Details
दुर्लक्षित मराठेशाहीचा इतिहास समाजापुढे आणा – डॉ. उमेश कदम
25-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
दख्खनच्या दुर्लक्षित मराठेशाहीच्या इतिहासाची गौरवशाली गाथा अभ्यासकांनी समाजापुढे आणण्याची गरज आहे आणि यात नव्या पिढीतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. संशोधनासाठी अनेक बाबी त्यांच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा, असे विचार जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) अधीक्षक प्रा. डॉ. उमेश कदम यांनी व्यक्त केले.
मध्ययुगीन काळातील दख्खनच्या तंजावर, करवीर, सातारा, देशावरील तसेच कोकणातील मराठी सरदारांचे शौर्य, पराक्रम, दख्खनमध्ये फ्रेंच, पोर्तुगीज, डच आणि अन्य युरोपियन राष्ट्रांनी त्यांच्या साम्राज्य विस्तारासाठी केलेले प्रयत्न, मराठ्यांशी संबंधित या युरोपियन शक्तींचे दख्खनमधील संक्रमण, परस्परावलंबन, या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्र कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात डॉ. उमेश कदम यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आले असून त्याच्या उद्घाटनपर सोहळ्यात ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शाहू महाराज सेंटर फॉर स्टडीज इन मराठा हिस्ट्री,
जेएनयू आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स स्टडीज (आयसीएसएसआर) यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. भारती पाटील, प्रा. नंदा पारेकर, डॉ. अविनाश पाटील, डॉ. निलांबरी जगताप आदींना यावेळी संबंधित विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करून दख्खनच्या इतिहासातील अनेक पैलूंवर प्रकाश पाडला.
शिंदे–होळकर–गायकवाड घराण्यांनी इ. स. १७०० ते १८०० च्या काळातील केलेली गौरवशाली कामगिरी, त्यांचे कर्तृत्व याविषयी संशोधक विद्यार्थी अनिल कुमार यांनी आपले विवेचन सादर केले. १६ ते १८ व्या शतकात विशाल समुद्रावरील आरमारविषयी मराठ्यांनी युरोपियन सत्तेशी केलेल्या संघर्षातील अनेक बाबी अमिता कुमार यांनी उलगडून अनेक बाबी त्यातून नव्याने सादर केल्या. १७व्या शतकातील डच आणि मराठ्यांमधील संघर्षाविषयी अनुराधा यांनी तर कोकण राजापूर किनारपट्टीवर १७व्या शतकातील व्यापार व उद्योग याविषयीची माहिती दीपिका यांनी सादर केली. डॉली पुरोहित यांनी मराठ्यांच्या आरमारविषयक भाष्य केले. कोन्होजी आंग्रे आणि इंग्रजांविरोधात निर्माण केलेला दबदबा आणि त्यांची अतुनलीय आरमार कर्तृत्व याविषयी डॉ. सुरेश शिखरे यांनी इतिहासातील अनेक संदर्भ व पैलू सादर केले. शिखा कुमारी यांनी मराठ्यांची राजधानी असलेला रायगड, राजगड तसेच अन्य गडकिल्ल्यांविषयीची अनेक महत्त्वाची माहिती करून दिली.”
केएचएल न्यूज ब्युरो
“दख्खनच्या दुर्लक्षित मराठेशाहीच्या इतिहासाची गौरवशाली गाथा अभ्यासकांनी समाजापुढे आणण्याची गरज आहे आणि यात नव्या पिढीतील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. संशोधनासाठी अनेक बाबी त्यांच्या प्रतिक्षेत आहेत. त्याचा त्यांनी उपयोग करून घ्यावा, असे विचार जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) अधीक्षक प्रा. डॉ. उमेश कदम यांनी व्यक्त केले.”
“मध्ययुगीन काळातील दख्खनच्या तंजावर, करवीर, सातारा, देशावरील तसेच कोकणातील मराठी सरदारांचे शौर्य, पराक्रम, दख्खनमध्ये फ्रेंच, पोर्तुगीज, डच आणि अन्य युरोपियन राष्ट्रांनी त्यांच्या साम्राज्य विस्तारासाठी केलेले प्रयत्न, मराठ्यांशी संबंधित या युरोपियन शक्तींचे दख्खनमधील संक्रमण, परस्परावलंबन, या विषयावरील दोन दिवसीय चर्चासत्र कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात डॉ. उमेश कदम यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आले असून त्याच्या उद्घाटनपर सोहळ्यात ते बोलत होते.
शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शाहू महाराज सेंटर फॉर स्टडीज इन मराठा हिस्ट्री,
जेएनयू आणि इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स स्टडीज (आयसीएसएसआर) यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. भारती पाटील, प्रा. नंदा पारेकर, डॉ. अविनाश पाटील, डॉ. निलांबरी जगताप आदींना यावेळी संबंधित विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करून दख्खनच्या इतिहासातील अनेक पैलूंवर प्रकाश पाडला.”
“शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शाहू महाराज सेंटर फॉर स्टडीज इन मराठा हिस्ट्री, ”
“शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शाहू महाराज सेंटर फॉर स्टडीज इन मराठा हिस्ट्री, ”
“शिंदे–होळकर–गायकवाड घराण्यांनी इ. स. १७०० ते १८०० च्या काळातील केलेली गौरवशाली कामगिरी, त्यांचे कर्तृत्व याविषयी संशोधक विद्यार्थी अनिल कुमार यांनी आपले विवेचन सादर केले. १६ ते १८ व्या शतकात विशाल समुद्रावरील आरमारविषयी मराठ्यांनी युरोपियन सत्तेशी केलेल्या संघर्षातील अनेक बाबी अमिता कुमार यांनी उलगडून अनेक बाबी त्यातून नव्याने सादर केल्या. १७व्या शतकातील डच आणि मराठ्यांमधील संघर्षाविषयी अनुराधा यांनी तर कोकण राजापूर किनारपट्टीवर १७व्या शतकातील व्यापार व उद्योग याविषयीची माहिती दीपिका यांनी सादर केली. डॉली पुरोहित यांनी मराठ्यांच्या आरमारविषयक भाष्य केले. कोन्होजी आंग्रे आणि इंग्रजांविरोधात निर्माण केलेला दबदबा आणि त्यांची अतुनलीय आरमार कर्तृत्व याविषयी डॉ. सुरेश शिखरे यांनी इतिहासातील अनेक संदर्भ व पैलू सादर केले. शिखा कुमारी यांनी मराठ्यांची राजधानी असलेला रायगड, राजगड तसेच अन्य गडकिल्ल्यांविषयीची अनेक महत्त्वाची माहिती करून दिली.”

