Details
बीडीडी चाळींच्या पुनर्वसनासाठी दर महिन्याला आढावा – मधु चव्हाण
01-Jul-2019
”
कामात व्यत्यय आणणाऱ्यांसाठी ऑर्डीनन्स काढणार
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाच्या कामाला गती मिळावी म्हणून प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला म्हाडामध्ये आढावा बैठक घेण्यात येणार असून या पुनर्वसनाच्या कामात अडथळा आणणाऱ्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी २३ मेनंतर अध्यादेश काढण्यात येणार असल्याची माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती मधु चव्हाण यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
बीडीडी चाळीच्या रहिवाशांना संक्रमण शिबिरात जागा देण्यात येणार असून ३० महिन्यात ते त्यांच्या पुनर्वसनाच्या जागेत राहण्यास जातील. ५०० चौ.फूट जागा प्रत्येक गाळेधारकांना देण्यात येणार असल्याचे मधु चव्हाण यांनी यावेळी सांगितले. विशेष म्हणजे पुनर्वसन होणाऱ्या रहिवाशांचे मेंटेनंस दहा वर्षे म्हाडा भरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
नायगाव बीडीडी चाळीतील पुनर्वसन गाळ्याची संख्या निवासी ३३८९ व अनिवासी ५५ आहे. पुनर्वसन इमारत २३ मजल्यापर्यंत आणि विक्रीयोग्य इमारत ६० मजल्यापर्यंत असणार आहे, अशी माहिती देऊन चव्हाण यांनी मध्यम उत्पन्न गटासाठी १,४०८ विक्रीयोग्य गाळे, उच्च उत्पन्न गटासाठी ४४८ गाळे, तर व्यापारी क्षेत्रासाठी २१,४५५.९१ चौ.मी. जागा उपलब्ध आहे. ना. म. जोशी मार्ग, लोअर परळ बीडीडी चाळीत निवासी गाळे २,४५६ व अनिवासी गाळे २४ असतील. यामध्ये मध्यम उत्पन्न गटासाठी ७२८ गाळे तर उच्च उत्पन्न गटासाठी ५४० गाळे आणि व्यापारी क्षेत्रासाठी २६, ६३६ चौ. मी. जागा मिळणार आहे. वरळी बीडीडी चाळीत निवासी गाळे ९,३१४ तर अनिवासी गाळे २९५ असतील. वरळी बीडीडी चाळी प्रकल्पात विक्रीयोग्य मध्यम उत्पन्न गटाना ३,२२४, उच्च उत्पन्न गटासाठी १,७७२ गाळे असतील. या प्रकल्पात ९८,०१४ चौ.मी. व्यापारी क्षेत्रासाठी उपलब्ध असणार आहे, असे चव्हाण म्हणाले.”
“कामात व्यत्यय आणणाऱ्यांसाठी ऑर्डीनन्स काढणार