Details
पराभवाचे खापर!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा जनतेने जबरदस्तरीत्या नाकारले आहे. 2014 च्या पराभवाची मिमांसा करताना सोनिया गांधींपासून ते मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि गुलाम नबी आझाद अशा सर्वच काँग्रेस नेत्यांनी विविध कारणे सांगितली होती. त्यामध्ये प्रमुख होते ते देशात आलेली मोदींची लाट. शिवाय, काँग्रेसच्या पाच वर्षांतली करभाराला लोक कंटाळलेले होते अशा पद्धतीची विश्लेषणेही काँग्रेसने केली. २०१४ ची ती लाट नंतर ओसरली असे अनुमान काँग्रेसने काढले होते. त्यामुळे 2018 पासून काँग्रेसच्या लोकसभा २०१९ च्या प्रचारमोहिमेने जोर पकडला. राहुल गांधींच्या हाती काँग्रेसची सूत्रे सोनिया गांधींनी सोपवली. त्याआधी दोन वर्षे ते पक्षाचे सारेच कामकाज पाहतच होते. फक्त प्रत्यक्षात अध्यक्ष बनले नव्हते. ते पद एकदा स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी आपणच देशाचे भावी नेते आहोत, पंतप्रधान आहोत या भूमिकेत प्रवेश केला.
तिकडे मोदींचे काम सावकाश पण निश्चित गतीने सुरू होते. जनतेच्या फार मोठ्या वर्गापर्यंत सरकारी योजना पोहोचत होत्या. लोकांच्या बँक खात्यांमध्ये सरकारी मदतीचा पैसा थेट जमा होत होता. त्याची कुठेच चर्चा होत नव्हती. त्यामुळेच काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष आणि समाज माध्यमांत क्रियाशील असणारा मोठा मोदीविरोधी वर्गही अशा मानसिकतेत होता की पाच वर्षांतील मोदी सरकारीची कामगिरी अतिशय निराशाजनक आहे. त्यांनी नोटाबंदी केल्याने व जीएसटी लावल्यामुळे मोदींसाठी २०१४ मध्ये मते देणारा मध्यमवर्ग व व्यापारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात दुखावला गेला आहे आणि तो वर्ग मोदींना या निवडणुकीत नाकारणारच आहे. शिवाय शेतकरी आत्महत्त्या, शेतीचे अन्य प्रश्न, वाढती बेकारी हे विषय आहेतच. मतांचे कुरण चांगले पिकणार हे अशा भ्रमात वावरणारे हे लोक काँग्रेस नेत्यांना अधिकाधिक बेसावध करत होते.
केंद्रातील सरकारच्या विरोधी जनमत तयार होतेच आहे, त्याचा लाभ सहाजिकच काँग्रेसला अधिक होणार आहे, या मानसिकतेमधून मोदींच्या व्यक्तीगत प्रतिमा मलीन करण्याच्या कामाला राहुल यांनी हात घातला. राफाल विमान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि राफालमध्ये तीसपासून साठ हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याचे आकडेही राहुल गांधींनी तोंडपाठ केले होते. हे असेच आहे असे राहुल वारंवार व ठामपणाने सांगू लागले. अनिल अंबानींना मदत व्हावी म्हणूनच मोदींनी राफाल करारात हस्तक्षेप केला असाही शोध त्यांना लागला होता. या सर्वाच्या आधारे स्वतःला देशाचे पाहारेकरी चौकीदार म्हणवणारे मोदी हेच खरे चोर आहेत असे विधान राहुल गांधी प्रत्येक सभेत, प्रत्येक मुलाखतीत करू लागले. चौकीदार चोर है हे मी म्हणत नसून जनतेचेच हे म्हणणे आहे हे पटवण्यासाठी त्यांनी एक कथाही रचली. बिहार युपीमधील माझ्या सभेमध्ये तरूणांनी एका कोपऱ्यातून चौकीदार चोर है अशी जी घोषणा दिली तीच मी उचलली असे राहुल सतत सांगत होते. पण त्यांच्या या घोषणेचा उलटा परिणाम झाला. मोदींनी ठासून सांगितले की, “होय! मी चौकीदार आहे! देशाला लुटणाऱ्यांना मी तुरूंगातच पाठवणार, देशावर अतिरेकी हल्ला करतात ते चौकीदाराला सहन होणार नाही!”
