Details
बुश पर्वाची अखेर
01-Jul-2019
”
प्रसाद केरकर, मुख्य संपादक, दै. कृषिवल
[email protected]
अमेरिकेचे माजी अध्यश जॉर्ज बुश (सिनीयर) यांच्या निधनामुळे बुश पर्वाची अखेर झाली असे म्हणता येईल. खरे तर जॉर्ज बुश यांना अध्यक्षपदाची एकच टर्म मिळाली होती. परंतु त्यांच्या चार वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत जगात महत्वाच्या घडामोडी घडल्या. त्यामुळे त्यांच्या कालखंडाला महत्त्व प्राप्त होते. अमेरिकन नौदलात पायलट असलेले व दुसर्या महायुध्दात सहभागी झालेले ते एकमेव अमेरिकन अध्यक्ष ठरले. युध्द त्यांनी प्रत्यशात अनुभवले असल्याने त्याचे वाईट परिणाम पाहिले होते. परंतु अध्यक्षपदी आल्यावर त्यांनी जगातील युध्दखोरीला प्रोत्साहनच दिले. इराकचे युद्ध हे त्याचे एक उत्तम उदाहरण होते. इराकने कुवैतवर चाल केल्यावर बुश यांनी जगातील लोकशाही धोक्यात असल्याचा कांगावाकेला आणि 90 साली अमेरिकन दोस्त राष्टांची फौज उभारून इवल्याश्या इराकला संपविण्याघाट घातला. यामागे त्यांचे लोकशाही प्रेम नव्हते तर तेथील तेल विहिरींवर डोळाहोता. त्याचा हा छुपा अजेंडा जगापासून काही लपून राहिला नाही.
बुशयांची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती. अमेरिकन संसदेत त्यांनी प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर अमेरिकेचे संयुक्तराष्ट संघटनेचे अँम्बेसेडर, अमेरिकेचे चीनमधील प्रतिनिधी, सी.आय.ए.चे संचालक,दोन टर्म अमेरिकेचे उपाध्यक्ष व एकदा अध्यक्षपद अशी अनेक पदे भूषविली. त्यांनी चीनमध्ये काम केलेले असल्यामुळे त्यांना आशिया खंडाची भौगोलिक व राजकीय माहिती होती. चीनची वाढत जाणारी ताकद त्यांनी पाहिली होती. परंतु उपराष्टाध्यक्ष व राष्टाध्यक्षपदी असताना भारताला कधीच झुकतेमाप दिले नाही. नेहमी ते पाकिस्तानच्या बाजूने ते राहिले. त्यादृष्टीने पाहता ते भारताचे कधीच मित्र नव्हते. अर्थात तेव्हाच्या शीत युध्दाच्या काळात याहून वेगळी भूमिकाही अमेरिकेकडून अपेक्षित नव्हती. त्यांनी शीतयुध्द पाहिले व या कालखंडातील ते अमेरिकेचे शेवटचे अमेरिकन अध्यक्ष ठरले
शीतयुध्दानंतरचा त्यांना फारसा कालावधी मिळाला नसला तरीही त्यांनी शीतयुध्द संपविण्यासाठी तत्कालीन सोव्हिएत युनियनशी वाटाघाटी केल्या व एका नव्या पर्वाची नांदी केली. त्यासंदर्भात त्यांचे कार्य ऐतिहासिकच होते. 1988 साली बुश अध्यक्षस्थानी आले त्यावेळी भारतीय राजकारणाचा पोत बदलत चालला होता. बोफोर्सच्या वादानंतर काँग्रेसचे सरकार सत्तेवरून बाहेर फेकले गेले होते. मंदीर व मंडलच्या राजकारणाच्या त्या पार्श्वभूमीवर नॅशनल फ्रंटचे सरकार सत्तेत आले होते. हे सरकार काही स्थिर नाही याची कल्पना बुश यांना पूर्णपणे होती. इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर अमेरिकन सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते अंत्यविधीला हजरही होते.