Details
नारळी पौर्णिमा अर्थात सण नारळाचा!
01-Jul-2019
”
विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
नारळ हा प्रकार माहीत नसलेला यच्चयावत दुनियेत कोणी असेल असं मला नाही वाटत, तुम्हाला तरी वाटतं का? इतकी, या नारळाची महती आहे. नारळपाणी आजारी माणसाचं महत्त्वाचं पोषण, खाद्यपदार्थ रूचकर, चविष्ट बनविण्यात याचा मोठा वाटा! इतकंच आहे का तर नाही. अगदी एखाद्याला घालवायचा असेल तर नारळ द्या म्हंटलं जातं, तर मानपान द्यायचा झाला तर हाती नारळ-फुल दिलं जातं. मध्ये एका वाहिनीवर हास्यसम्राट नावाचा विनोदी कार्यक्रम झाला. त्यात स्पर्धकाला बाहेरचा रस्ता दाखविण्यासाठी नारळ देण्याची संकल्पना राबवली गेली. विशेषतः हिंदुस्थानात पूजा-अर्चनेसाठी नारळ श्रीफळ म्हणून लागतो.
देशभरात नारळी पौर्णिमा हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही श्रीफळ वाढवून करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. ऐन पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने त्याला शांत होण्याचे आवाहन करीत पुढील हंगामात संकटकाळात तारणहार हाच, शिवाय धंदा बरकतीत राहू दे हे सांगणारी आराधना, देशाच्या तिन्ही किनाऱ्यावरील, या व्यवसायावर उदरनिर्वाह असणारे करतात. हे आपल्याला शाळेतून सांगितलं गेलंय. आता तांत्रिक सुविधा वाढल्याने बाराही महिने मासेमारी चालू असते. यंदा हा सण बुधवारी १४ ऑगस्टला आहे.
नारळ भौतिक पातळीवर म्हणजे खाण्यासाठी उपयोगी ठरतो असे नाही तर मानसिक, आध्यात्मिकदृष्ट्या वापरला जातो. अदृश्य शक्तीशी संभाषण किंवा त्या शक्तीला संतुष्ट करण्यासाठी नारळ देण्याची पद्धत आहे. धार्मिक कार्यात नारळ देण्यामागे शरण आल्याची भावना असते. अहंकाराचा नाश करून त्याच्या पायी आपण नतमस्तक आहोत हे दाखवलं जातं. शुभ म्हणून नारळ घरात ठेवणे चांगले मानले जाते. नारळाचे असंख्य उपयोग मानवाने शोधून काढले. त्यामुळे नारळ हा पृथ्वीवरील कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाऊ लागला.
साधारणपणे समुद्रकिनाऱ्यावरील पट्ट्यात नारळ लागवड पूर्वी आढळायची. मात्र, बदलत्या काळानुसार आता अगदी विदर्भाच्या पोषक वातावरण नसलेल्या भागात नारळ बागा दिसतात. डौलदार नारळाची झाडं वाऱ्यावर डोलताना पाहण्यात वेगळीच मजा असते. चरकसंहिता, सुश्रुतसंहिता यात नारळ महती सांगितली आहे. नारळ हे फळ चवीला गोड, गुणांनी स्निग्ध, गुरू असते. शीत असल्याने पित्तदोष शमन करून ताकद वाढवते, मूत्राशयाची शुद्धी करून मांसधातू पोषण तसेच हृदयाला हितकर असते.
नारळाच्या तीन अवस्था सांगितल्या जातात. यात बाल म्हणजे फक्त पाणी, मध्य म्हणजे पाण्यासह सायीसारखा गोड गर, नि पक्व यात पाणी कमी जाडसर घट्ट गर म्हणजे खोबरे. त्यापुढील स्थिती गोटा खोबरे. शहाळ्याचे मलाईयुक्त खोबरे हा एक वेगळाच आनंद खाणाऱ्याला देतो! खोबऱ्याचे अनेक उपयुक्त इलाज आयुर्वेदात आहेत. नारळ दूध केसांना लावल्यास केस वाढायला मदत, चेहऱ्याला लावल्यास वर्ण उजळतो. जिथे दुधाची कमतरता असेल तिथे या दुधाचा वापर केला जातो. या वर्णनातील बाल आपण शहाळे म्हणून ओळखतो. उन्हाळ्यात नि आजारात हे उपयुक्त ठरते. याचे पाणी नुसते तहान भागवते असं नाही तर उष्णतेने थकलेल्या शरीरात पुन्हा टवटवी भरते. ते शरीरात पटकन स्वीकारले जात असल्याने काहीवेळा अलीकडे सलाईनमधूनही दिले जाते. जुलाबात शरीरात भासणारी पाण्याची कमतरता ते भरून काढते. शरीराच्या वाढत्या उष्णतेवर, लघवीची जळजळ यात पाण्याचा खूप छान उपयोग होतो. पण, मूत्रपिंडाच्या अकार्यक्षमतेमुळे लघवी होत नसल्यास हे पाणी देऊ नये. औषधांमुळे होणारी उष्णता, विषद्रव्ये निघून जाण्यासही घेता येते. असे अनेक उपयोग सांगता येतात.
बुद्धिजीवी, ताण असलेल्या व्यक्ती, गर्भवती विशेषतः गर्भजल समस्या असलेल्या स्त्रिया, ऊन अथवा अर्धशिशीग्रस्तास डोकेदुखी थांबविण्यासाठी खडीसाखर घालून हे पाणी दिले जाते. नारळाच्या दुधात मोनोलोरीन हे विशेष तत्त्व असल्याने ते पौष्टिक असते. केवळ स्तन्य दुधात ते असते. लहान मुलांना अन्न सुरू करताना हे दूध चालू शकते. ओले खोबरे किसून किंवा खवून दूध काढले जाते. हल्ली संगणक, मोबाईल हे डोळ्यांना थकवणारे आहेतच, शिवाय प्रखर दिवे, उन्हात काम करणाऱ्यांनी पातळ खोबरं खाण्याची सवय ठेवल्यास चक्कर येणे, डोळ्यांची आग होणे, डोकेदुखी यावर उपयोग होईल. नारळाची फुले गर्भाशयाची ताकद वाढविणारी असतात, ती पौष्टिक म्हणून बाळंतपणानंतरही घेता येतात.
ओला नारळ नसलेल्या भागात सुकं खोबरं वापरलं जातं. मसालेदार जेवण विशेषतः मांसाहारी जेवण नारळशिवाय होऊ शकत नाही. दक्षिण भारतात तर स्वयंपाकासाठी खोबरेल तेलच वापरले जाते. उपलब्ध विज्ञान माहितीनुसार नैसर्गिक शुद्ध खोबरेल तेलाचा रोजच्या आहारात समावेश केल्यास अतिरिक्त चरबी कमी होण्यासह वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, झोप शांत लागते असे लक्षात आलंय. नारळाच्या करंज्या, वड्या, नारळीभात, मोदक, आदी पक्वान्ने प्रसिध्द आहेतच. अनेक वधू-वर पाहणीत गरम कांदे, बटाटेपोहे सहज दिले जातात. त्यावर खवलेला नारळ चव म्हणजे फारच अप्रतिम, अपरिहार्य! आयुर्वेदात नारिकेल खंडपाक म्हणून एक योग आहे. तो अत्यंत प्रभावी आहे. त्याचबरोबर नारिकेल क्षार, श्रीफल कुसुमादी वटी आदीही योग दिलेत.
इतके बहुविध उपायांनी नारळ आपल्या दैनंदिन जीवनात स्थान मिळवून आहे. एका नारळाच्या देण्याने समुद्र शांत कसा होतो हा प्रश्न अनेकांना पडेल. यामागे इतर काही असो पण, श्रद्धा मात्र आहे. तिला आव्हान कोण नि कसे देणार हे मात्र ज्याच्या-त्याच्या बुद्धीवर अवलंबून आहे. तुम्ही द्या नाही तर नका देऊ, निसर्ग जे आहे ते तुम्हाला देतोच! आणि हो वरील उपचार तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडून जाणून घेऊन मगच करा. कारण त्यात अन्य मिश्रण करण्याचे घटकही आहेत. तेव्हा बनवा नारळाच्या वड्या किंवा नारळीभात नि करा सण साजरा! मला बोलावलेत तर निश्चितच आवडेल!”
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार