HomeArchiveभावी मुख्यमंत्री रामदासभाई!

भावी मुख्यमंत्री रामदासभाई!

Details
भावी मुख्यमंत्री रामदासभाई!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
भाजपा-शिवसेनेने गेली साडेचार वर्षे एकमेकांना आव्हाने देत ‘तोडफोड’ची भाषा केली आणि आता गोड फोडी एकमेकांच्या तोंडात टाकून एका नूरा नाटकावर पडदा टाकला. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘वाघाची मांजर’ झाली अशाप्रकारे शेरेबाजी करुन पत्रके प्रसिद्धीस दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘चौकीदार चोर है’, या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळून जहरी टीका केली होती. तेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते आता युती मोडणार अशा भ्रमात राहिले होते आणि युतीची घडी पुन्हा व्यवस्थित बसल्याने त्यांना धक्का बसला. भाजपा-सेनेने ‘हिंदू’ कार्ड काढून विरोधकांना चपराक दिली.

उत्तर प्रदेशच्या खासदारांची संख्या रोडावणार आहे याची अमित शाह यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांना मातोश्रीचे उंबरठे झिजवावे लागले. राजकारणात काहीही घडू शकते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १९९९ साली सोनिया गांधी यांचा विदेशी मुद्दा पुढे करून काँग्रेस पक्षाचा त्याग केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. परंतु १९९९ च्या विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने शरद पवारांनी आपले आवडते निधर्मी कार्ड बाहेर काढून काँग्रेस-राष्ट्रवादीला एकत्र आणले. सत्तेशिवाय कोणीही राहू शकत नाहीत. त्यात पवारसाहेबांचे तर ५० वर्षे सत्तेत राहून ७९ व्या वयातही सत्तेवरील ‘अमरप्रेम’ सर्वश्रूत आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेना आज सत्तेसाठी एकत्र आले असले तरी नरेंद्र मोदी यांनी आपल्या राजकीय महागुरूचे, अर्थात शरद पवारांच्या विचाराचे तंतोतंत पालन केले आहे. परंतु हा विचार विरोधक करत नाहीत आणि करणार तरी ते कोणत्या तोंडाने?

भाजपा-सेनेची युती झाली. जनता समाधान मानत असताना तिसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पर्यावरणमंत्री रामदासभाई यांनी अडीच अडीच वर्षे भाजपा व शिवसेनेचा मुख्यमंत्री राहील असे नक्की झाले असताना ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील वक्तव्य कसे करतात, असा रोखठोक सवाल विचारला आणि राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का, असे वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नंतर आपण व उद्धव बोलतील त्यावरच विश्वास ठेवण्याचे सांगितले ते अलाहिदा.

युती झाली परंतु मतभेद असल्याचे कदम यांनी दाखवून दिले. या वादविवादातून एक स्पष्ट झाले सेनेचे पुढील मुख्यमंत्री रामदासभाई कदम आहेत असे संकेत मिळत आहेत आणि रामदासभाई गुडघ्याला बाशिंग लावून बसलेत. लोकसभा निवडणुक होण्यापूर्वीच त्यांची आदळआपट सेना, भाजपा नेत्यांना आणि जनतेला भावी मुख्यमंत्री आपणच असल्याचे सांगत आहेत. सेना-भाजपा युती झाली म्हणजे सर्व मार्ग मोकळे झाले असे नाही. वरवर व वारंवार होणारे खटके याला पायबंद बसला. राजकारणात जेव्हा संधी समोर दिसून येते तेव्हा ती मिळवणारा तोच खरा राजकारणी. जो ही संधी घेत नाही त्यांचा यशवंतराव चव्हाण, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ होतो. यशवंतरावांना पंतप्रधानांची संधी मिळत असताना केवळ नेहरूनिष्ठ म्हणून इंदिरा गांधींचा ते सल्ला घ्यायला गेले आणि पंतप्रधानपद कायमचे गमावून बसले आणि कहर म्हणजे यशवंतरावांना काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी इंदिरा गांधींनी त्यांना केबिनबाहेर ताटकळत ठेवले. दुसरे बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांना इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्यास राजी झाल्या असताना त्यांनी राजकारणातील काही प्रघातांशी तडजोड शक्य नसल्याने मुख्यमंत्रीपद नाकारले. आता तर लोकसभेत सरणा-भाजपाची युती झालीच आहे तर भाजपाचे मुंबई महापालिकेतील मलईदार पदांकडे नगरसेवकांना वेध व वेड लागणारच! त्याप्रमाणे नगरसेवक कामाला लागले आहेत. महापौर पदासाठी ते आग्रह धरणार नाहीत. कारण तसं घडलं तर सेनेचे आमदार मुख्यमंत्रीपदासाठीही आग्रह धरतील. युती झाली पण भवितव्यासाठी मतीला गती देणे तितकेच महत्त्वाचे आहे. नाहीतर माती खाण्याची वेळ येईल, इतका शहाणपणा राजकीय नेत्यांकडे असतो.. मुंबई पालिकेतील भाजपा नेते त्याप्रमाणे आगेकूच करीत आहेत.

