HomeArchiveबचतीची गरज आणि...

बचतीची गरज आणि महत्त्व

Details
बचतीची गरज आणि महत्त्व

    26-Nov-2018

| 5

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनायक कुळकर्णी, ज्येष्ठ गुंतवणूक समुपदेशक

आज प्रत्येकाच्या आयुष्यात आर्थिक व्यवहार कायम घडत असतात. आपण कितीही शिकलो सवरलो तरीही काही छोट्या छोट्या बाबी लक्षात न आल्याने किंवा समजून न घेतल्याने एकतर फसवले गेलो असू किंवा फासले गेलो असू. आपल्या जीवनात पदोपदी घडणार्‍या व्यवहारांबद्दल ना नीटपणे कधी शाळेत शिकवले गेले की ना कधी महाविध्यालयात अभ्यासक्रमात आणले गेले. परिणामी आर्थिक व्यवहार-गुंतवणूक प्रक्रिया क्लिष्ट आणि गहन ठरून आर्थिक निरक्षराना सहज फसविण्याचे मोठे उद्योग उभे केले गेले. दोन दशकापूर्वी सी यू मार्केटिंग, सी आर भन्साळी यांनी गुंतवणूक क्षेत्र ढवळून काढले होते. तरीही आपण शहाणे न होता कल्पवृक्ष, गोल्डन चेन, सिटी लिमोझिन, सारख्या कंपन्यांच्या भुलथापाना बळी पडलो. तरीही आपण यातून बोध न घेऊन सहा वर्षापूर्वी स्पीक आशिया या सिंगापूर स्थित कंपनीच्या जाळ्यात अडकलो. २०१४ मध्ये बाहेर आलेला क्यु नेट कंपनीचा घोटाळा किती कोटींचा आहे याचा शोध चालू आहे. अशा अनेक कंपंनीच्या जाळ्यात अडकणारे गरीब अशिक्षित जसे आहेत तसेच उच्च विद्याविभूषित व्यावसायिक श्रीमंत लोकही आहेत. या लबाड कंपन्यांच्या आमिषाला बळी पडून सर्वस्व गमावलेले बरेच लोक समाजात आढळतील. अर्थात अपराध केवळ त्या चोर कंपन्यांचा आहे असे नव्हे तर त्यांना चोरी करायची संधी आपणच मिळवून दिलेली असल्याने आपण सुद्धा तितकेच दोषी आहोत. जास्त उत्पन्न दराच्या आमिषाला बहुसंख्य लोक बळी पडू शकतात हे आपण वेळोवेळी सिद्ध केल्यानेच अशा कंपन्या अचानक उगवून आकस्मिकपणे गायबही होतात.  प्रत्येक आर्थिक व्यवहार असो वा गुंतवणुकीची प्रक्रिया असो किंवा आयकर संबधित बाबी असोत ते नीटपणे समजून उमजून आणि पूर्ण माहिती घेऊन केले तर किमान सुशिक्षित लोक तरी अशा घोटाळ्याबाज कंपन्यांपासून स्वत:ला दूर ठेवतील असा विश्वास वाटत आहे.

आपण ‘बचत’ का करतो? या प्रश्नाला अनेक उत्तरे मिळू शकतात. मुलांच्या शिक्षणापासून ते मुलीच्या लग्नासाठी, …… फ्रीज,टीव्ही,स्कूटर घेण्यापासून ते घर-गाडी घेण्यासाठी……वैद्यकीय औषधोपचारांपासून ते वृद्धापकाळच्या सोयी-सुविधांपर्यंतचे अनेक हेतु मनाशी धरून बचतीचे उद्दीष्ट ठरविले जात असते. परंतु अडीअडचणीला वेळ पडल्यास हाताशी रक्कम असावी या मुख्य हेतूनेच आपण बचत करीत असतो. प्रत्येक व्यक्तीची आणि कुटुंबाची जीवनपद्धती, राहणीमान आणि उत्पन्न कमविण्याची क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या त्याच्या गरजेनुसार बचत करण्याचा प्रयत्न करीत असतो. केवळ मनुष्य प्राण्यालाच उद्याची चिंता असते. या उद्यासाठीच मनुष्य त्याने जोपासलेल्या संग्राहकवृत्तीचा वापर करून धान्य, चीज वस्तु, टिकाऊ खाद्यपदार्थ आणि पैसे यांची साठवणूक करत असतो. खरं म्हणजे या संग्राह्य करण्याच्या वृत्तीच्या किंवा बचत करण्याच्या सवयीमागे स्वत:च्या आशाश्वत जीवनाला एक प्रकारचे आर्थिक संरक्षण देण्याचाच हेतु असतो. बहुसंख्य लोकांची बचत ही गरज असते. काहीजण मात्र ऐहिक सुखाच्या अपेक्षेने बचत करीत असतात. बचत करण्यासाठी निग्रह लागतोच,पण तेवढीच चिकाटीसुद्धा आवश्यक असते. वर्तमानाचे भान ठेवत भविष्यातील गरजेची तरतूद करण्याची एक दूरदृष्टी अंगी बाळगावी लागते. बहुसंख्य लोकांकडे ही दूरदृष्टी कमीअधिक प्रमाणात असतेच.

बचतीला फाटे फोडून अनेक गोष्टीत रुपयांची उधळण चालू असते. अर्थात यात आपल्याला असलेल्या व्यसनांचा पहिला क्रमांक आहे. छानषौकीच्या गोष्टी, पाहुण्यांचे अतिक्रमण, आकस्मिक आजारपण-अपघात या बाबींसह घरगुती खर्चसुद्धा वाढत असतात. या सर्वांचा परिणाम बचतीवर होऊन अडीअडचणीला लोकांपुढे हात पसरावे लागतात.

प्रत्येकाने स्वत:चा उत्पन्न स्रोत सुरू झाला की किमान पाच ते दहा टक्के रक्कम कमी मिळाली असेच समजून बचतीकडे वळवली तरच आपली आर्थिक उद्दीष्टपूर्ती होण्यास वेळ लागणार नाही. पहिल्या उत्पन्नाच्या स्रोतापासूनच आपल्या खर्चाची नोंद करून त्या खर्चाचे विश्लेषण केल्यास अनावश्यक खर्च टाळले जाऊन बचतीच्या प्रमाणात भर पडून त्या बचतीची योग्य गुंतवणूक होऊ शकेल.”
 

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content