Details
“नेताजी, तुम्हाला लाज कशी वाटत नाही?”
01-Jul-2019
”
विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
‘मी हसतो जगाला नि शेंबूड माझ्या नाकाला,’ हा घरात एक नी बाहेर एक आदर्श ठेवून वागणारा, जगणारा आजचा पुरूषसत्ताक जमाना आहे. घरभर महापुरूषांच्या, आदर्श मातांच्या तस्वीरी, कपाटात धूळखात पडलेली पुस्तके हा सर्व देखावा उभा करायचा आणि घरातील कर्ती स्त्री पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला लागली की घरकुटूंब, समाजात तिची निंदानालस्ती करायची. मग, ही स्त्री आपले कार्यकर्तृत्त्व आणि हुशारीच्या जोरावर राजकारणात, समाजकारणात अर्थकारणात पुढे सरसावली तर किती लोक तिचे मनापासून स्वागत करतील आणि करतात? आपल्या घरात, अवतीभवती, ढोंगी समाजात या लेकी-बेटीचा, मातेचा, रणरागिणींचा किती सन्मान राखला जातो? आपण जेव्हा राजमाता जिजाऊ, आहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राणी लक्ष्मीबाई, माता रमाई, मदर तेरेसा, इंदिरा गांधी या त्यागमूर्ती, कर्तबगार स्त्रियांचा आदर्श तावातावाने भाषणे ठोकून समाजापुढे मांडतो प्रत्यक्षात तसे वागतो का? महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची टूम काढली जाते. मात्र प्रत्यक्षात राजकारण, समाजकारणात आगेकूच करणार्या सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, मायावती, प्रियंका गांधी, हेमा मालिनी, जया प्रदा, उर्मिला मातोंडकर, स्मृती इराणी, पंकजा मुंडे किंवा अन्य क्षेत्रांतील स्त्रियांविषयी तोंडाला येईल तसे बकून मोकळी होणारी वाचाळवीर, टवाळकी, तोंडपाटीलकी गाजवणारी टोळी कंबरेचे सोडून का वागत आहेत?
एक भक्तांचा तांडा उठतो आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी भाजपविरोधात उभ्या राहिलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरवर तुटून पडतो. तिने काश्मिरी मुस्लिम तरूणासोबत लग्न केल्याने भक्तांचा धार्मिक उन्माद सोशल मीडियावर बाहेर पडतो. तिच्या स्वातंत्र्यावर घाव घालण्याचे काम ही मंडळी खुलेआम करते. आजही आपल्या भवताली वावरणारा जिवंत मनू उर्मिलावर अंत्यत हीन शब्दांत टीका करून तिला ट्रोल करतो. उत्तर मुंबईतील भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टीही उर्मिला मातोंडकरला एक सेलिब्रेटी चेहरा म्हणून बघतात. उर्मिलाच्या या प्रसिद्ध चेहर्याचा फायदा घेण्यासाठीच तिला राजकारणात उतरवण्यात आले आहे. मात्र तिने पक्ष चुकीचा निवडला, अशी पुस्तीही ते जोडतात.
स्त्रियांविषयी पुरूषांच्या मनात असलेला आंतरिक मान-सन्मान आजवर कधीही दडून राहिलेला नाही. याचा अर्थ प्रत्येक पुरूष स्त्रीला कमी लेखतो, असेही नाही. ही आपली पूर्वापारची संस्कृती असल्याची हाळी देताना काहींसाठी हा घर ते समाज विकृतीचा भाग होऊन बसला आहे. सध्या देशभर लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहे. या वार्यात झपाटल्यागत तोंडाला येईल तसं बरळणारी मंडळी अनेक आहेत. इसवीसनमागच्या पुढच्या दशकात न जाता महिनाभरात, आठवडाभरात किंवा दररोज ही यादी काढली तरीही या वाचाळवीरांची मोजदाद होणार नाही. अंत्यत खालच्या थराला जाऊन टीका करणार्यांत कोणत्याही एका पक्षाला झाकावे आणि दुसर्याला काढावे असे नाही. तर ही सर्वपक्षीय टोळी आपला टीआरपी वाढवण्यासाठी फालतू बकबक बिनधास्त, निर्धास्त करू लागली आहे. म्हणायला तर हे नेते. मात्र प्रचारसभांत काही बोलले तरी साहेब काय जोरदार भाषण ठोकलेत, असा फुगा फुगवून लोक फिदीफिदी हसतात, किंचाळतात. या नेत्यांना आपल्या अवती-भवती अशाच प्रकारे डोक्यात कांदे-बटाटे भरलेली मंडळी लागतात.