सोव्हिएत फौजांची अफगाणिस्तानातून माघार सुरू झाल्यावर त्यांनी पाकिस्तानला सर्वतोपरी पाठिंबा दिला हे वास्तव आपण मान्य केले तरी त्यांनी पाकिस्तानच्या हाती अण्विक शस्त्रे लागणार नाहीत याची खात्री बाळगली. परंतु भारताच्या सांगण्यानुसार, त्यावेळी खूप उशिर झाला होता. कारण त्यापूर्वीच पाकने अणू तंत्रज्ञान हस्तगत केले होते. रेगन प्रशासनाच्या काळापासून भारत-अमेरिकेचे संबंध सुधारण्यास सुरूवात झाली होती. शीतयुध्दानंतर भारताला ते संबंध आणखी सुधारण्यात रस होता. परंतु बुश सरकारने त्याला फार मोठीकाही चालना दिली नाही. बुश प्रशासनाने पाकला आर्थिक मदत तसेच शस्त्रसज्ज करण्यात कोणतीही कसर बाकीठेवली नाही. 89 साली भारत-पाकमधील संबंध ताणले गेले असताना बुश प्रशासनाने दिल्ली वइस्लामाबादला आपला प्रतिनिधी पाठवून तणाव निवळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. अमेरिकेनेअशा प्रकारे थेट केलेला हा उभय देशातील पहिला हस्तक्षेप होता.
आखाती युध्दाच्यावेळी त्यावेळी असलेल्या व्ही. पी. सिंग व चंद्रशेखर यांच्या सरकारने अमेरिकन लढाऊ विमानांना मुंबईतून तेल भरण्यास परवानगी दिली होती. भारत सरकारने दिलेल्या या परवानगीबद्दल बरेच काहूर उठणे त्या काळात स्वाभाविकच होते. परंतु ही परवानगी मिळविल्याने बुश सरकारचा हा एक मोठा राजकीय विजय म्हटला गेला. अलिप्तराष्ट चळवळीचे एकेकाळी नेतृत्त्व करणार्या भारताने अशा प्रकारे अमेरिकन विमानांना परवानगीदेणे चुकीचेच होते. परंतु त्यावेळी भारतात राजकीय दृष्ट्या दुबळ्या असलेल्या विरोधकांच्या सरकारकडून अमेरिकाविरोधी ठाम भूमिका घेणे अपेक्षितच नव्हते. बुश सीआयएचे संचालक असताना तसेच अध्यक्षपदी असताना त्यांनी अनेक देशात थेट हस्तक्षेप केले. इराकवरील कारवाई हीत्यांच्या काळातील सर्वात काळीकुट्ट घटना ठरावी.
सोव्हिएतयुनियनचे शेवटचे अध्यक्ष मिखाईल गोर्बोचेव्ह यांच्यासोबत त्यांनी हस्तांदोलन करून 91 साली शीतयुध्द संपविण्याचा केलेला करार हीदशकातील एक महत्त्वाची घटना ठरली. एवढा महत्त्वाचा करार करूनही त्यांचा लगेचच पुढच्या वर्षी 92 साली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी सत्तेत येण्यापूर्वी त्यांनी कर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले नाही, उलट करवाढ केली त्यामुळे अमेरिकन जनतेने त्यांना घरीबसवले. शेवटी त्यांना एकच टर्म सत्ता गाजविता आली. हे त्यांचे सर्वात मोठे अपयश. आपल्याकडे 50 वर्षे राज्य करण्याची घोषणा करणार्या भाजपाच्या सत्ताधार्यांनी हे उदाहरण जरूर पाहावे व यातून बोध घ्यावा. बुश हे कुटुंबवस्तल अध्यक्ष म्हणून ओळखले गेले. त्यांच्या पत्नी बार्बारा यांच्यासमवेत तब्बल 73 वर्षे संसार केला. तसेच त्यांचा मुलगाही पुढे अमेरिकेचे अध्यक्ष झाले. अशा प्रकारे बाप-मुलगा यापदावर पोहोचणारे ते दुसरे अध्यक्ष. बुश यांच्या जाण्याने एका महत्त्वाच्या पर्वाचा अस्त झाला आहे.”
“प्रसाद केरकर, मुख्य संपादक, दै. कृषिवल