Details
ड्रोन हल्ला रोखण्यासाठी घेणार खबरदारी!
02-Oct-2019
”
विनय गजानन खरे..
ड्रोनने हवाई हल्ल्याची शक्यता भारतासारख्या देशात कितीतरी प्रमाणात अधिक आहे. ज्या देशाने अनेकदा खास सूचना मिळूनसुद्धा असे अनेक हल्ले करू दिले. तेथील यंत्रणा काय हे हल्लेखोरांना चांगले ज्ञात आहे. त्याचबरोबर अनेक हल्ल्याचे कटदेखील उधळून लावण्यात यंत्रणा यशस्वी झाल्याचा दावा अनेकदा केला जातो. भारतातील विमान प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. हे खरं असलं तरीही सुरक्षा हा एक वेगळा आयाम आहे, त्याकडे गंभीरपणे पाहिले गेलेच पाहिजे. विशेषतः विविध क्षेत्रात होत असलेली प्रगती यावर नापाक इराद्याने काही देश लक्ष ठेऊन आहेत. प्रयत्न असे चालू असतात की त्यात खोडा घालणे, दंगेधोपे घडवून आणणे, जेणेकरून अशांतता कायम राहील नि गती, प्रगतीला खीळ बसेल, आर्थिक डोलारा कमकुवत होईल. पण, देशातील काही घटकांना हे कळून चुकले आहे. यामागे कोण आहे ते! त्यामुळे दंग्याचे प्रमाण कमी झालेय.
सौदीतील प्रमुख तेल कंपनी आरामको हिच्यावर शेजारील इराणच्या हुती दहशतवादी संघटनेने ड्रोनने हल्ला केल्याने दोन प्लांटला मोठी आग लागली. याचा साहजिकच जागतिक स्तरावर परिणाम झाला नि पडसाद उमटले. सरकारी तेल कंपनीला बसलेला फटका आपल्या तेल पुरवठ्यावर परिणाम करणारा ठरला. त्यामुळे किमती तर भडकल्याच, शिवाय असा हल्ला आपल्यावर होऊ शकतो, त्यावर आपण आळा घालू शकतो का याचीही चर्चा विविध घटकांत होत आहे. याचं उत्तर आहे की भारतीय विमानतळांना सुरक्षित करण्याची ब्ल्यू प्रिंट अंतिम टप्प्यात आहे. आयआयटी मुंबईतून शिकलेल्या चार लोकांची कंपनी ‘आयडिया फोर्ज’ यासाठी काम करीत आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत निश्चित उपाय काय हे ठरवण्यास कंपनीला सांगण्यात आलं असून इतरही काही यावर इलाज शोधत आहेत.
विमानतळ सुरक्षेची बजबाबदरी सध्या सीआयएसएफ या केंद्रीय निमलष्करी दलाकडे आहे. त्यांनी मागील काळातच यावर काम सुरू केले आहे. यासाठी अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्यांना पाचारण केले होते. पण, समाधानकारक, प्रभावी हाती काही न आल्याने वरील कंपनीला सांगण्यात आलं. नियमितपणे मिळणाऱ्या खबरीनुसार लष्कर ए तोयबा नि जैश ए मोहम्मद या संघटनांकडून नेहमी धमक्या येत असतात. त्यावर ठोस उपाय म्हणून दिल्लीच्या रोहिणी क्षेत्रात अनेकप्रकारे चाचण्या घेतल्या जात आहेत. या कंपनीने डीआरडीओच्या सहकार्याने नेत्रा ड्रोन बनवले आहे. यासाठी दोन मापदंड ठरवले गेले. त्यातील एक आपल्या ड्रोनला नुकसान होऊ न देता शत्रू ड्रोनवर हल्ला करून विमानाची सुरक्षितता म्हणजे ‘सिस्टीम विथ व्हाइट लिस्टिंग’ तर दुसरा मापदंड संपर्कयंत्रणेला नुकसान न होता लक्ष्य पूर्ण करणे.