2019च्या लोकसभा निवडणुकीतही स्त्री सन्माचे आम्हीच खरे ठेकेदार, चौकीदार असल्याचे दावे करणारे महिला राजकारणी व नेत्यांविषयी तोंडाला येईल तसे बकून गेले आहेत. त्यांची नोंद राष्ट्रीय स्तरावर घेऊन त्यांचा यथोचित सन्मान व्हायलाच पाहिजे. एप्रिल 14: समाजवादी पक्षाचे एक जबाबदार नेते आझम खान त्यांच्या पक्षाच्या पार्टी बदलेल्या खासदार जयाप्रदा यांच्यावर अंत्यत हीन पातळीवर टीका करतात. रामपूरवालो, उत्तर प्रदेशवालो, हिंदुस्थानवालो उसकी असलीयत समजने मे आपको 17 बरस लग गए. मै 17 दिनोमें पहचान गया. 26 मार्च: सपा नेते फिरोज खान तोंडाचा पट्टा चालवतात. जयाप्रदा कहेंगी के मेरे पैंरो मे घुंगरू बांध दो.. रामपूर की शामे रंगीन हो जाऐंगी! हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादी व राष्ट्रवादी विचारांच्या पक्षासोबत आजला बांधिलकी ठेवून आहेत. नेताजींच्या या वाचाळकीची पक्षपातळीवर कारवाईसाठी कुणी गंभीर दखल घेतली का?
एप्रिल 13 : नरेंद्र सिंह राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार कोकलतात ‘कुणाच्या चेहर्यावर सर्वाधिक आत्मविश्वास झळकतो. हेमामालिनी मेकअपमध्ये आहेत आणि मी विदाउट मेकअप. यावरून लोकसभा निवडणुकीतील आपले विकास आणि प्रचाराचे मुद्द लक्षात येतातच.
1 एप्रिल: पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप कवाडे संविधान बदलने की बात करणार्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर घसरतात. ‘घटना बदलणे म्हणजे नवरा बदलण्याइतके सोपे नाही’. फक्त टाळ्या कुटणार्या टाळक्यांसमोर टाळ्या मिळवण्यासाठी केलेले हे वक्तव्य यापलीकडे याचा अर्थ काय? स्मृती इराणी यांना राज्यघटनेमुळे काहीच अधिकार मिळाले नसतील त्यामुळे त्यांना आवडणारी घटना त्या देशात लागू करू पाहत असतील तर यात त्यांच चुकलं कुठं?
मार्च 19 : भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह विकासाचा मुद्दा छेडताना ‘मायावती दररोज फेशियल करतात. त्या शौकीन आहेत. बाल पका हुआ है और रंगीन करवाके आज भी अपने आपको मायावतीजी जवान साबित करती है. 60 वर्ष की उम्र हो गयी है, लेकिन सब बाल काले है! ही जनतेने निवडून दिलेल्या विकासपुरूषांची स्त्रीविषयीची मानसिकता आहे. त्याहीपुढं महिलांविषयी अंत्यत हीन पातळीवर बोलणार्या या वाचाळ नेताजींचा किती महिला व सजग जनतेने पुढे येऊन उद्धार केला. भाजपच्या महिलेबद्दल बोलले की काँग्रेससमर्थक गप्प आणि काँग्रेसच्या महिलेबद्दल बोलले की भाजपवाले गप्प, हाच सर्वपक्षीय आदर्श आहे.
मार्च 18: भाजपाचे केंद्रीय मंत्री महेश शर्मा म्हणतात ‘अगर ममता बॅनर्जी यहाँ आकर के कथ्थक करे और कर्नाटक के सीएम गीत गाए तो कौन सुन रहा है? पप्पू कहता है पीएम बनेगा अब तो पप्पू की पप्पी प्रियंका गांधीभी आ गयी!.. हे पातळी सोडून चालणारं गलिच्छ राजकारण स्त्रीचा सन्मान वाढवतो आहे की पदोपदी अपमान करतो आहे? मग.. बेटी बचाओ, बेटी पढाओ कशासाठी हवं?
जानेवारी 28: सज्जन सिंह वर्मा मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणतात ‘भाजपाकडे एकमेव चांगला चेहरा आहे तो म्हणजे हेमा मालिनी. पक्षाकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी हेमामालिनी यांचे शास्त्रीय संगितावर आधारित नृत्यही बसवता येईल. हेमामालिनी त्यांच्या नृत्यातून पक्षासाठी मते मागतील’. काँग्रेस, भाजपासह छोट्या-मोठ्या प्रादेशिक व राष्ट्रीय पक्षांतील पुरूषी सत्ता गाजवणार्या मंडळींचा विकृत चेहरा अनेकदा समोर येतो. पण, राजकारणात, समाजकारणात पुढे येऊ पाहणार्या या महिलांच्या सन्मानार्थ कोणती पार्टी, कोणती संघटना आणि कोणता विचार पुढे येतो?”
“विनोद साळवी, मुख्य उपसंपादक, महाराष्ट्र दिनमान