चला, मुंबईत मराठी टक्का कमी करू या.. भाजपा-शिवसेना युती होत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई व ठाण्यातील ५०० स्क्वे.फु.च्या घरांना मालमत्ता करमुक्त करण्याची अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घातली व त्यांनी ती मान्य केली. हा निर्णय मतदारांना प्रभावीत करणारा असला तरी तो मुंबईतील मराठी टक्का कमी करणारा आहे. तसेच बिल्डरांच्या फायद्याचा आहे. मुंबई महापालिकेकडून ५०० स्क्वे.फु. घर असलेल्या घरांना मालमत्ता कर नसेल तर मुंबईत बिल्डर ५०० स्क्वे. फु. फ्लॅट्स बांधतील आणि लोकांना आणि बिल्डरला त्याचा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे एक हजार फुटांची घरे असतील तर तेच फ्लॅट्स ५०० स्क्वे. फु.चे दोन भाग करून आणि वेगळ्या नावाने रजिस्टर करून घेण्याची संधी फ्लॅटधारक मुळीच सोडणार नाहीत. दोन भावात किंवा पतीपत्नीच्या नावाने फ्लॅट नावावर करण्याची सुरूवात होणार आहे. सरकारी नोकरीत बायकोची प्रॉपर्टी लपविण्यासाठी घटस्फोटासारखे अस्त्र वापरले जाते तसा हा प्रकार आहे.

झोपडपट्टीधारकांचे जीवनमान सुधारावे म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुंबईत मोफत घरे देण्याचा निर्णय घेतला. परिणाम काय झाले? केवळ सरकारी, पालिका, रेल्वे, म्हाडाच्या मोकळ्या जागांवर झोपडपट्टी बांधण्याची स्पर्धा परप्रांतीयांकडून सुरू झाली आणि मुंबईत मराठी टक्का घसरला आणि हिंदीभाषिक मुंबईत वाढला. आतातर ५०० स्क्वे.फु.च्या घरातलल राहणाऱ्यांना ही संधी मिळणार आहे. “या, मुंबई तुमची आहे” असे आपण आपसूक परप्रांतीयांना आमंत्रण देत आहोत. याला ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असं म्हणायचं का, उद्धवजी?”
 
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

सुटीच्या रविवारी दिवशी २०७ शासननिर्णयांची आतषबाजी!

काल रविवार, २९ मार्चचा सुटीचा दिवस असला तरी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातील संगणक टायपिंग मात्र थांबले नाही. आर्थिक वर्षाचा शेवट (३१ मार्च) जवळ येत असताना, महायुती सरकारने रविवारी (२९ मार्च २०२६) एकाच दिवसात तब्बल २०७ शासननिर्णय (जीआर) निर्गमित करून प्रशासकीय...

तृप्ती देसाईंच्या आरोपांवर नीलम गोऱ्हेंचा पलटवार!

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महिला नेतृत्त्वावरून नवा संघर्ष पाहायला मिळत आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज मुंबईत तातडीची पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही नेत्यांमधील...

युद्धाच्या वणव्यात गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा!

पश्चिम आशियातील युद्धाचा ३१वा दिवस जागतिक अर्थव्यवस्थेसाठी 'ब्लॅक मंडे' ठरला आहे. इस्रायल आणि इराणमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याने जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचे थेट पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले आहेत. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी पडझड...
Skip to content