HomeArchiveपत्रके वाचा, प्रचारात...

पत्रके वाचा, प्रचारात नाचा पण..

Details
“पत्रके वाचा, प्रचारात नाचा पण..”

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]

लोकसभेसाठी प्रचाराचा पहिला टप्पा गुरूवारी पार पडला. रणरणत्या उन्हातही विदर्भाच्या सात मतदारसंघात मतदानाने टक्केवारीची जवळपास पन्नाशी गाठली. हे उत्साहवर्धक आहे. याचवेळी देशातही सर्व मिळून ९१ ठिकाणी मतदान झालंय. नागपूरची फाईट बिग फाईट होती. तिथे गडकरींचं काही खरं नाही, नाना पटोले सीट मारणार, असं त्यांच्या प्रचारासाठी महिनाभर नागपुरात तळ ठोकून बसलेले मराठवाड्यातील पत्रकार लेखक प्रकाशक महारुद्र मंगनाळे सांगत आहेत. एकेकाळी त्यांनीच सर्वप्रथम लातूर विधानसभा निवडणुकीत विलासराव देशमुख हरणार हा अंदाज वर्तवून खळबळ उडवली होती. त्यांचा तो अंदाज नंतर खराही ठरला. आता नितीन गडकरी हरणार, असे त्यांचे म्हणणे आहे. गडकरींचा पराभव अटळ आहे. केवळ पटोलेंचे मताधिक्य किती असेल याचीच उत्सुकता आहे, असे मंगनाळे सांगतात. गडकरी खरेच पडले तर ते धक्कादायक ठरेल. पटोले जायंट किलर ठरतील. मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल ग्रामीण भागात असलेली नाराजी पटोले यांनी नागपूरसारख्या शहरी भागातही मतदारांपर्यंत पोहोचवली असा याचा अर्थ निघू शकतो. जे विरोधी पक्ष एकत्रितपणे आजसुद्धा करू शकलेले नाहीत ते पटोलेंसारखे उमेदवार करू शकतील का हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर २३ मे रोजीच मिळू शकते.

देशभरातील प्रचार ठिकठिकाणी शिगेला पोहोचत असताना देशातील प्रचाराचे चित्र कसे आहे ते बघा. एक विनोद दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पसरला होता. ‘मोदी देशभर काय प्रचार करतात तर, काँग्रेस काँग्रेस काँग्रेस, आपल्याकडे महाराष्ट्रात आले तर काय प्रचार करतात तर, पवार पवार पवार..’ मोदींकडे प्रचाराचे मुद्देच नाहीत, सरकारच्या कामगिरीबद्दल काही सांगण्यासारखं नाही, अशी या विनोदातील गर्भीतार्थ होता. त्यावर उत्तर आलंच लगेच – ‘विरोधी पक्षांची आघाडी तरी कसा प्रचार करतेय तर, मोदी मोदी मोदीच.. दुसरा विषय आहे कुठे’.. दुर्दैवाने हे खरे आहे असे वाटण्यासारखेच चित्र सध्या प्रचारसभांमध्ये दिसत आहे.

मोदी काय, भाजपाचे इतर नेते काय सर्वजण सरकारची कामगिरी, आश्वासने अगदी नवा जाहीरनामा याबाबत फार काही बोलतच नाहीत. स्थानिक मुद्द्यांवर बोलत नाहीत, लोकांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. विरोधी आघाडीचे पण थोड्याफार फरकाने तेच सुरू आहे. आधी विरोधकांत मनापासून आघाडीच झालेली नाही. त्यामुळे प्रत्येकाची तोंडे भिन्न दिशांना आणि बोलताना मोदींशिवाय विषय नाही. सरकारच्या कामगिरीवर टीका होते पण, मुख्य लक्ष्य हे मोदीच आहेत. लोकांचे प्रश्न, समस्या तोंडी लावण्यासारख्या प्रचारात वापरल्या जात आहेत. प्रचारात देश घुसळला जात असला तरी कुणाच्याही प्रचारात एकवाक्यता नाही. अच्छे दिन बोंबलले, आश्वासने विसरले, कर्जाचा बोजा वाढला, बेरोजगारी विक्रमी प्रमाणात (गेल्या ४५ वर्षांतील उच्चांकी) वाढली, शेतकरी आत्महत्त्या वाढल्या, नोटाबंदी आणि जीएसटीने लहान व्यावसायिकांचा बळी घेतला, सरकारी कंपन्याही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, असे सर्व मुद्दे लोकांसमोर आहेत. ते प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे. पण हे मुद्दे छोटे पक्ष, वंचित-पीडितांसाठी लढणाऱ्या संघटना, कार्यकर्त्यांकडून समोर येताना दिसतात. प्रमुख विरोधी पक्ष फक्त मोदीविरोधाची चूड घेऊन नाचत आहेत. यातच मोदी आणि भाजपाला थेट विरोध न करता पडद्याआडून विरोध करणारी पत्रके विचारवंत, कलाकारांकडून निघाली आहेत. ही निवेदने आली म्हणून मग मोदीच कसे चांगले, भाजपाचे सरकार किती गुणाचे, असे कोडकौतुक करणारी निवेदने विवेक ओबेराय, पल्लवी जोशी आणि इतर काही कलाकारांनी काढली आहेत. गेल्या काही दिवसांतील या घडामोडींकडे तटस्थपणे पाहयला हवे. पण तसे होत नाही.

