Details
केएचएल न्यूज ब्युरो
“स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने कोरियन दूतवासाद्वारे आयोजित तिसरी मुंबई कोंसल तायक्वांडो स्पर्धा २०१९ मध्ये सावरकर तायक्वांडो अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी १३ सुवर्ण, १२ कांस्य आणि ११ रजत पदक जिंकून घवघवीत यश संपादन केले.”
पुरूषांच्या ५४ किलोखालील गटात सुवर्ण पदक जिंकून अभिजीत पाटील हा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी ठरला. त्याच्या या यशाबद्दल स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या सर्वांना अकॅडमीचे प्रशिक्षक राजेश खिलारी यांनी प्रशिक्षित केले आहे.

