HomeArchiveभाजपमध्ये जादू पक्षनिष्ठेची!

भाजपमध्ये जादू पक्षनिष्ठेची!

Details
भाजपमध्ये जादू पक्षनिष्ठेची!

    14-Mar-2019

| 0

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विजय भोसले, मुख्य वार्ताहर, केसरी
bhosale.vijay53@ gmail.com
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे विलास मडिगेरी यांची निवड झाली. मात्र, या निवडणुकीमागे एव्हढे मोठे राजकीय नाट्य घडले आहे की, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. कोण म्हणते, मडिगेरींना आ. लक्ष्मण जगताप यांनीच उमेदवारी दिली. तर, कोण म्हणते शीतल शिंदे यांचे नाव असताना ऐनवेळी मडिगेरी यांचे नाव अर्जावर दाखल करून राजकीय खेळी केली. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की, मडिगेरींच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री गिरीश बापट यांनीच शिक्कामोर्तब केले असल्याने भाजपमधील सर्व गटातटाच्या मंडळींना हा मोठा झटका दिल्याने मडिगेरींसारख्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळू शकतो तो केवळ भाजपमध्येच. कारण भाजपमध्ये एकदा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला की तो बदलला जात नाही हे यामुळे सिद्ध झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात भाजपची नगण्य अवस्था असताना आ. जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश करून आमदारकी जिंकली. त्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्ष म्हणून जगताप यांच्यावर पक्षाची जबाबदारी होती. ती जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी भोसरी विधानसभेचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांना आणि राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आजम पानसरे यांना गळाला लावून भाजपमध्ये आणले. महापालिकेची निवडणूकही जिंकली. १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली महापालिका भाजपच्या ताब्यात आल्यामुळे राजकीयदृष्टया जगताप यांचे वजन वाढले. पिंपरी महापालिकेत जगताप आणि लांडगे या दोघांचेही वर्चस्व आहे.

गेल्या दोन वर्षांत स्थायी समितीवर आ. जगताप यांनी वर्चस्व मिळविले. तर, लांडगे यांनी सलग तिसऱ्या वर्षीही आपल्याच समर्थकाला महापौरपद मिळवून दिले. ते असले तरी स्वीकृत सदस्य, प्राधिकरणाचे अध्यक्षपद हे भाजपच्या निष्ठावंतानांच मिळाले. त्यानंतर यावर्षी स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरदेखील भाजपच्या निष्ठावंताचीच वर्णी लागली. पिंपरी महापालिकेत भाजपची सत्ता येईल हे स्वप्नातदेखील कोणी मान्य करणार नाही. कारण, आजपर्यंत महापालिकेतील भाजपच्या सदस्यांच्या संख्येचा विचार करता नगण्य अवस्थाच होती. आ. जगताप यांच्या रूपाने पिंपरी-चिंचवड शहराला स्थानिक नेतृत्त्व मिळाले. कारण, यापूर्वी अण्णासाहेब मगर, प्रा. रामकृष्ण मोरे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शहराबाहेरचेच नेते होते. मात्र, जगताप यांचे मुरब्बी राजकारण आणि राजकीय खेळी यातून त्यांनी योग्य वेळ साधून भाजपची वाट धरली आणि त्यांना नेतेपदाची जबाबदारी मिळाली. ही जबाबदारी सार्थ ठरवत त्यांनी शहरावर आपले राजकीय वर्चस्व निर्माण केले.

हल्ली पत्येक पक्षामध्ये पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तीपूजेला अधिक महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षातल्या नेत्यालाच अधिक महत्त्व आहे. भाजपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कारकिर्दीत तो प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या भूमिकेमुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील दुखाविला गेला. हे मोदी यांच्या लक्षात आल्यानंतर पुन्हा त्यांनी संघासमोर लोटांगण घातले आणि जुळवून घेण्याचा पयत्न केला. सांगण्याचे तात्पर्य भाजपमध्ये एकदा निर्णय झाला की तो बदलला जात नाही आणि कोणी बंडखोरी अथवा दबावतंत्र वापरत असेल तर त्याला थारा मिळत नाही. भाजपमधील माजी मंत्री एकनाथ खडसे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतील क्रमांक एकवर असणारे नेते होते. मात्र, त्यांनी अप्रत्यक्ष पक्षश्रेष्ठींनाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला. आज साडेचार वर्षे झाली त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेच नाही. केवळ आशेवर ठेवले. हे भाजपमधील मोठे जीवंत उदाहरण आहे. पक्षापेक्षा मोठे कोणीही नाही. जगताप यांनाही साडेचार वर्षे असेच झुलवत ठेवले. कारण, त्यांचा हा काळ भाजपमधील परिक्षेचा आहे. या परिक्षेत ते उत्तीर्ण झाले आणि भविष्यात राज्यात भाजपची सत्ता आली तर जगताप यांना निश्चित संधी असेल.

मडिगेरी यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून राजकारणात उलटसुलट चर्चा असून जगताप यांनीच राजकारण करून मडिगेरी यांना अध्यक्षपदावर बसविले असा अनेकांचा दावा आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. मडिगेरी हे स्थायी समितीचे सदस्य असताना तीन महिन्यांपूर्वीच अध्यक्षपदाची संधी मिळणार याची त्यांना खात्री होती. विशेष म्हणजे स्थायी समितीमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येकाला संधी दिली जाईल असा स्थानिक पातळीवर निर्णय झाला असताना मडिगेरी यांना पुन्हा सदस्यपदाची संधी का दिली? याचाच अर्थ त्यांना अध्यक्षपदी पक्षश्रेष्ठी संधी देणार हे यावरून स्पष्ट होते. मात्र, याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. मडिगेरी यांना जमेत धरले नाही. या पदासाठी इच्छुक असलेले दुसरे उमेदवार शीतल शिंदे यांनी आपल्या नातेवाईक आ. माधुरीताई मिसाळ यांच्यामार्फत जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यांनी गेल्यावेळेस स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतरही त्यांना पुन्हा यावर्षी संधी दिल्यामुळे अध्यक्षपदाची संधी शिंदे यांनाच मिळणार असा अंदाज अनेकांनी बांधला. ज्यावेळी स्थायी समितीचे उमेदवारी अर्ज दाखल करताना मडिगेरी आणि शिंदे नगरसचिव विभागात गेले त्यावेळी मोठे समर्थक घेऊन आलेले शिंदे आणि समर्थक न घेता आलेले मडिगेरी हे पाहिल्यानंतर असा भास झाल की, शिंदे हेच उमेदवार आहेत. मात्र, ज्यावेळी अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या सह्या घेऊन मडिगेरी यांनी स्वाक्षरी केल्यानंतर त्यांच्या अर्जावर पक्षनेत्यांनी अध्यक्षपदाचे उमेदवार नाव लिहिल्यानंतर त्याठिकाणी मोठा राजकीय दणका बसला. मात्र, हे घडले कसे याचा ठावठिकाणा कोणालाच लागला नाही.”
 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content