Details
मराठी सक्तीच्या कायद्याला शिवसेनेसह माझा पूर्ण पाठिंबा! उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही
01-Jul-2019
”
मी आणि माझा मुलगा मराठी शाळेत शिकलो असलो तरी आमचं काही एक अडलं नाही. मराठी सक्तीच्या कायद्याला शिवसेनेसह माझा पूर्ण पाठिंबा असेल, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
ते मराठी अभ्यासकेंद्र आणि महाराष्ट्र विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठीप्रेमी पालक महासंमेलनात बोलत होते. मराठी भाषा आणि मराठी शाळांसाठी कार्य करणाऱ्या अनेक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांनी हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाचे हे दुसरे वर्ष असून महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत हे या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या तिघाही मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये महाराष्ट्रात मुलांनी मराठी शाळेत जाणेच नैसर्गिक असल्याचे म्हटले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी, मराठी शाळाबंद झाल्या तर समाजातील वंचित वर्ग शिक्षणाला मुकेल, असे प्रतिपादन केले तर राजकीय पक्षांसाठी मराठी भाषा आणि मराठी शाळा हा राजकारणाचा मुद्दा असून आता आपण पालकांनीच मराठी शाळेच्या विकासासाठी, त्यातील शिक्षण कसे आनंददायी होईल, यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असे मत अभिनेत्री आणि मराठी शाळांची सदिच्छादूत चिन्मयी सुमीत यांनी मांडले. आजच्या घडीला मराठी शाळा टिकवायच्या असतील तर आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेला पालक या घटक अत्यंत महत्त्वाचा असून त्यांच्या सबलीकरणासाठीच मराठी अभ्यास केंद्राने पालकांचे संमेलन आयोजित केले असल्याचे म्हटले. याप्रसंगी मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते तुषार पवार यांनी भारतातील विविध राज्यांना भेटी देऊन तेथील भाषा वापराचा चिकित्सक आढावा घेतलेले भाषा परिक्रमा आणि डॉ. प्रकाश परब आणि साधना गोरे संपादित गेल्या मराठीप्रेमी पालक महासंमेलनात विविध वक्त्यांच्या भाषणांचे शब्दांकन असलेले ‘मराठी शिक्षणाच्या नव्या वाटा’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. ‘सजग व सुजाण पालकत्वासाठी’ हे घोषवाक्य असणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनात महाराष्ट्र व बेळगाव येथील अनेक प्रयोगशील शाळा, मराठी शाळा आणि मराठी भाषेसाठी कार्य करणाऱ्या संस्था, तसेच बालसाहित्य प्रकाशित करणारी प्रकाशने यांची दालनेया संमेलनात आहेत. या पालक संमेलनाचे प्रवेश शुल्क ५० रूपये असून मराठीप्रेमींनीया संमेलनाचे जरूर लाभ घ्यावा असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यत्र डॉ. दीपक पवार आणि संमेलनाचे समन्वयक आनंद भंडारे यांनी केले आहे. सहभागासाठी ९९८७७७३८०२ याक्रमांकावर संपर्क साधावा.”
“मी आणि माझा मुलगा मराठी शाळेत शिकलो असलो तरी आमचं काही एक अडलं नाही. मराठी सक्तीच्या कायद्याला शिवसेनेसह माझा पूर्ण पाठिंबा असेल, असे वक्तव्य महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.