Details
नगरसेविका ज्योती अळवणी यांच्या कथासंग्रहाचे आज प्रकाशन
01-Jul-2019
”
विलेपार्लेच्या नगरसेविका ज्योती अळवणीलिखित ‘कथा विविधा’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाचे रविवारी प्रकाशन होणार असून राजकीय कार्यकर्ती असण्यासोबत आता त्यांना लेखिकाच्या भूमिकेतही पाहायला मिळणार आहे. सात कथांच्या या कथासंग्रहाचे प्रकाशन माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास खासदार पूनम महाजन आणि मुंबई-पुणे-मुंबई सिनेमातील लोकप्रिय जोडी स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. लहानपणापासूनच सर्व प्रकारच्या साहित्य वाचनाची आवड असणाऱ्या ज्योती अळवणी यांनी गेली काही वर्षे लिखाणाची आवड जोपासली असून त्यांच्या सात निवडक कथांचा समावेश असलेला हा कथासंग्रह ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. विलेपार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणात प्रकाशन सोहळा होणार असून यावेळी सातपैकी एका कथेचे अल्प अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत करणार आहेत तर एका नाट्यरूप कथेवर आधारित एकपात्री प्रयोग सुप्रसिद्ध अभिनेता, दिगदर्शक आणि लेखक चिन्मय मांडलेकर सादर करणार आहेत. एका कथेवर आधारित शॉर्ट फिल्मदेखील प्रदर्शित होणार आहे.”
“विलेपार्लेच्या नगरसेविका ज्योती अळवणीलिखित ‘कथा विविधा’ या त्यांच्या पहिल्या कथासंग्रहाचे रविवारी प्रकाशन होणार असून राजकीय कार्यकर्ती असण्यासोबत आता त्यांना लेखिकाच्या भूमिकेतही पाहायला मिळणार आहे. सात कथांच्या या कथासंग्रहाचे प्रकाशन माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास खासदार पूनम महाजन आणि मुंबई-पुणे-मुंबई सिनेमातील लोकप्रिय जोडी स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. लहानपणापासूनच सर्व प्रकारच्या साहित्य वाचनाची आवड असणाऱ्या ज्योती अळवणी यांनी गेली काही वर्षे लिखाणाची आवड जोपासली असून त्यांच्या सात निवडक कथांचा समावेश असलेला हा कथासंग्रह ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. विलेपार्ल्यातील लोकमान्य सेवा संघाच्या पटांगणात प्रकाशन सोहळा होणार असून यावेळी सातपैकी एका कथेचे अल्प अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत करणार आहेत तर एका नाट्यरूप कथेवर आधारित एकपात्री प्रयोग सुप्रसिद्ध अभिनेता, दिगदर्शक आणि लेखक चिन्मय मांडलेकर सादर करणार आहेत. एका कथेवर आधारित शॉर्ट फिल्मदेखील प्रदर्शित होणार आहे.”

