Details
प्रचार आणि पंचनामा
01-Jul-2019
”
शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
निवडणुका समोर दिसायला लागल्या की प्रचाराला भर येतो. म्हणजे तारीख जाहीर झाली की प्रचारसभा आणि रणधुमाळीचा माहोल. पण त्याआधीही कितीतरी दिवस, आठवडे निवडणुकांचे वेध लागलेले असतात. मग तेव्हा सुरू असतो छुपा प्रचार. कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरकार कसे निकामी ठरले आहे, कुचकामी ठरले याची जंत्री विरोधकांकडे तयारच असते. त्यांची तोफ सुरू होते आणि त्याचवेळी सत्ताधारी पक्षाकडून त्यांनी केलेली कामे, उपक्रम, लोकांनी दिलेले धन्यवाद, लोकांच्या जीवनात उजळलेला प्रकाश असे काय काय सांगितले आणि दाखवलेही जाते. मग सरकारी खर्चाने दिनदर्शिका काढल्या जातात. शासकीय वासऱ्या तथा डायऱ्या प्रसिद्ध होतात. तिथे सरकारी उपक्रमांची जाहिरातबाजी असतेच पण विरोधकांच्या सत्ताकाळातील दाखले देऊन तुलना करून विरोधकांचे सरकार कसे मागे होते, निष्प्रभ होते हे दाखवले जाते. ऐतिहासिक कर्जमाफीचे दाखले दिले जातात, विद्युतीकरणाची आकडेवारी फेकली जाते, जलसिंचन योजना, निवास योजना या सगळ्या योजनांचे धवल यश समोर मांडले जाते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात करत होते तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी मुख्यमंत्री बोलतोय.. म्हणून राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. आता सरकारने लोकसंवाद कार्यक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमातून जिल्ह्याजिल्ह्यांत, गावागावांतील शेतकऱ्यांशी, सरकारी योजनांच्या लाभार्थींशी संवाद साधत आहेत. फडणवीस आणि या लाभार्थींमधील संवाद ऐकण्यासारखा, पाहण्यासारखा असतो. नुकताच ठाणे जिल्ह्यातील लाभार्थींशी फडणवीस यांचा संवाद झाला होता. त्यावेळी ग्रामीण भागातील गोरगरीब महिलांनी पंतप्रधान घरकूल योजनेतून, अन्य सरकारी योजनेतील वित्तसहाय्यामुळे हक्काचे घरकूल मिळाले, डोक्यावर छप्पर आले याबद्दल सरकारला भरभरून धन्यवाद दिले होते. लोकसंवाद कार्यक्रमाचे साधारणपणे स्वरूप हेच राहिले आहे. यामुळे आता त्यात सरकारी खर्चाने प्रचार सुरू असल्याचा भास होऊ लागला आहे. साहेब तुमच्यासारखं मायबाप सरकार नाही… तुमच्या योजनांनी आमचं आयुष्य बदलून टाकलं… कर्जमाफी मिळाल्याने कुटुंब खूश आहे… अशा चिक्कार प्रतिक्रियांचा पाऊसच या कार्यक्रमातील ‘निवडक’ मंडळी ऐकवत असतात आणि समोर व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे पडद्यावरून संवाद साधणारे फडणवीस समाधानाने तुडुंब होतात, स्मितहास्य करतात हे नेहमीचे परिचित चित्र.
आपलं महानगरने दिलेल्या वृत्तानुसार, नाशिकलाही हाच गोड गोड बोला.. कार्यक्रम नुकताच रंगला होता. याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजवर हे सारे लाईव्ह सुरू होते. तिथे मात्र शासन आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या कारभाराचे धिंडवडे काढण्यात आले. ज्या राज्याला स्वतंत्र कृषीमंत्री नाही ते शेतकऱ्यांचे काय भलं करणार? शेतकऱ्यांच्या खात्यात १५ लाख रुपये कधी पडतील? शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी अजून किती वेळ वाट बघावी लागणार? अशा हजारो प्रतिक्रिया या पेजवर वेगाने उमटत होत्या. ‘सीएमओ महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवर हे सारे सुरू होते. ‘खोटारडे मुख्यमंत्री’, ‘बोलबच्चन’ ‘सरकार बदला, शेतकऱ्यांची दशा बदलेल अशी तिखट शेरेबाजी सुरू होती. इतकेच नाही तर याच कार्यक्रमावेळी ‘फेकू नंबर वन मुख्यमंत्री’ अशी उपाधीही बहाल करण्यात आली. सरकार आणि भाजपाच्या दृष्टीने हा प्रचार फसलाच हे आता दिसू लागले आहे.
अर्थात अशा शेलक्या प्रतिक्रिया या सर्वच काही सर्वसामान्यांच्या नसतात हे आपणही जाणतो. भाजपाचा जसा आयटी सेल, संगणककुशल कार्यकर्ते आहेत तसेच आता विरोधी पक्षांकडेही आयटी आर्मी आहे. कार्यकर्ते आहेत. या शेरेबाजांपैकी अधिकांश मंडळी हीच असण्याची दाट शक्यता आहे. यापैकी अनेक शेरे हे राजकीय हेतूने प्रेरीत असणार हे उघड आहे. तरीही या संवादात निवडलेल्या लोकांना आधीच पढवण्यात येते, दिग्दर्शितही करण्यात येते हे लपून राहिलेले नाही. मुख्यमंत्र्यांची खप्पा मर्जी नको म्हणून अधिकारीवर्गच या संवादात सहभागी लाभार्थ्यांना आधीच प्रशिक्षित करत असतो. शासकीय योजनांविषयी चांगले तेच बोला, अन्यथा मुख्यमंत्रीसाहेब चिडतील. चांगल्या योजना बंद होतील, असेही सांगण्यात येते.
मराठवाड्यात आणि एकूणच राज्यात शेतकरी चिंतेत असताना, बहुसंख्य शेतकरी सरकारी कारभाराची वाखाणणी करतील हे पटणारे नाही. ज्यांना हे पटले नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजवर मोर्चा वळवला असणार. तिथे मन की बात कॉमेंट बॉक्समध्ये उमटवत अनेकांनी भाजपा आणि सरकारचा निषेध नोंदवला. खोटी आकडेवारी जाहीर नका करु… आम्हाला बँका जवळ येऊ देत नाहीत… मी प्रामाणिकपणे कर्ज भरले म्हणून मला कर्जमाफी मिळाली नाही का?.. सरकार बदला, शेतकऱ्यांची दशा बदलेल.. मुद्रा लोन मिळतच नाही…एखादा लोकसंवाद बेरोजगारांचा घ्या…या आणि अशा असंख्य कॉमेंट्स त्यावेळी पेजवर उमटत होत्या. आताही जर फडणवीस यांच्या फेसबुक पेजवर डोकावले तर विविध प्रश्नांची सरबत्तीच केलेली आढळते. प्रचारासाठी जनतेला सामोरे जाताना याच पंचनाम्याची उत्तरे सत्ताधारी नेत्यांना द्यावी लागणार आहेत. आणि वेळ अगदी थोडा उरला आहे..”
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान