Details
सोमवारी तिसऱ्या लॉकडाऊनला सुरूवात होण्याआधीच राज्य सरकारने रेड झोनमधील फक्त कंटेन्मेंट परिसर वगळता सर्वत्र दारूची दुकाने सुरू करण्यास आनुमती दिली. त्यामुळे दारूपासून गेले दीड महिना लांब राहिलेल्या मुंबईकरांनी दारूची दुकाने सुरू होण्याआधीच सामाजिक अंतर पाळत रांगा लावल्या. काही ठिकाणी असे शिस्तीचे वातावरण असले तरी अनेक ठिकाणी ग्राहकांनी झुंबड केली आणि सामाजिक अंतर राखण्याच्या मूळ उद्दीष्टालाच हरताळ फासला गेला. परिणामी मुंबईच्या महापालिका आयुक्तांनी मंगळवारी रात्री मुंबईतील किराणा मालाची आणि बाजीपाल्याची दुकाने वगळता दारूच्या दुकानांसह इतर वस्तूंच्या दुकानांनाही बंदी केली. दारूसाठी शिस्तीत रांग लावलेल्या ग्राहकांचे मुंबईच्या सायन येथील हे दृष्य टिपले आहे ए. श्रीनिवास यांनी.
छायाचित्रे : ए. श्रीनिवास