सूत्रांच्या माहितीनुसार यात इस्त्रायल, जर्मनीसह भारतातील काही कंपन्यांनी सहभाग घेतला. पण, केलेल्या दाव्याप्रमाणे निष्कर्ष देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे ‘आयडिया फोर्ज’ हिला साथीला घेतलं गेलं. या कंपनीने भारतीय लष्कराला नि सीआरपीएफला सुमारे सातशे ड्रोन पुरवले आहेत. मात्र, अँटी ड्रोन टेक्नॉंलॉजीसाठी सॉफ्ट किल आणि हार्ड किल अशा स्तरावर काम करावे लागते. अँटी ड्रोनसाठी जीपीएस जॅमिंग तंत्राची गरज असते. यापेक्षा अधिक काही तंत्र लागू नये हे पाहिले जात असून सद्यस्थितीत घरगुती विकसित अँटी ड्रोन पद्धत नाही. एका पाश्चिमात्य भागीदाराबरोबर करार अंतिम टप्प्यात आहे. त्याप्रमाणे ब्ल्यू प्रिंट लवकरच हाती मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.
सॉफ्ट किल प्रकारात मूलभूत स्तरावर डिटेक्शन नि मॉनिटरिंग असते. यावर खास असे युएव्हीशी संबंधित डेटा जसं गती, अंतर नि लागणारा वेळ हे तंत्र असतं. प्रगत टप्प्यातील सॉफ्ट किलमध्ये असं तंत्र गरजेचं असतं जे हल्लेखोर ड्रोन आणि त्याचा कंट्रोलर यातील सिग्नल तोडून विमानाला ड्रोन इंटरसेप्ट करायला मदत करेल. प्रोजेक्टाईल्सला निष्क्रिय करण्याची किंवा नष्ट करण्याची क्षमता हार्ड किलमध्ये असते. त्यासाठी नेट्स, बुलेट्स किंवा शॉटगन पॅलेट्स, मोर्टर राउंड किंवा मिसाईलची मदत घेतली जाते. ऍडव्हान्स स्टेजमध्ये हार्ड किलसाठी लेसर, मॅग्नेटिक किंवा अन्य पद्धतीचा वापर केला जातो.
आगामी काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस याच ड्रोनचा प्रभावी वापर करू शकतील, असे दिसून येते. शरद पवार यांच्या ईडी कार्यालय भेटीने जमाव नियंत्रणासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून कार्यकर्ते सूचनांसाठी ऑडिओ ड्रोनचा वापर पोलिसांनी केला. त्या परिसरात शांतता राहवी, यासाठी ड्रोनद्वारे सूचना दिल्या गेल्या. शिवाय मार्गावर लक्षही ठेवण्यात आले. मुंबई पोलिसांकडे सहा ड्रोन आहेत. त्याचा उपयोग करून गणेशोत्सव काळात गर्दीच्या गिरगाव, जुहू चौपाट्यांवर नजर ठेवली होती. राजकीय कारणासाठी बहुदा हा पहिलाच वापर होता. भारतीय विमानतळाची संख्या विचारात घेता मुंबई, दिल्लीसह अशी अनेक विमानतळे आहेत, जिथे याची गरज आहेच!
जम्मू काश्मिरातून कलम ३७० नि ३५ अ हटविल्यानंतर सुरक्षायंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन असल्याने अनुचित प्रकार घडले नाहीत. सद्यस्थितीत ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशनच्या ताब्यात देशाची १३५ विमानतळ सुरक्षेसाठी विविध गॅजेट्स नि तंत्रज्ञान वापराचे अधिकार आहेत. प्रारंभी संवेदनशील नि मेट्रो शहरात अँटी ड्रोनचा वापर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. केवळ सरकारवर यासाठी अवलंबून न राहता सामान्यांनीदेखील चौकस राहून ड्रोनबाबत सहकार्य देण्याची भूमिका घेतल्यास देशांतर्गत सुरक्षितता अधिक मजबूत होईल, असे वाटते. बरोबर ना!”
