Details
“महाराज, आम्हाला क्षमा करा!”
01-Jul-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
जय शिवराय,
मानाचा हा मुजरा घ्या..
“छत्रपती शिवाजी महाराज की जय..” असे शब्द कानावर पडले की, अन्यायावर मात करण्याची ताकद निर्माण होते. हे तुमचं कर्तृत्त्व.. आम्हाला जगण्याची ताकदही देते. नुकतेच काश्मीर येथील पुलवामा येथे देशाच्या संरक्षणार्थ जाणाऱ्या भारतीय जवानांवर मिशीही न फुटलेल्या काश्मिरी तरुणाने वाहनावर गाडी आदळून स्फोट घडविला आणि त्यात आपले ४४ जवान शहीद झालेत. त्यामुळे यंदाची शिवजयंती साजरी करणाऱ्यांना काही मर्यादा आल्या आहेत. दुःखाचे सावटही आहे.
महाराज, शिवजयंतीनिमित्त मी काल काही तरुण एक-एक लाखांच्या बाईकवर आणि १० लाखांच्या वाहनात बसून आपले छायाचित्र असलेले भगवे झेंडे घेऊन जयजयकार करत चाललेले पाहिले होते. आपले ४४ जवान शहीद झालेत याचे त्यांना भान नव्हते. सगळे येणारे-जाणारे लोक ते बघतच राहिले. कारण आज तुमची जयंती मग हे तरुण काल का बाईक नि गाड्या घेऊन फिरत होते, हा प्रश्न त्यांना पडला होता. मग कळलं की, सकल मराठा समाजाचे आणि आमदार विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेचे ते कार्यकर्ते होते. आज शिवजयंती आहे म्हणून आदल्या दिवशी समाजबांधवांना जागृत करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. यापूर्वी असे कधीच घडले नाही. परंतु गेली दोन तीन वर्षे शिवाजी महाराज ‘मराठा’ समाजाचे असल्याचे म्हणजेच त्यांनी पेटंट घेतल्याचे चित्र दिसत आहे.
तुमच्याबरोबर अठरापगड जातीचे मावळे होते याचा आम्हाला अभिमान वाटतो. परंतु तुमच्या महाराष्ट्रात सर्व समाजांनी नेते वाटून घेतले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची घटना सर्व जाती बांधवासाठी लिहिली. मात्र बाबासाहेब हे फक्त दलित बांधवांचेच असल्याचे दाखविले जात आहे. तिसरे आमचे महात्मा ज्योतिबा फुले यांना तर छगन भुजबळांनी माळी समाजाचे असल्याचे दाखवून दिले. पुण्याची पगडी ही ब्राह्मणांची असल्याने ती डोक्यावर परिधान करू नका तर ज्योतिबा फुलेंची पगडी यापुढे सत्कार समारंभात दिसली पाहिजे, असा सज्जड दम स्वयंघोषित ‘जाणता राजा’ शरद पवार यांनी दिला. महाराज, खरं म्हणजे पुणेरी पगडी ही पुण्याच्या संस्कृतीची आणि लोकमान्य टिळक, न्या. महादेव रानडे, आगरकर या विद्याविभूषित विद्वानांची खास ओळख होती.
आमचं राज्य सरकार पण वोटबँकसाठी तुमचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यासाठी तयारीला लागले आहे. आपले स्मारक अरबी समुद्रात उभारण्यासाठी राज्य सरकारने मराठा समाजाचे आणि शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यावर जबाबदारी सोपवली. तसं पाहिलं तर त्यांनी तुमचं कार्य व प्रेरणा तरुणांमध्ये निर्माण केली. रायगड किल्ल्यावर हजारो तरुणांना नेऊन तुमच्या पराक्रमाची गाथा सर्वांना सांगण्याचे काम त्यांनी उत्तमप्रकारे काम केले. परंतु त्यांच्या कार्याला आजकाल राजकारणाचा वास येऊ लागला आहे. आपल्या स्मारकाच्या कामाला प्रारंभ करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाले. परंतु त्या कार्यक्रमात विनायक मेटे यांना ज्याप्रकारे स्थान मिळायला पाहिजे होते तसे मिळाले नाही. त्या जलपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच प्रसिद्धी मिळाली. म्हणून शिवभक्त विनायक मेटे यांनी आपल्या स्मारकाच्या जलपूजनाचा पुन्हा कार्यक्रम आयोजित केला. पण त्यावेळी स्मारकाकडे जाणारी बोट फुटली आणि सर्वांना वाचविणारा एक सीए झालेला युवक मृत्यूमुखी पडला. महाराज, मेंटेनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना बाजूला ठेवून या कार्यक्रमाचा हट्टाहास केला आणि घडलं ते विपरीत.
महाराज, माझ्या बोलण्याचा उद्देश हाच आहे की, गेल्या ७० वर्षांत शिवजयंती हा सर्व समाजबांधावातर्फे होत होता. आता त्याला सकल मराठा समाजाचे आवरण चढविण्यात आले आहे. छत्रपती आपले अस्तित्त्व मराठा समाजापुरती राहवं म्हणून त्यांनी इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला, त्यांना रामदास स्वामींचे अस्तित्त्व मान्य नाही. आपण हिंदू समाजाच्या रक्षणासाठी ‘हिंदूरक्षक’ म्हणून कार्य केले. ते मराठा समाजाला मान्य नाही. त्यासाठी त्यांनी शिवधर्म स्थापन केल्याचे समजते. हे सर्व काही चालले आहे ते मराठा वोटबँक उभी करण्यासाठी..
दुसरी शिवसेना.. गेली ५० वर्षांहून अधिक काळ ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा नारा देत महाराष्ट्रातील झोपलेल्या तरुणांना त्यांनी जागे केले. देशभर तुमचा जयजयकार पोहोचवला. सूरत लुटावी तसे सेनेने तुमच्या नावाखाली मुंबईत परप्रांतीयांची लयलूट केली. तुमच्या नावावर सात पिढयांची सोय केली. शिवाजी महाराज हे शिवसेनेचेच असं दाखविण्यासाठी त्यांनी शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करण्याचे ठरविले आणि स्वतःच्या अस्तित्त्वासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे ‘आमचाच शिवाजी’ ही भूमिका तयार केली आहे.
महाराज, आपण आपल्या तलवारीच्या जोरावर मुसलमानांना सळो की पळो केले. संपूर्ण उत्तर व दक्षिण भारत मुसलमान राज्यकर्त्यांच्या हातात असताना तुम्ही महाराष्ट्राचा मराठा गडी काय करू शकतो हे दाखवून दिले. मात्र आज अनेक नेते आपल्या नावाची ढाल करत स्वार्थासाठी सत्तेकडे चोरपावलाने जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गर्जना करून मुंबईत मराठी अस्मिता तगून राहिली. आज मराठी टक्का कमी होत चालला आहे. महाराज, आम्ही नालायक आहोत. तुम्ही अटकेपार महाराष्ट्र धर्म वाढविला पण आज हिंदीभाषिक तुमच्या महाराष्ट्रावर आक्रमण करत आहेत. हा उलटा प्रवास सुरू होतोय. कदाचित येत्या दहा वर्षांत मुंबईत शिवजयंती साजरी होईल की नाही, अशी शंका मनात वारंवार येत आहे. क्षमा करा महाराज, क्षमा करा.. आम्ही नालायक आहोत..”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार