Details
“देवीपाडा मैदानावर लवकरच मिनी स्टेडियम! क्रीडामंत्री विनोद तावडे यांची घोषणा, बोरिवलीतील प्रवीण दरेकरांच्या सीएम चषक स्पर्धेचे बक्षीस वितरण जल्लोषात”
01-Jul-2019
”
केएचएल ब्युरोकडून
बोरिवलीच्या देवीपाडा येथील मैदानावर वर्षभरात मिनी स्टेडियम उभारले जाईल. त्याकरिता आवश्यक निधीसाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद केली जाईल. गरज भासल्यास डीपीडीसी फंडातून या स्टेडियमसाठी निधी पुरविला जाईल, असे आश्वासन राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी दिले.
आमदार प्रवीण दरेकर यांनी बोरीवलीत आयोजित केलेल्या सीएम चषक स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. व्हिडिओ गेम खेळलात तर मार्क कमी होतील आणि मैदानी खेळात उतरलात तर मार्क वाढतील, असे स्पष्ट करीत विनोद तावडे यांनी, “व्हिडीओ गेम छोडो… मैदान से जोडो” असा नारा देताच, उपस्थित हजारो खेळाडूंनी तितक्याच जल्लोषात त्याचे स्वागत केले आणि प्रत्युत्तरही दिले. सुमारे दहा हजार खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्यासाठी सुमारे १० हजार टी-शर्ट्स, रोख रक्कमेसह १४० सन्मान चिन्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या स्वाक्षरीची प्रमाणपत्रे, मैदानी खेळांसाठी तात्पुरते मिनी स्टेडियम आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपट, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींची हजेरी… अशा भव्य-दिव्य स्वरूपात मागठाणे विधानसभा विभागातर्फे “सीएम चषक कला व क्रीडा महोत्सव” साजरा करण्यात आला. या स्पर्धेचे संयोजन आणि खेळाडूंचा सहभाग पाहून प्रमुख पाहुणेही भारावून गेले. त्यांनी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढविलाच, शिवाय आमदार प्रवीण दरेकर यांच्या नियोजनालाही दिलखुलास दाद दिली.
घरी बसून परीक्षा द्या, पण खेळात मेडल मिळावा
यावेळी, क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी, राज्यशासन खेळाडूंना कसे प्रोत्साहन देते, याची माहिती दिली. ते म्हणाले की, “मैदानी खेळात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा मार्क देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वीच घेतला आहे. खेळाडूंसाठी नोकरीत पाच टक्के आरक्षणही दिले आहे. आता जानेवारीपासून तर दहावी बोर्डाचे “खुले बोर्ड” आम्ही सुरू करीत आहोत. त्यामुळे खेळाडूंना शाळेत जायची गरज नाही. घरी बसून अभ्यास करून जून आणि डिसेंबरमध्ये पाचवी, आठवी आणि दहावीची परीक्षा देता येईल. ही परीक्षा सीबीएससी, आयसीएससी यांच्या समकक्ष असेल. तेव्हा, काय खेळायचे ते खेळा, पण मेडल मिळवून आणा,” असे आवाहन केले. खासदार गोपाळ शेट्टी यांनी, खेळामुळे शरीर आणि मन सक्रिय होते. त्यामुळे खेळाला महत्त्व दिले पाहिजे, असे सांगितले.
झोपड्यांतील खेळाडूंना व्यापीठ – प्रवीण दरेकर
सीएम चषक स्पर्धेतून झोपड्यांत राहणाऱ्या खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रास्ताविकामध्ये मुख्यमंत्र्यांना जाहीर धन्यवाद दिले. या स्पर्धेत आम्ही अनेक हुशार खेळाडू पाहिले. अशा हुशार खेळाडूंना पुढे जाण्यासाठी आम्ही पाठबळ देऊ. या स्पर्धेद्वारे मागठाणेमधून चांगले खेळाडू घडवू. पण त्यासाठी देवीपाडा येथील म्हाडा भूखंडावर मिनी स्टेडियम बांधून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
कार्यक्रमास माजी आमदार हेमेंद्र मेहता, मुंबई हौसिंग फेडरेशन अध्यक्ष प्रकाश दरेकर, मुंबई भाजपा उपाध्यक्षा राही त्रिवेदी, नगरसेवक विद्यार्थी सिंह, गणेश खणकर, प्रीतम पंडागळे, आसावरी पाटील, सुनीता यादव, पक्षाचे विधानसभा अध्यक्ष मोतीभाई देसाई उपस्थित होते. पाच ते १६ डिसेंबर दरम्यान झालेल्या या महोत्सवास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रसाद लाड, विजय गिरकर, माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी, करसन घावरी, अभिनेता स्वप्नील जोशी, अभिनेत्री श्रेया बुगडे, नीशा परूळेकर यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
स्पर्धेमधील विविध प्रवर्गातील प्रथम क्रमांकाचे विजेते पुढीलप्रमाणे-
शेतकरी सन्मान कबड्डी – तेजस संघ
जलयुक्त शिवार व्हॉलीबॉल – सूरज स्पोर्ट क्रिएशन संघ, ए. आर. स्पोर्ट संघ
इंद्रधनुष्य चित्रकला – श्रेयांक निर्गुण, भूमिका नाम्बी, समाधान साळवे
सौभाग्य खो-खो – वीर मराठा संघ, समता क्रीडा भवन संघ आणि मागाठाणे बॉईज
उड्डाण एथलेटिक्स – भक्ती कोठारे, तन्वी पुजारी, शिवम, दीपिका, माही इंगळे, मोहक जामदार, आयुष्य बंगारे, सूर्यप्रकाश शुक्ल, समीर गायकवाड, तुषार राठोड, सुधीर यादव, राखी विश्वकर्मा
मेक इन इंडिया- रांगोळी- जयश्री आंबेरकर, रूपेश सुतार, नितीन संकपाळ, ऋतुजा परब, अजय जाधव
उज्ज्वला नृत्य – नेहा सिंह, सन्ना अईर, विनोद चौधरी, डेस्टिनेशन डान्स अकॅडमी समूह
कौशल्य भारत कॅरम- सूरज यादव, रवींद्र घुगे, सलोनी राऊळ, सुनीता सामंत, नंदकुमार शेट्ये
आयुष्यमान क्रिकेट- चॅम्पियन बॉईज संघ, बेस्ट बॅट्समन- प्रसाद राहाटे, बेस्ट बॉलर- राहुल सिंह, बेस्ट फिल्डर- किरण गावडे, मुले- जय माता दी, वॉर्ड क्र. २५, मुली- सुपरनोव्हा ठाकूर व्हिलेज संघ.”
“केएचएल ब्युरोकडून