Details
मनोमीलनाची वरात निघाली! सारे प्रवासी बसचे!!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
सारे प्रवासी घडीचे असे एक नाटक मागे गाजले होते. हे वाक्य खरेतर तत्त्वज्ञानातील वचन आहे. आपला साऱ्यांचाच प्रवास काही काळाचाच असतो. प्रत्येकाचा काळ तसा ठरलेला असतो, निश्चित असतो. जे व्यक्तीसाठी सत्य आहे तेच संस्थेबाबतही खरे आहे. कोणतेही सरकार, जे सत्तेत येते, त्याचाही कार्यकाळ हा घटनेने नेमून दिलेला, सुनिश्तिच, असाच असतो. नरेंद्र मोदींना देशाचे पंतप्रधान म्हणून, या महान भारत देशाचे नेतृत्त्व करण्याची सुसंधी मिळाली होती ती २०१४ मध्ये. तो त्यांचा कार्यकाळ मे २०१९ मध्ये संपुष्टात येणार आहे. अर्थातच पुढचा आणखी पाच वर्षांचा काळही याच पदावर मिळावा अशी त्यांची इच्छा आहेच. ती लपलेली नाही. त्यांच्या भारतीय जनता पक्षाने तर अशी प्रतिज्ञाच केलेली आहे की जसा काँग्रेसला स्वातंत्र्यानंतरचा सलग पंचवीस एक वर्षांचा निर्विघ्न सत्तेचा काळ मिळाला तसाच तो भाजपालाही आता म्हणजे २०१४ पासून पुढे मिळणार आहे.
२०१४ च्या अभूतपूर्व विजयानंतर नोटबंदी लागू करेपर्यंतचा मोदींच्या सत्तेचा सुवर्णकाळच म्हणावा लागेल. त्यावेळी अनेकांना असेच वाटत होते की काँग्रेसने २०१९ साल विसरूनच जावे. त्यानंतरची सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये जेव्हा येईल त्यावेळी कदाचित काँग्रेसचा नंबर लागेल. पण तोवर “मोदी, मोदी, मोदी…!” असाच पुकारा देश करत राहणार असे एक स्वप्न त्या पक्षाच्या नेत्यांनी नक्कीच पहिले होते. अर्थात ते स्वप्न दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता परवाच्या निकालाने निर्माण झालेली आहे. हिंदी प्रदेशताल्या तीन राज्यांतील मतदारांनी भाजपाच्या स्वप्नांना सुरूंग लावला आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये मतपेटीमधून घुसण्याचा भाजपाचा प्रयत्न तेलंगणातील तेलगू जनतेने साफ धुळीला मिळवलेला आहे. तर मग आता, २०१९ ला नेमके काय होणार, हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ती निवडणूक एकतर्फी नसेल हे स्पष्ट झाले आहे. २०१४ च्या निकाला नंतरचा काही काळ काँग्रेसने चाचपडण्यात घालवला. अध्यक्ष सोनिया गांधींच्या तब्ब्येतीला उतरती कळा होती. बाकी सारेच नेते हतबल झालेले होते. उपाध्यक्ष राहूल गांधीही चाचपडतच होते. हळूहळू ते सावरले. त्यांनी पक्षालाही सरळ पायावर उभे केले. विशेषतः म्यानमारमध्ये जाऊन विपश्यना करून आल्यापासून राहूल गंधी यांच्या व्यक्तिमत्वात लक्षणीय बदल दिसून आला. त्यांनी स्वतःमध्ये तो मोठा सकारात्मक बदल घडवला. त्यांच्या बाबतीतील समाज माध्यमांतील नेटकऱ्यांचे मतही झपाट्याने बदलू लागले. हा पप्पू आता फारच हुषार झाला आहे. तो स्वतः तर आता उत्तम डान्स करणारच आहे पण तो इतरांनाही आपल्या तालावर नाचवल्याशिवाय राहणार नाही, हे राहूल यांनी दाखवून दिले, असेच मत नेटकरांनी सध्या व्यक्त केले आहे.
काँग्रेस पक्षासाठी ते एक मोठेच शुभलक्षण आहे. विशेषतः २०१८ मध्ये राहूल यांनी आपण एक उत्तम लढवय्या आहोत, भाजपाला अंगावर घेण्याची आपली क्षमता आहे. प्रसंगी आपण मोदी- शाह यांना धूळही चारू शकतो हेही सिद्ध करून दाखवले आहे. गुजरातच्या निवडणुका त्यांनी ज्या जिद्दीने लढवल्या, आदिवासीं ओबीसींचा नेता अल्पेश ठाकोर, दलित कार्यकर्ता जिग्नेश मेवाणी आणि पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल या तरूण तुर्कांच्या साथीने राहूल यांनी मोदींना भरपूर दमवले. गुजरातची सत्ता काँग्रेसच्या हातातून थोडक्यात निसटली. भाजपाला प्रथमच तिथे शंभराच्या खाली आमदार विजयी करता आले. जसे सध्या राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार थोडक्यातच आले तसेच भाजपाने धडपड करून गुजरातमध्ये सरकार स्थापन केले. दुसरा झटका मोदी-शाहंना बसला तो कर्नाटक निवडणुकांमध्ये. तिथे काँग्रेसपेक्षा उत्तम कामगिरी भाजपाने केली होती. पण ऐनवेळेच्या रणनीतीत व डावपेचात काँग्रेसने भाजपाला लोळवले. जनता दलाला मोठेपणा देणे, हा काँग्रेसचा मास्टरस्ट्रोक होता व त्यावर भजापाकडे तोड नव्हती. गोवा त्रिपुरातील भाजपाचा विजय पंजाबमधील काँग्रेसच्या यशाने झाकोळून गेला आणि आता तर पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला पाच शून्य अशी हार पत्करावी लागली. हातातील तीनही मोठी राज्ये निसटली.