मोदींच्या या भूमिकेला जनतेने पाठिंबा दिला. त्यांनी चौकीदार चोरची हवा काढून टाकण्याचे पाऊल उचलले. तमाम मोदीप्रेमींनीही मी पण चौकीदार हे अभिमानाने ट्विटरवरून मिरवायला, सांगायला सुरूवात केली. अनेक काँग्रेस नेत्यांना या मोदींच्या भूमिकेत काँग्रेसच्या प्रचाराला असणारा धोका दिसत होता. पण त्यांचा सल्ला ऐकण्याच्या मनःस्थितीत राहुल नव्हतेच. त्यांच्या सर्व नकारात्मकतेच्या मोहिमेचे पूर्ण नकारातीलच फलित राहुल गांधींना मिळाले. राहुल यांच्या गांधी कुटुंबाचे माहेरघर म्हणजे उत्तर प्रदेशातली अमेथी मतदारसंघ होता. ते स्वतः गेली पंधरा वर्षे इथूनच संसदेत निवडून जात होते. पण हा अमेथीचा मतदारसंघ राहुल यांना राखता आला नाही. देशात सर्वत्र पानीपत झाले पण गेल्या वेळी स्वतः राहुल निवडून आले होते. यंदा तेही मूळ मतदारसंघामधून पराभूत झाले आहेत आणि याचा अत्यंत वाईट परिणाम काँग्रेसजनांच्या मानसिकतेवर झालेला आहे. ऐनवेळी उत्तरेतील बदलणारी हवा ध्यानी घेऊन राहुल यांनी दक्षिणेत केरळच्या सुपीक मतभूमीत पळ काढला म्हणून बरे झाले. अन्यथा मोठी फजिती झालीच होती.
केरळने त्यांना चांगला हात दिला. या एकाच राज्यात त्यांना दोन अंकी संख्येत खासदार धाडता आले. एरवी दहाच्या आतच संख्या सर्वत्र आहे. १७ राज्यांमध्ये तर काँग्रेसच्या हाती भोपळाच लागलेला आहे. काँग्रेसच्या एकामागून एक बड्या नेत्यांचा सपशेल पराभव लोकसभा निवडणुकीत झाला. सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, दिग्विजय सिंह अशा माजी मुख्यमंत्र्यांना जनेतने धूळ चारली. विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मुलाचा पराभव झाला. राहुल यांचे खास मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांनाही गुणाची जागा राखता आली नाही. मात्र कमलनाथ व पी. चिदंबरम यांची मुले संसदेत पोहोचली. काँग्रेस कार्यकारिणीत पराभवाची मिमांसा करताना कमलनाथ, गेहलोत व चिदंबरम यांनी स्वतःच्या मुलांच्या निवडणुकीत अधिक जीव लावला असे ताशेरे झाडले गेले. पराभवाचे खापर या तिघा नेत्यांच्या माथी काही प्रमाणात फोडता येईलही, पण देशाच्या उर्वरीत भागातील सपशेल पराभवाचा दोष राहुल यांनाच स्वीकारावा लागणार आहे. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तो अद्यापी तरी परत घेतलेला नाही.
राहुल यांनी कार्यकारिणीला सांगितले की माझ्या राजीनाम्यावर चर्चाच होऊ शकत नाही. तो परत घेतला जाणार नाही. मनमोहन सिंहांपासून सर्व नेत्यांनी सर्वांनी राहुल यांची मनधरणी केली. सोनिया गांधी व प्रियंका गांधी वाड्रा या दोघीही या बैठकीत पदसिद्ध सदस्य म्हणून उपस्थित होत्या. प्रियंका यांनी बजावले की, “रा. स्व. संघ आणि भाजपाला हेच तर हवे होते! त्यामुळे यावेळी ते राजीनामा देऊ शकत नाहीत..” प्रियंका यांच्या या मतामुळे कार्यकारिणी सदस्यांनी आणखी राहुल प्रीती रागाची आळवणी सुरू केली. पण बैठक संपून एक दिवस उलटला तरी राहुल यांनी राजीनामा परत घेतलेला नाही. कार्यकारिणी बैठकीनंतर गुलाम नबी आझाद व ए. के. अँटनी या दोन वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांचाही सूर असाच होता की राहुल यांनी राजीनामा दिलेला असला तरी पण कार्यकारिणीने तो स्वीकारलेलाच नाही. काँग्रेसकडे राहुल यांच्याशिवाय अध्यक्षपदासाठी अन्य एकही नाव या क्षणी नाही हीच मोठी शोकांतिका आहे. काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्यात हाच मोठा फरक आहे. भाजपाकडे एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारे चार वा पाच नेते अध्यक्षपदी काम करण्यासाठी मिळू शकतात. पण काँग्रेसकडे गांधी घराण्याशिवाय एकही नाव असू शकत नाही! राहुल यांनाही हाच प्रश्न पडला आहे, हे विशेष.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी