Details
“..नाना, जेव्हा बाळासाहेबांना भेटतात!”
01-Jul-2019
”
जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मुंबईचे आद्यशिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेट यांना बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्यावर उभे राहणार आहे, हे ऐकून आनंद झाला. सुरूवातीला ठाकरेंचे स्मारक होईल की नाही अशी शंका त्यांच्या मनात होती. कारण नानांच्या स्मारकाच्या जागेवर आता फक्त गवतच वाऱ्याबरोबर हेलकावे खात उभे आहे. आपलं स्मारक झालं नाही तरी बाळासाहेबांचं अभिननंदन तर करूया, असा बेत करून ते बाळासाहेबांना भेटतात.
बाळासाहेबांनी नानांना ओळखलंच नाही. नानांचा पेहराव पाहून त्यांना वाटलं बहुतेक पुण्याचे बाजीराव असतील! शेवटी साहेब व्यंगचित्रकार. त्यांच्या मनात थोडा मिश्किलपणा असणारच..
साहेब: कोण तुम्ही?
नाना: खरोखर, मला ओळखलं नाही तुम्ही?
साहेब: नाही ओळखलं, म्हणून म्हणालो, कोण तुम्ही?
(साहेबांनी ठाकरी शब्दात सुनावले..)
नाना: (हसतहसत म्हणाले) मी नाना शंकरशेट..
(असं ऐकताच बाळासाहेब हातातील दैनिक बाजूला ठेवून उभे राहिले आणि नानांची क्षमा मागितली)
साहेब: नाना आज इथे कसे? बसा, बसा..
नाना: तुमचं अभिनंदन करण्यासाठी.. भव्य स्मारक होतंय तुमचं.. महापौरांच्या बंगल्याच्या जागेवर.. सर्व नियम स्थिरस्थावर करून केंद्राकडून संमतीही मिळवली आपल्या उद्धवने.. तसं पाहिले तर तुमचे वाघही चांगलेच चवताळले होते. सरकारनेही तितक्याच तत्परतेने दखल घेऊन पुढाकार घेतला.. आणि स्मारक या विषयावर कायमचा पडदा पाडला.
साहेब: ते बरोबर नाना, पण मोदींना त्यांची जुमलेबाजी नडली हो..
नाना: जुमलेबाजी म्हणजे काय हो, बाळासाहेब?
साहेब: थोडक्यात समजावून सांगतो नाना. या मोदीने लोकसभेच्या निवडणुकीत लोकांना वारेमाप आश्वासन दिले होते. त्यामुळे येणारी लोकसभा निवडणूक त्यांना जड जाणार! माझं पोरगं अडून बसलं.. करतोस का? का पाडू तुझं सरकार?
नाना: तुम्ही मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढा दिला. त्यांची अस्मिता टिकविण्यासाठी ५० वर्षे झटलात. त्याशिवाय हिंदूंच्या रक्षणासाठीही कायम हिंदूंच्या मागे राहिल्याने तुम्ही हिंदूहृदयसम्राट झालात. इंग्रजांनी हिंदुस्थानचे सर्व सम्राट उद्ध्वस्त केल्यानंतर लोकशाहीत लोकांनी तुम्हाला ‘सम्राट’ केलं, असं तुमचं कर्तृत्त्व होतं आणि आहे. नाहीतर मी मुलींची शाळा काढली, हिंदू धर्म बुडू नये म्हणून मिशनऱ्यांची दादागिरी मोडली, रेल्वे सुरू करण्यासाठी घरात ऑफिस काढलं, काय नाही केले ते सांगा मला, बाळासाहेब? नशीब माझं पुतळा टाऊन हॉलमध्ये आहे तो, तोही लंडनमध्ये एका ब्रिटिश शिल्पकाराने तयार केलेला.. बाकीची स्मारके आहेत ती स्मशानात..
साहेब: तुमचा मुद्दा माझ्या लक्षात आला.. नाना तुम्ही मला सांगा मी बोरीबंदर रेल्वेस्टेशनला तुमचं नाव देण्याचा प्रयत्न केला होता की नाही?
नाना: हो केला, मला मान्य..
साहेब: तो.. तो काँग्रेसचाटू कलमाडी मध्येच मांजरासारखा आडवा आला आणि तिथेच सर्व काही संपलं.. निव्वळ राजकारण..
नाना: नशिब माझं, ब्रिटिशांनी माझं मुंडकं बोरीबंदरच्या इमारतीत लावलंय.. नाही तर नानांनी रेल्वे सुरू केली, त्याला काय पुरावा, असे आपल्या सरकारनं विचारलं असतं.. (यावर दोघंही हसतात.)
साहेब: तुमचं स्मारक नसलं तरी तुम्ही बांधलेल्या स्मशानात अंतिम क्रिया लोकांना करावी लागतेच ना?
नाना: बरं झालं तुम्ही आठवण केली स्मशानाची.. मुंबईच्या मध्यवर्ती भागात स्मशान बांधलं म्हणून त्यावेळी ब्रिटिशांनी गिरगावचं स्मशान वडाळ्याला हलविण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या हिंदूंनी वडाळासारख्या एवढ्या लांब प्रेतयात्रा कशी नेणार म्हणून माझ्याकडे तक्रार केली आणि ब्रिटिशांचे मी मन वळविले. पण बाळासाहेब तुमच्या सेनेने माझं स्मारक उभारण्यासाठी वडाळ्यालाच जागा दिली. चांगला सूड घेतला हो तुम्ही..
(नाना गदगदून बोलत होते. बाळासाहेब हताशपणे सर्व ऐकून घेत होते..)
साहेब: मला हे ठाऊक नव्हते..
नाना: एवढं मनावर घेऊ नका, बाळासाहेब.. बरं माझ्या वडाळा येथील स्मारकासाठी निव्वळ १५ कोटी रूपये खर्च आहे. स्मारक समितीची तेवढीही क्षमता नाही हो.. आता स्मारकाची जागा पालिकेकडे परत करावी लागणार आहे म्हणे.. नशीब तुमच्या स्मारकासाठी १०० कोटी खिशातून पैसे काढून द्यावे अशा पद्धतीने सरकारने दिले.. काय जमाना आहे हो बाळासाहेब?
एकेकाळी मुंबईचा सर्वात श्रीमंत मी, लोकहितासाठी जमिनी वाटत बसलो. आता माझ्या कुटुंबालाच रस्त्यावर आणलंय मी..
(बाळासाहेब उभ्या आयुष्यात कधीच मान खाली घालून बसले नाहीत, ते नानांसमोर फक्त जमिनीकडे बघत बसले.. अपराधी भावनेने..)
साहेब: खरं सांगू नाना, मला तुमच्यासमोर बसायलाही लाज वाटते..
नाना: त्या स्मारकाचे राहू द्या, बाळासाहेब. गिरगावात मी बांधलेली पहिली मराठी मुलींची शाळा, ती आठवत असेल तुम्हाला..
साहेब: हो, चांगलीच आठवते.. काय झालं तिचं आता?
नाना: ती पालिकेच्या ताब्यात आहे आणि ती शाळा पडायच्या बेतात आहे.. ती शाळा पडावी याचीच पालिका वाट बघतेय, म्हणजे परस्पर बिल्डरच्या घशात घालून मोकळे होणार असे वाटतेय मला. मुंबईत मराठी टक्का कमी होतोय. निदान मराठी माणसाने बांधलेल्या वास्तूस्मारक रूपाने असू द्या हो, बाळासाहेब..
(बाळासाहेब चष्मा काढतात व अंगावरच्या शालने डोळ्याच्या कडा हळुवारपणे पुसतात.. तेवढ्यात प्रमोद नवलकर येतात..)
नवलकर: साहेब, तुमचं अभिनंदन! मी मुंबईत पूर्ण भ्रमंती केली.. काय तो तुमचा ‘ठाकरे’ चित्रपट तुफान चालतोय.. नुसता मुंबईतच नाही तर जगात तो पाहिला जात आहे आणि हो स्वतः नरेंद्र मोदी दिल्लीत तुमचा चित्रपट पाहणार आहेत. म्हणजे युती नक्की आणि पुन्हा महाराष्ट्रात मराठी माणसाची मान ताठ राहणार.. साहेब तुम्ही बोलत का नाहीत?
साहेब: (नानांकडे पाहत..) मराठी माणसाची मान ताठ नाही तर खाली गेली..
नवलकर: साहेब, चित्रपट आवडला नाही का?
साहेब: (नानांकडे बोट दाखवत..) हे कोण आहेत?
नवलकर: नाही ओळखलं..
साहेब: ज्यांच्या वाड्याशेजारी तुम्ही राहायचे ते मुंबईचे आद्यशिल्पकार नाना उर्फ जगन्नाथ शंकरशेट..
त्यांची आज मान खाली झाली, ती शिवसेनेमुळे.. कशाला मराठी अस्मितेच्या गप्पा मारता, नवलकर? मुंबईचा आद्यशिल्पकार रस्त्यावर आणि माझं स्मारक..
(कमांडर दत्ताजी साळवी एखादी तोफ धडधडावी तसा मोठ्याने आवाज करत बाळासाहेबांच्या चरणी लीन होऊन चरणाला हात लावतात.. साळवींच्या हातावर साहेबांचे अश्रू पडतात..)
साळवी: हे काय बाळासाहेब, तुमच्या डोळ्यात अश्रू?
(नाना तेथून निघून जातात. नवलकर साळवींना उठवत दोघंही शरमेने मान खाली घालून साहेबांच्या समोर उभे राहतात.. सर्वत्र स्मशान शांतता..)”
“जयंत करंजवकर, ज्येष्ठ पत्रकार