HomeArchiveदगलबाज चीन!

दगलबाज चीन!

Details
दगलबाज चीन!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर
[email protected]
पुलवामा येथे 42 निष्पाप भारतीय जवानांचा गेलेला बळी म्हणजे भारतीय प्रजासत्ताकावर झालेला हल्ला होता. पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने तो केला होता. या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याने मोठ्या अभिमानाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. अशा या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी (Global Terrorist) म्हणून घोषित करावे, असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आला आहे. परिषदेच्या निर्बंध समितीत तो मंजूर होणार तोच चीनने खोडा घालून तो रोखला आहे. पुलवामा हल्ल्याचा निषेध जगभर होत असताना चीन मात्र निगरगट्टपणे हल्लेखोरांना पाठिशी घालत आहे.

या संदर्भात अमेरिकन दूतवासातील प्रवक्त्याने केलेले विधान महत्त्वाचे आहे. हा प्रवक्ता म्हणाला की, `प्रादेशिक स्थैर्य आणि शांतता नांदावी म्हणून अमेरिका व चीन एकमेकांचे हित नजरेसमोर ठेवून कार्यरत आहेत. मसूद अझहरला जागतिक अतिरेकी म्हणून घोषित करण्यात बाधा आणली गेली तर आपण आपल्या हेतूपासून दूर जात आहोत हेच सिद्ध होईल.’ अमेरिकन प्रवक्त्याने चीनला लगावलेली ही सणसणीत चपराक आहे. पण चीनसाठी ते पालथ्या घड्यावरील पाणीच ठरले आहे. दगलबाज चीनने पाठीत सुरा खुपसण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या काळात `हिंदी-चीनी भाई-भाई’ अशा घोषणा चीनी नेतृत्त्वाने दिल्या होत्या. पण त्यानंतर 1962 साली चीनने भारतावर अचानक हल्ला चढविला. इतिहासात आंतरराष्ट्रीय दगलबाजीचे ते उत्तम उदाहरण मानले जाते.

अक्साई चीन आणि अरूणाचल प्रदेश यांच्यात सीमा प्रदेशावरून वाद सुरू होता. भारताचा असा दावा होता की, अक्साई चीन हा काश्मीरचा भाग आहे तर चीनने तो क्झिंग जियांगचा भाग असल्याचे म्हटले होते. या वादातूनच चीनने बेसावध भारतावर हल्ला चढविला. चीन असे काही करेल, अशी भारताने कल्पनादेखील केली नव्हती. या हल्ल्यात भारताचे प्रचंड नुकसान झाले. चीनच्या अहवालानुसार भारत-चीन युद्धात चीनचे 32 तर भारताचे 65 जवान मारले गेले. भारताचा या युद्धात दारूण पराभव झाला. पण अरूणाचल प्रदेशचे हृदय मात्र भारताने जिंकले. 21 नोव्हेंबर 1962 रोजी चीनने युद्धविराम घोषित केला. 1 डिसेंबर 1962 पासून चीनने सीमेवरून आपले सैन्य परत बोलावले. या दगलबाजीचा पंतप्रधान नेहरू यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. ते आजारी पडले. त्यानंतर त्यांनी जे अंथरूण धरले, ते कायमचेच. भारत-चीन युद्धानेच नेहरूंचा बळी घेतला.

चीनच्या दगलबाजीमुळेच भारताच्या लोकप्रिय पंतप्रधानाने अखेरचा श्वास घेतला. आज तोच चीन पुन्हा एकदा भारताच्या मुळावर उठला आहे. मसूद अझहरला जागतिक अतिरेकी म्हणून घोषित करताच त्याच्या जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेवरदेखील निर्बंध येणार आहेत. अझहरच्या मोकाट सुटण्यावर मर्यादा पडणार आहेत. मग त्याला पाकिस्तानदेखील वाचवू शकणार नाही. हे सारे ठाऊक असूनदेखील चीन त्याला वाचवीत आहे. त्याच्याबाबतचा प्रस्ताव बारकाईने तपासून पाहिला पाहिजे, असे निर्लज्जपणे सांगत आहे. अशा या चीनवरच निर्बंध लादण्याची आता वेळ आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने चीनवर निर्बंध लादो न लादो पण भारतीय जनता मात्र चीनी मालावर बहिष्कार टाकून चीनला धडा शिकवू शकते. भारत ही जगातील मोठी बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ गमावणे कोणत्याही देशाला परवडणारे नाही. चीनला तर नाहीच नाही. मग भारताने स्वस्थ का बसावे? शासकीय पातळीवर चीनी मालावर अधिकृतपणे बहिष्कार टाकता येणार नाही, हे कबूल! पण असा बहिष्कार टाकण्यापासून भारतीय जनतेला कोणी रोखू शकत नाही. म्हणूनच आमचे असे आवाहन आहे की, आजपासून दगलबाज चीनच्या सर्व प्रकारच्या मालावर बहिष्कार टाकून चीनला धडा शिकवा. चीनचा आर्थिक कणा मोडा. चीनी माकडांना नेस्तनाबूत करा. तूर्त एवढेच!”
 
“नरेंद्र वि. वाबळे, संपादक, शिवनेर

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content