Details
पवित्र भगवा हाती घेणारा मावळाच दिल्लीत पाठवा – उद्धव ठाकरे
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
आता धुळवडीनंतर वेगवेगळे रंग उधळले जातील. पवित्र भगवा घेऊन आपण पुढे जात आहोत. या ठिकाणाहून युतीचे सर्व खासदार दिल्लीत जाणार आहेत. संपूर्ण राज्य आम्ही जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आईकडे एकच मागितले. कोल्हापुरातील भगवा हातात घेतलेला खासदार दिल्लीत पाठवण्याचे साकडे घातले. देवी मला पावणार. हा आम्हाला मिळालेला कौल आहे, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी कोल्हापूरमध्ये शिवसेना-भारतीय जनता पार्टी महायुतीच्या प्रचाराचा नारळ वाढवताना केलेल्या विराट जाहीर सभेत काढले.
कालच, रविवारी कोल्हापुराच्या आई भवानीचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच २०१४ मधील लोकसभा निवडणुकांच्या आखाड्यात असलेल्या साऱ्या मित्रपक्षांचे नेते, रामदास आठवले, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे, आदी यावेळी उपस्थित होते. त्यांचीही यावेळी भाषणे झाली. या सभेत उद्धव ठाकरे बोलत होते.
जेव्हा आपलं पटत नव्हते, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात संघर्षयात्रा काढली. आता युती झाल्यानंतर त्यांची अवस्था तर पंक्चर झालेल्या टायरसारखी झाली आहे. शिवसेना आणि भाजपने युती का केली, याचे उत्तर देण्याची गरज नाही. आपण भाषण नाही केले तरी चालले. आपण एकत्र यावे ही राज्याची इच्छा आहे. समजा, दुर्देवाने त्यांच्याकडे सत्ता गेली तर त्यांच्याकडे कुठला चेहरा आहे. आमच्याकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरला आहे. आमच्याकडे मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरलेले आहेत. पवार यांनी माघार घेतली आहे. मायावतींनी माघार घेतली आहे. पाकिस्तानमध्ये खेळाडू पंतप्रधान झालेले आहेत. रिकामी खुर्ची दिसली की पवार त्यावर बसतात. आम्ही खुर्चीचे वेडे नाही. आम्हाला सत्ता पाहिजे. गोरगरीब जनतेचे भले करण्यासाठी खुर्ची पाहिजे. देव, देश आणि धर्मासाठी युतीची गरज आहे. राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता. पुन्हा सत्ता आल्यास राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावू, असे ते म्हणाले.
आम्ही हिंदू आहोतच. जो धर्म आम्हाला गाडगे बाबांनी सांगितला. मानवतावाद धर्मासाठी आम्ही युती केली आहे. अनेक गोष्टींसाठी आम्ही युती केली आहे. विरोधी पक्ष सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागतात. शरद पवार म्हणाले की, हल्ला करण्याचा सल्ला मी दिला होता. तोच हल्ल्याचा पुरावा आहे. त्यांनी सांगावे नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान आहेत. ते त्यांनी जाहीर करावे. राष्ट्रवादीला मतदान करायचे असेल तर अजित पवार धरण कसे भरून देतात याची जाणीव ठेवा. दुष्काळात महाराष्ट्र शासन चांगले काम करत आहे. जीवाभावाच्या माणसांना पुन्हा सत्तेत बसवायचे असेल तर त्यासाठी युती केली. शेतकरी, मुंबईतील प्रश्न मुख्यमंत्र्यांनी मार्गी काढले. मला मुख्यमंत्र्यांचा अभिमान वाटतो. तुम्ही दिलेला शब्द पाळला आहे. सदाभाऊ तुमची तोफ मला हातकणंगलेमध्ये पाहिजे. यावेळी दोन्ही ठिकाणी भगवा फडकला पाहिजे. हा भगवा लोकसभा आणि विधानसभेत फडकला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकांचा सभेला जमलेला जनतेचा महासागर महायुतीच्या विजयाची ग्वाही देत आहे. कोल्हापूर शक्तिपीठ आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. ज्याप्रकारे या देशात मागील पाच वर्षांत मोदींच्या नेतृत्त्वात परिवर्तन आपण घडवले आहे, ते पुढे नेण्यासाठी आई अंबेचा आशीर्वाद घेण्यासाठी याठिकाणी सभा घेतली आहे. चंद्रपूरपासून कोल्हापूर, गडहिंग्लजपर्यंत भगवा फडकणार आहे. आघाडीत 56 पक्ष एकत्र आले. 56 पक्ष आहेत का? 56 पक्ष नव्हे तर 56 इंचाची छाती लागते. आम्ही पाच पांडव आहोत. आम्ही मजबूत आहोत. ये फेव्हीकॉलका जोड है. युती सत्तेसाठी नाही, ही युती विचारांची युती आहे. एका विचाराचे पक्ष आहेत, असे ते म्हणाले.
आमची भाषा सीमे पलिकडची..
