Details
मराठी चित्रपट रसिकांसाठी “रेड एफ एम”चा नवा उपक्रम!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतातील सर्वाधिक पुरस्कारप्राप्त प्रायव्हेट रेडिओ नेटवर्क रेड एफ एम, सुप्रसिद्ध नॅशनल फिल्म अर्काइव्ह ऑफ इंडिया पुणे यांच्या विद्यमाने घेऊन आले, रेड एफ एमचा पहिलावहिला मराठी फिल्म फेस्टिवल पुण्याची आवडती आर जे कलाकार श्रुतीसोबत. हा सोहळा म्हणजे आर जे श्रुतीच्या सुप्रसिद्ध रेडिओ शो, लाईट्स कॅमेरा ऍक्शनचा एक भाग होता जो मराठी सिनेमा व त्याचे महत्त्व विशद करत आला.
या मराठी फिल्म फेस्टिवलमध्ये अशी ही बनवाबनवी, दुनियादारी, माहेरची साडी, डोंबिवली फास्ट आणि नटरंगसारखे प्रसिद्ध चित्रपट दाखवण्यात आले. पुण्यातील सर्व मराठी चित्रपट रसिकांसाठी ही एक पर्वणीच होती. दिनांक ५ ते ९ ऑगस्टदरम्यान दुपारी ३ ते ८ वाजेपर्यंत NFAI येथे हा विनामूल्य फेस्टिवल झाला.
या फेस्टिवलविषयी आपले मत व्यक्त करताना रेड एफ एम व मॅजिक एफ एमच्या संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निशा नारायणन म्हणाल्या की, “मराठी चित्रपटांनी आजतागायत जो पल्ला गाठला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांनाच खूप अभिमान आहे. या फेस्टिवलमध्ये मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले चित्रपट दाखवण्यात आले. मल्टिप्लेक्समध्ये प्रादेशिक चित्रपटांपेक्षा बॉलिवूडलाच महत्त्व दिले जात असल्यामुळे मराठी चित्रपटांना महत्त्व मिळत नाही आणि याच कारणामुळे प्रेक्षकांना प्रादेशिक चित्रपटांचा आस्वाद घेता येत नाही.”
“६८ स्टेशन्सचे नेटवर्क असलेला विस्तृत ब्रँड म्हणजे रेड एफ एमसाठी सर्व प्रादेशिक बाजारपेठा या खूपच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आमचा भरनेहमीच प्रादेशिक/स्थानिक विषयांवर असतो, मग ते संगीत असो किंवा सिनेमा. अलीकडेच आम्ही सुरू केलेला रेड इंडिजहाही असाच एक प्लॅटफॉर्म आहे जिथे भाषेचं बंधन न बाळगता स्वतंत्र कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. यांसारखे उपक्रम प्रादेशिक सिनेमाला उपयुक्त ठरतात”, असेही त्या म्हणाल्या.
NFAI चे संचालक प्रकाश मगदुम म्हणाले की, “हा फिल्म फेस्टिवल म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील काही सुप्रसिद्ध सिनेमे बघण्याची एक चांगली संधी होती. तसेच चित्रपटाशी निगडित असलेल्या कलाकारांशी चित्रपटाबद्दल गप्पा मारणे ही एक आकर्षणाची बाब ठरली.”
या फेस्टिव्हलमध्ये अशोक सराफ, संदीप कुलकर्णी, अजिंक्य देव, सई ताम्हणकर, सचिन पिळगावकर, सुशांत शेलार, दिग्दर्शक रवी जाधव, संजय जाधव यासारख्या कलाकारांसोबत फक्त सिनेमा पाहण्याचीच नाही तर मनसोक्त गप्पा मारण्याचीही सुवर्णसंधी रसिकांना मिळाली.”
“केएचएल न्यूज ब्युरो