HomeArchiveममतांना पवारांची शिकवणी...

ममतांना पवारांची शिकवणी लावा!

Details
ममतांना पवारांची शिकवणी लावा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणजे आग्या वेताळ आहेत. त्यांचे बोलणे, चालणे, वागणे यातून त्यांचा शीघ्रकोपी स्वभाव दिसून येतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला जोरदार फटका बसला. या पक्षाला 40 पैकी फक्त 22 जागा जिंकता आल्या. ज्या भारतीय जनता पक्षाला 2014 च्या निवडणुकीत अवघ्या 2 जागा जिंकता आल्या होत्या त्या भाजपने या निवडणुकीत तब्बल 18 जागा पटकावल्या. पश्चिम बंगाल या आपल्या बालेकिल्ल्यात भाजपने अशी मुसंडी मारल्यानंतर ममता बॅनर्जी संतापल्या नसत्या तरच नवल! भाजपच्या या विजयामुळे त्यांच्या अंगाचा तिळपापड झाला. त्यात भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर `जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे संतापलेल्या ममताबाई त्या कार्यकर्त्यांवर धावून गेल्या. कोणत्याही मुख्यमंत्र्याला हे शोभणारे नाही.

मुख्यमंत्र्याकडून अतिशय संयमी, सहनशील आणि सुसंस्कृत वर्तणुकीची अपेक्षा असते. ममता 64 वर्षांच्या आहेत. पण त्यांचा संताप मात्र पंचविशीतील तरूणीसारखा आहे. म्हणूनच आम्हाला वाटते की, त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शिकवणी लावण्याची गरज आहे. काँग्रेस संस्कृतीत वाढलेले आणि यशवंतराव चव्हाण यांच्या तालमीत तयार झालेले शरदराव म्हणजे सभ्य आणि सुसंस्कृतपणाचे आदर्श उदाहरण आहे. अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांनी पवार यांच्यावर अनेकदा टीका केली. त्यांना `तेल लावलेला पहिलवान’ म्हटले. पण त्यांच्या सभ्यतेचे आणि सुसंस्कृतपणाचे सदैव कौतुकच केले. आम्ही गेली अनेक वर्षे शरदरावांना ओळखतो. त्यांना अनेकदा भेटण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आम्हाला आला. त्यावेळी त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाचे अनेक किस्से आम्ही अनुभवले.

एकेकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बॅ. विठ्ठलराव गाडगीळ शरद पवार यांच्यावर आक्रमकपणे टीका करीत. संधी मिळेल तेव्हा त्यांच्यावर हल्ला चढवीत. एकदा आमच्यासमोर एका युवक काँग्रेस कार्यकर्त्याने शरदरावांना म्हटले, `साहेब, आम्ही गाडगीळांना घेराव घालून जाब विचारू का?’ त्यावर शरदराव पटकन म्हणाले, `अजिबात तसे काही करू नका. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आपण आदर केला पाहिजे. घेराव घातला की, धक्काबुक्की होऊ शकते. तेव्हा असे काही करू नका.’ आक्रमक झालेला तो कार्यकर्ता शरदरावांचे बोलणे ऐकून ताळ्यावर आला.

काही वर्षांपूर्वी काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते तावातावाने शरदरावांच्या निवासस्थानी गेले. शरदरावांनी केलेल्या कोणत्यातरी वक्तव्यावर त्यांचा आक्षेप होता. शरदरावांनी त्यांना बसवून घेतले. त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकले. मग आपली बाजू मांडली. ती ऐकून ते कार्यकर्ते शांत झाले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली. संतापून आलेले ते `वीर’ मग शरदरावांची क्षमा मागून हसतहसत तेथून निघून गेले.

खैरनारांची बकवास

काही वर्षांपूर्वी महापालिका उपायुक्त गो. रा. खैरनार पवारांविरूद्ध भलतेच आक्रमक झाले होते. महापालिका सेवेत असूनही मुख्यमंत्र्यांवर जाहीर टीका करण्याचा वेडेपणा ते करत होते. शरद पवार यांच्याजागी दुसरा कोणी मुख्यमंत्री असता तर त्यांनी खैरनार यांना क्षणार्धात निलंबीत केले असते. पण शरदरावांनी तसे काही केले नाही. ते शांत राहिले. पुढे काही काळाने खैरनार यांच्या बेशिस्तपणाचा अतिरेक भलताच वाढला. तेव्हा तत्कालीन महापालिका आयुक्त शरद काळे यांनी त्यांना `कारणे दाखवा’ नोटीस देऊन नंतर निलंबीत केले. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांची अतिरेकी वागणूक भलतीच खटकते. सत्तेवर असलेल्या व्यक्तीने कसे वागावे हे ममताबाईंनी शरदरावांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडून शिकून घेतले पाहिजे. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम पवारांची शिकवणी लावली पाहिजे. या शिकवणीचा त्यांना नक्कीच लाभ होईल.”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content