होय, आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही. भाषा, सीमेच्या पलीकडचा हिंदुत्ववाद आहे. राष्ट्रवाद नावात नसून मनात राष्ट्रवाद आहे. राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन आम्ही एकत्र आलो आहोत. शिवशक्ती आणि भीमशक्ती म्हणजे राष्ट्रभक्ती. त्यांना आता उमेदवार मिळत नाही. कॅप्टनने माघार घेतली आहे. बारावा खेळाडू म्हणून काम करण्याची वेळ आली. तिकटे मागे देतात. रोज तिकीटे बदलली जात आहेत. जनतेने ठरवले आहे. महाराष्ट्रात एनडीएची सत्ता येणार आहे. पुन्हा युतीचे सरकार येणार. पाच वर्षांत मोदींच्या नेतृत्त्वात जे परिवर्तन झाले. यांनी गरीब हटावचे नारे दिले. गरीब हटली काँग्रेसच्या नेत्यांची, त्यांचा चेल्याचपाट्यांची. गरीबांसाठी मोदी सरकारने अनेक योजना राबविल्या. जनधन खात्यामुळे 34 कोटी खातेधारक मिळाले. केवळ खातेधारक मिळाले नाहीत तर, त्यात 80 हजार कोटी रूपये केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमांतून जमा केले. स्वच्छतागृहांची निर्मिती केली. प्रत्येक घरात शौचालय, उज्ज्वलाच्या माध्यमातून गॅस मिळाला. ऊर्जा, घरे देण्याचे काम सुरू आहे. गरीबाला जे आवश्यक आहे, ते देण्याचे काम केले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
देश बदलतो आहे. महाराष्ट्र बदलतो आहे. मी काँग्रेस-राष्ट्रवादीला खुले आव्हान देतो. 15 वर्षांपेक्षा आम्ही जास्त काम करून दाखवले आहे. रस्ते, पिण्याचे काम केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील समस्या सोडवण्याचे काम काँग्रेसने केले नाही. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आमच्यासमोर आकडे घेऊन यावे, आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त काम केले आहे. त्यांना दोन विभागात वाद घालायचा होता. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वाद झाला नाही. त्यांनी त्यांची तिजोरी भरली. सामान्य माणूस सामान्यच राहिला. जाणत्या राजाने ऊस, साखर कारखानदारांसाठी घेतले नाहीत तेव्हढे निर्णय मोदी सरकारने घेतले. चार वर्षांच्या कार्यकाळात कोणालाही आंदोलन करावे लागले नाही. ऊसावर संकट आले तेव्हा मोदींजींनी पॅकेज दिले. आजपर्यंत कोणीही केले नाही. ते मोदींनी केले. साखरेला किमान आधारभूत किंमत लागू केली. सिंचनाचे प्रकल्प असतील, सांगली, सोलापूर, सातारा येथील रखडलेले जलसिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे काम आमच्या सरकारने केले, असे ते म्हणाले.
या महाराष्ट्रात बोलघेवडी माणसे आहे. अलिकडे बारामतीचे पोपट बोलायला लागले. आमचे कपडे कोणी उतरवू शकत नाही. मुंबईत तुमची लंगोट उतरली. सुपारी घेऊन तुम्ही शांत राहा. मोदी सूर्यासारखे आहे. त्यावर थुंकल्यास आपल्या अंगावर येते. हे कोणी आपल्याशी मुकाबला करू शकत नाही. न खाने दूँगा ना खाऊँगा, भ्रष्टाचाराचा पैसा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. आता काही लोक राष्ट्रवादाचा कंपू सोडून त्यांच्यात समिल झाले आहेत. आमच्या सदाभाऊ खोत यांनी त्याला उत्तर दिले आहे. आम्ही हातकणंगलेमध्ये उमेदवार दिला आहे. पश्चिम महाराष्ट्राचा सामनादेखील 10-0 च्या फरकाने जिंकल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक दोन विचारधारेची निवडणूक आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्यांचा विचार करणारी विचारधारा आहे. काँग्रेस आणि त्यांचे कच्चे-बच्चे भारतीय सेनेबद्लल सवाल करत आहेत. त्यांनी चुल्लीभर पाण्यात बुडून मरायला पाहिजे. महाराष्ट्रातील सेना देव, देशासाठी लढते आहे, असेही त्यांनी सांगितले.
आमच्या राजकीय नेतृत्त्वात प्रत्त्युत्तर देण्याची क्षमता नव्हती. मुंबई हल्ल्याचा निषेध केला. यापलीकडे काहीही करू शकत नाही. पिट्रोडा म्हणाले की, त्यांच्यावर हल्ला कशाला करायचा? यांच्या मनामध्ये पाकिस्तानबद्दल संवेदना आहे. ये भारत घुसेगा भी और ठोकेगा भी.. असा नवा भारत आहे. आमच्या सैनिकाला उरीमध्ये मारले. आम्ही त्यांचे दहशतवादी तळ ठोकले. पुलवामामध्ये जवानांना मारले. त्यांच्यावर विमानाने हल्ला करून त्यांचे अड्डे नष्ट केले. आज सर्व जग आमच्याकडे पाहत आहे. भारत स्वाभिमानाने उभा आहे. याठिकाणी मजबूत सरकार द्यायचे आहे. बलशाली असे सरकार आणणार आहोत. आता केवळ मतदानाच्या दिवशी मतदान करा. ज्या दिवशी मतमोजणी असेल त्यादिवशी आपल्याला किती मताधिक्य मिळाले हे मोजा. आम्ही चुकलो तरी तुमच्याशी गद्दारी करणार नाही, सेही मुख्यमंत्री म्हणाले.”
“केएचएल न्यूज ब्युरो