आपल्याकडे निवडणुका लागल्या की समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंचे गटतट ठरून जातात. नेते खुशाल असतात आणि कार्यकर्तेच भिडतात. अर्थात कलाकार, विचारवंत यांना या गटांत समाविष्ट करता येणार नाही. तरीही दोन्ही बाजूंचा सूर अत्यंत एकारलेपणाचा असतो हे दिसून येतेच. आताही देशातील 700 कलाकार आणि विचारवंतांनी विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी या मुद्द्यावर मतदारांनी जागरुकतेने मतदान करावे, असे आवाहन केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर आता विविध क्षेत्रातील सुमारे 900 मान्यवर मोदींच्या समर्थनासाठी पुढे सरसावले आहेत. मोदी विरोधातल्या विचारवंतांनी एकत्र येत आवाहन करण्याचे कारण विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचं सांगितलं होतं. तर भ्रष्टाचार मुक्त आणि विकासाभिमूख प्रशासन, मजबूर नाही मजबूत सरकार हवं, हे मोदी समर्थक कलाकार, विचारवंतांचे मुद्दे आहेत. जगात भारताची प्रतिमा उंचावणं आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, असे थेट आवाहन गायक पंडित जसराज, उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ, शिल्पकार राम सुतार, दलित लेखक अर्जुन डांगळे, पं. विश्व मोहन भट्ट, नाट्यकर्मी वामन केंद्रे, नृत्यांगना संध्या पुरेचा, गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह अनेकांनी केले आहे. त्यांचे हे निवेदन म्हणजे गिरीश कर्नाड, नसरुद्दीन शहा, शबाना आझमी, कोंकणा सेन-शर्मा, अनुराग कश्यप, रत्ना पाठक-शाह, अमोल पालेकर, अरुंधती नाग, आस्ताद देबू, आर्शिया सत्तार, दानिष हुसैन, अशा कलाकार आणि साहित्यिकांना प्रत्युत्तर होते. देशाची घटना वाचवण्यासाठी आणि धर्मनिरपेक्ष देशासाठी योग्य पक्षाला मत देणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे या मंडळींनी म्हटले होते.

गटतट म्हटले ते हेच. प्रत्येकाला आपले सरकार निवडण्याचा अधिकार असून कुठल्याही दबावाखाली येऊन मतदान करू नका, असे आवाहन मोदीसमर्थक कलाकार करत आहेत. . भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, गणेश देवी, जयंत पवार, राजीव नाईक, येशू पाटील, प्रदीप चंपानेरकर, अरुण खोपकर, रंगनाथ पठारे, रत्नाकर मतकरी, हरी नरके, आशीष पाथरे, प्रशांत पवार या आपल्या मायमराठीतील अनेक मराठी लेखक, प्रकाशकांनीही मतदारांना ‘व्यर्थ न हो मतदान’ या पत्रिकेद्वारे योग्य आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी मतदान करूया, असे आवाहन केले आहेच. मतदान कुणालाही करा पण डोळसपणे करा, तुमचा लोकप्रतिनिधी निवडताना तुमच्या प्रश्नांचा, जगण्याचा विचार करणारा खासदार निवडा. पत्रके वाचा, प्रचारात नाचा, भांडा पण, मत मात्र विचारपूर्वक द्या!”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content