विनय गजानन खरे..
“ड्रोनने हवाई हल्ल्याची शक्यता भारतासारख्या देशात कितीतरी प्रमाणात अधिक आहे. ज्या देशाने अनेकदा खास सूचना मिळूनसुद्धा असे अनेक हल्ले करू दिले. तेथील यंत्रणा काय हे हल्लेखोरांना चांगले ज्ञात आहे. त्याचबरोबर अनेक हल्ल्याचे कटदेखील उधळून लावण्यात यंत्रणा यशस्वी झाल्याचा दावा अनेकदा केला जातो. भारतातील विमान प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. हे खरं असलं तरीही सुरक्षा हा एक वेगळा आयाम आहे, त्याकडे गंभीरपणे पाहिले गेलेच पाहिजे. विशेषतः विविध क्षेत्रात होत असलेली प्रगती यावर नापाक इराद्याने काही देश लक्ष ठेऊन आहेत. प्रयत्न असे चालू असतात की त्यात खोडा घालणे, दंगेधोपे घडवून आणणे, जेणेकरून अशांतता कायम राहील नि गती, प्रगतीला खीळ बसेल, आर्थिक डोलारा कमकुवत होईल. पण, देशातील काही घटकांना हे कळून चुकले आहे. यामागे कोण आहे ते! त्यामुळे दंग्याचे प्रमाण कमी झालेय.”
“सौदीतील प्रमुख तेल कंपनी आरामको हिच्यावर शेजारील इराणच्या हुती दहशतवादी संघटनेने ड्रोनने हल्ला केल्याने दोन प्लांटला मोठी आग लागली. याचा साहजिकच जागतिक स्तरावर परिणाम झाला नि पडसाद उमटले. सरकारी तेल कंपनीला बसलेला फटका आपल्या तेल पुरवठ्यावर परिणाम करणारा ठरला. त्यामुळे किमती तर भडकल्याच, शिवाय असा हल्ला आपल्यावर होऊ शकतो, त्यावर आपण आळा घालू शकतो का याचीही चर्चा विविध घटकांत होत आहे. याचं उत्तर आहे की भारतीय विमानतळांना सुरक्षित करण्याची ब्ल्यू प्रिंट अंतिम टप्प्यात आहे. आयआयटी मुंबईतून शिकलेल्या चार लोकांची कंपनी ‘आयडिया फोर्ज’ यासाठी काम करीत आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत निश्चित उपाय काय हे ठरवण्यास कंपनीला सांगण्यात आलं असून इतरही काही यावर इलाज शोधत आहेत.”
“विमानतळ सुरक्षेची बजबाबदरी सध्या सीआयएसएफ या केंद्रीय निमलष्करी दलाकडे आहे. त्यांनी मागील काळातच यावर काम सुरू केले आहे. यासाठी अनेक भारतीय तसेच विदेशी कंपन्यांना पाचारण केले होते. पण, समाधानकारक, प्रभावी हाती काही न आल्याने वरील कंपनीला सांगण्यात आलं. नियमितपणे मिळणाऱ्या खबरीनुसार लष्कर ए तोयबा नि जैश ए मोहम्मद या संघटनांकडून नेहमी धमक्या येत असतात. त्यावर ठोस उपाय म्हणून दिल्लीच्या रोहिणी क्षेत्रात अनेकप्रकारे चाचण्या घेतल्या जात आहेत. या कंपनीने डीआरडीओच्या सहकार्याने नेत्रा ड्रोन बनवले आहे. यासाठी दोन मापदंड ठरवले गेले. त्यातील एक आपल्या ड्रोनला नुकसान होऊ न देता शत्रू ड्रोनवर हल्ला करून विमानाची सुरक्षितता म्हणजे ‘सिस्टीम विथ व्हाइट लिस्टिंग’ तर दुसरा मापदंड संपर्कयंत्रणेला नुकसान न होता लक्ष्य पूर्ण करणे.”