हिंदी पट्ट्यातील ६५ पैकी ६२ लोकसभा जागांवर पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये भाजपाने विजय मिळवला होता. पण तो विजय आता अगदीच फिका ठरतो आहे. या पट्ट्यातील लोकसभेच्या किमान तीस जागा भाजपाच्या हातातून गेल्या असेच म्हणावे लागेल. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थानातील विजयाच्या हॅटट्रिकचा लाभ घेत राजकीय कुरघोडी करण्याचीही खेळी राहूल यांनी करून दाखवली आहे. त्यांनी काँग्रेसच्या तीन्ही मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी देशातील प्रमुख विरोधी पक्षनेते हजर राहतील याची काळजी घेतली आहे आणि या विरोधी एकीचे प्रदर्शन त्यांनी बस यात्रेमधून घडवले आहे. राहूल गांधी बसमध्ये पहिल्या आसनावर बसले आहेत. शेजारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हेही बसमध्ये पहिल्या बाकावर बसले आहेत तर शेजारच्या रांगेतील पहिल्या बाकावर संभाव्य भावी पंतप्रधान(!!) शरद पवार विराजमान झाले आहेत. मागे द्रमुक, जनता दल अन्य लहान मोठ्या पक्षांचे नेते, प्रतिनिधी बसले आहेत हे दृष्य अनोखे होते. विरोधकांच्या ऐक्याच्या बसची ही यात्रा टीव्हीच्या पडद्यावरून सर्वत्र झळकली आणि सर्वच वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर या यात्रेची छायाचित्रे व वर्णने प्रसिद्ध केली. काँग्रेसच्या रणनीतीचे प्रदर्शन व जनतेला विरोधी ऐक्याचा दिसलासादायक संदेश देण्याचे मोठे काम यातून साधले आहे. या बसयात्रेने काँग्रेसने तीन्ही राज्यातील आपल्या विजयाच्या शिरपेचात एक चमकता तुराच खोवला आहे. त्यासाठी राहूल गांधींनी विमानतळांपासून ते शपथविधी समारंभाच्या ठिकाणांपर्यंत एका आरामदायी बसमध्ये साऱ्यांना बसवले आणि बस प्रवासाच्या राजकारणाचे एक नवे पर्व देशस्तरावर सुरू केले आहे. खरे तर या बस प्रवासाची संकल्पना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यापासूनच मिळाली असण्याची शक्यता आहे. शरदरावांना अशा बस प्रवासाची गंमत त्यांचे पुतणे व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच सर्वोच्च नेते अजितदादा पवारांनी दाखवून दिली आहे. अजितदादांनी संघर्षयात्रा काढल्या.
त्यात त्यांनी एकाच बसमधून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्वच पहिल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना महाराष्ट्रचा दौरा घडवला. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. पाण्याच्या व धान्याच्या किंमतींबाबतीत उदासीन आहेत हे जनतेला पटवण्यासाठी त्यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वत्र बसमधून प्रवास केला. त्याचा मोठा सकारात्मक परिणाम दोन्ही काँग्रेस पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांवर झाला. दोन्ही काँग्रेसचे ऐक्य झाले, हे त्यांच्या सर्वांच्या मनावर बिंबवण्यामध्ये तो बसप्रवास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपयोगी पडला. त्याचे प्रत्यंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्येही आले. पुढच्या लोकसभा व विधानसभांच्या निवडणुकांची दोन्ही काँग्रेसची जागावाटपाची बोलणी आटोपत आलेली आहेत. फारसे वादविवाद झडत नाहीत, याचे श्रेय या बसप्रवासांमध्ये झालेल्या मनोमीलनाच्या प्रक्रियेलाही द्यावे लागेल. तोच प्रयोग शरद पवार व राहूल गांधी हे देशस्तरावर नेत आहेत. नेते असे सारखे एकत्र दिसतात, याचा एक परिणाम या सर्व पक्षांच्या खालच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होतच असतो. ते एकदा साध्य झाले तर मग भाजपाची सत्ता टिकवण्याची लढाई अधिक कठीण बनू शकेल यातही शंका नाही.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी