Details
बोलीभाषा एकांकिका स्पर्धा : नवोदितांसाठी हक्काचं व्यासपीठ!
01-Jul-2019
”
गजानन तुपे, वरिष्ठ रंगकर्मी
[email protected]
“असे म्हणतात की, भाषा दर पंचवीस मैलावर बदलते”. त्याचा प्रत्यय आपल्याला आयुष्यात येत असतो. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात भाषेचा वेगवेगळा ‘हेल’, वेगवेगळे शब्द आणि ते बोलण्याची वेगळी पद्धत अस्तित्त्वात आहे. मूळ मराठी भाषा, पुण्यात बोलली जाणारी शुद्ध नागरी भाषा, पश्चिम महाराष्ट्रात बोलली जाणारी राकट आणि रांगडी घाटी भाषा, खानदेशी गंध असलेली अहिराणी भाषा, गोडवा आणि उपहासाने ऐकणार्यााला वेड लावणारी मालवणी भाषा, कोकणी भाषा, पुणे जिल्ह्यात अहमदनगर विभागात बोलली जाणारी नगरी भाषा, त्याच्याजवळपासची जुन्नरी भाषा, असे भाषेचे वेगवेगळे पैलू आपल्या सर्वांना पाहवयास मिळतात. स्थलपरत्वे त्या-त्या ठिकाणी तेथील जनमानसात स्थानिक भाषांचे स्थान अजूनही मनात ‘अभेद्य’ आहे.
कोणताही मराठी माणूस आपल्या विभागात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेतून उत्तमप्रकारे व्यक्त होऊ शकतो. हीच गोष्ट डोक्यात ठेवून नवोदित रंगकर्मींसाठी चार वर्षांपूर्वी बोलीभाषा एकांकिका स्पर्धांचे संयोजन करण्यात आले होते. मराठी मुलखातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन होण्यासोबतच ग्रामीण भागातील कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे अशी त्यामागे संकल्पकांची मनीषा होती.
संकल्पना, आयोजन आणि प्रतिसाद
नामवंत, ज्येष्ठ लेखक, “वस्त्रहरण”कार गंगाराम गवाणकर यांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भाषांचे जतन आणि संवर्धन व्हावे, त्यासोबत तेथील कलाकारांना व्यासपीठ मिळावे म्हणून बोलीभाषेतील एकांकिका स्पर्धा आयोजित करावी अशी संकल्पना मांडली. त्या संकल्पनेची सुरूवात चार वर्षांपूर्वी बोलीभाषा एकांकिका स्पर्धेतून झाली. सुप्रिया प्रॉडक्शनचे सर्वेसर्वा नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण यांनी ही संकल्पना उचलून धरली आणि विविध बोली भाषेतील एकांकिकांची स्पर्धा भरवण्यात आली. आज या घटनेला चार वर्षं पूर्ण होतील. यादरम्यान महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग या स्पर्धेला मिळू लागला. यावर्षीही गोविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया चव्हाण यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये सुमारे चाळीस एकांकिका प्राथमिक फेरीसाठी आल्या. त्यातील अंतिम फेरीसाठी फक्त सहा निवडायच्या होत्या. मात्र, स्पर्धा इतकी अटीतटीची होती की परीक्षकांना त्यातील नऊ एकांकिकांना अंतिम फेरीसाठी पात्र ठरवावं लागलं. प्राथमिक फेरी एकापेक्षा एक दमदार परफॉर्मन्स, नवनवीन कल्पना, वेगळा आशय आणि विषय असलेल्या एकांकिका यांनी जबरदस्त गाजली. प्राथमिक फेरीसाठी अभिनेता/दिग्दर्शक सुदेश म्हशीलकर आणि अभिनेता/लेखक भरत सावले यांनी काम पाहिले.
सोमवारी रंगणार अंतिम फेरी
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी सोमवारी १ जुलैला मुंबईत बोरीवलीत रंगणार आहे. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह येथे सकाळी अकरा वाजल्यापासून एकापेक्षा एक दमदार अशा नऊ एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. रंगभूमीवर काहीतरी करून दाखवण्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा असणाऱ्या, विशेषता ग्रामीण भागातील रंगकर्मींच्या दमदार अभिनयाचा कस तिथे लागणार आहे. एकांकिका विविध विषयांवरील असल्यामुळे आणि आशयघन असल्याकारणाने नाट्यशौकिनांसाठी ही एक पर्वणीच ठरेल, यात शंका नाही. अंतिम फेरीतील एकांकिकांची यादी, त्यांची नावे आणि आणि त्या कुठल्या जिल्ह्यातील आणि कुठल्या भाषेतील स्पर्धकांनी सादर केल्या आहेत ते पाहिल्यावरच या अंतिम फेरीत नेहमीपेक्षा वेगळे काहीतरी पाहयला मिळणार, हे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही. अंतिम फेरीतील एकांकिकांची यादी पुढीलप्रमाणे :-
१) संस्था:- नांदी कलामंच
एकांकिका:- निवेद
भाषा:- घाटी
२) संस्था:- सृष्टी (औरंगाबाद)
एकांकिका:- कडुतात्या
भाषा:- मराठवाडी
३) संस्था:- नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव
एकांकिका:- हलगी सम्राट
भाषा:- खान्देशी तावडी
४) संस्था:- रॉ प्रॉडक्शन्स
एकांकिका:- डॉल्बी वाजलं की धडधड
भाषा:- जुन्नरी
५) संस्था:- अत्रेया (अंबरनाथ)
एकांकिका:- पडस का
भाषा:- अहिराणी
६) संस्था:- कलांश थिएटर्स
एकांकिका:- बिराड
भाषा:- वऱ्हाडी
७) संस्था:- सत्कर्व (मुंबई)
एकांकिका:- बायल करी घायल
भाषा:- मालवणी
८) संस्था:- फोर्थ वॉल (ठाणे)
एकांकिका:- चकवा
भाषा:- घाटी
९) संस्था:- नाट्यमल्हार (अहमदनगर)
एकांकिका:- रंगबावरी
भाषा:- अहमदनगरी”
“गजानन तुपे, वरिष्ठ रंगकर्मी