक आरोग्य नियोजन व तपासणी, नाक, कान, घसा व डोळे सामान्य आजारासंबंधीच्या सेवा, दंत व मुखरोग आरोग्यसेवा, वाढत्या वयातील आजार व परिहारक उपचार, प्राथमिक उपचार व आपत्कालीन सेवा यांचा समावेश आहे. आयुर्वेद व योग प्रशिक्षणाचा अंतर्भावदेखील या केंद्रांमध्ये असणार आहे. सदर केंद्रांमध्ये मध्यमस्तर सेवा प्रदाता (MLHP/Community health officer) या पदावर आयुर्वेद पदवीधारक नियुक्त केले जाणार आहेत. निवड करण्यात आलेल्या मध्यमस्तर सेवा प्रदाता यांना ६ महिन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असून सदर प्रशिक्षण अभ्यासक्रमाची संरचना व प्रशिक्षण केंद्रांना प्रमाणित करणे इत्यादी बाबी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याव्दारा पूर्ण करण्यात आली आहे. प्रशिक्षण ऑक्टोबर २०१८ पासून सुरू करण्यात आले आहे. प्रशिक्षित मध्यमस्तर सेवा प्रदाता यांची नियुक्ती मार्च २०१९ पर्यंत करण्यात येईल. मध्यमस्तर सेवा प्रदाता (MLHP/CHO), आरोग्य सेविका (ANM), बहुउद्देशीय आरोग्य सेवक (MPW), आशा (ASHA) यांच्या माध्यमातून आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये व त्याअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा बळकटीकरणाचा शासनाचा मानस आहे.
या केंद्रांमध्ये रूग्णांना प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक आरोग्यसेवांबरोबरच औषधोपचार व प्रयोगशालेय तपासणी मोफत दिली जाणार आहे. एकंदरीत ह्या आरोग्यवर्धिनी योजनेमुळे आरोग्य केंद्रांचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. ग्रामीण भागातील लोकांची रोगाचे निदान व उपचारांसाठी होणारी फरफट थांबणार आहे. प्रशिक्षित डॉक्टर गावातच उपलब्ध झाल्यामुळे रूग्णांना आरोग्य केंद्रातच सर्व उपचार मिळू शकणार आहेत. आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून येत्या काळात प्राथमिक आरोग्य सुविधांमध्ये अमूलाग्र बदल होणार असून जनतेला चांगल्या व परिणामकारक आरोग्य सुविधा मिळू शकणार आहेत. त्यामुळे राज्याच्या आरोग्यसेवेने महाराष्ट्रात आरोग्यवर्धिनी केंद्राच्या रूपाने आणखी एक मैलाचा दगड गाठलाय एव्हढे नक्की!”
“वैभव मोहन पाटील