“सूत्रांच्या माहितीनुसार यात इस्त्रायल, जर्मनीसह भारतातील काही कंपन्यांनी सहभाग घेतला. पण, केलेल्या दाव्याप्रमाणे निष्कर्ष देऊ शकल्या नाहीत. त्यामुळे ‘आयडिया फोर्ज’ हिला साथीला घेतलं गेलं. या कंपनीने भारतीय लष्कराला नि सीआरपीएफला सुमारे सातशे ड्रोन पुरवले आहेत. मात्र, अँटी ड्रोन टेक्नॉंलॉजीसाठी सॉफ्ट किल आणि हार्ड किल अशा स्तरावर काम करावे लागते. अँटी ड्रोनसाठी जीपीएस जॅमिंग तंत्राची गरज असते. यापेक्षा अधिक काही तंत्र लागू नये हे पाहिले जात असून सद्यस्थितीत घरगुती विकसित अँटी ड्रोन पद्धत नाही. एका पाश्चिमात्य भागीदाराबरोबर करार अंतिम टप्प्यात आहे. त्याप्रमाणे ब्ल्यू प्रिंट लवकरच हाती मिळेल, असे सूत्रांनी सांगितले.”
“सॉफ्ट किल प्रकारात मूलभूत स्तरावर डिटेक्शन नि मॉनिटरिंग असते. यावर खास असे युएव्हीशी संबंधित डेटा जसं गती, अंतर नि लागणारा वेळ हे तंत्र असतं. प्रगत टप्प्यातील सॉफ्ट किलमध्ये असं तंत्र गरजेचं असतं जे हल्लेखोर ड्रोन आणि त्याचा कंट्रोलर यातील सिग्नल तोडून विमानाला ड्रोन इंटरसेप्ट करायला मदत करेल. प्रोजेक्टाईल्सला निष्क्रिय करण्याची किंवा नष्ट करण्याची क्षमता हार्ड किलमध्ये असते. त्यासाठी नेट्स, बुलेट्स किंवा शॉटगन पॅलेट्स, मोर्टर राउंड किंवा मिसाईलची मदत घेतली जाते. ऍडव्हान्स स्टेजमध्ये हार्ड किलसाठी लेसर, मॅग्नेटिक किंवा अन्य पद्धतीचा वापर केला जातो.”
“आगामी काळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस याच ड्रोनचा प्रभावी वापर करू शकतील, असे दिसून येते. शरद पवार यांच्या ईडी कार्यालय भेटीने जमाव नियंत्रणासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून कार्यकर्ते सूचनांसाठी ऑडिओ ड्रोनचा वापर पोलिसांनी केला. त्या परिसरात शांतता राहवी, यासाठी ड्रोनद्वारे सूचना दिल्या गेल्या. शिवाय मार्गावर लक्षही ठेवण्यात आले. मुंबई पोलिसांकडे सहा ड्रोन आहेत. त्याचा उपयोग करून गणेशोत्सव काळात गर्दीच्या गिरगाव, जुहू चौपाट्यांवर नजर ठेवली होती. राजकीय कारणासाठी बहुदा हा पहिलाच वापर होता. भारतीय विमानतळाची संख्या विचारात घेता मुंबई, दिल्लीसह अशी अनेक विमानतळे आहेत, जिथे याची गरज आहेच!”
“जम्मू काश्मिरातून कलम ३७० नि ३५ अ हटविल्यानंतर सुरक्षायंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेऊन असल्याने अनुचित प्रकार घडले नाहीत. सद्यस्थितीत ब्युरो ऑफ सिव्हील एव्हिएशनच्या ताब्यात देशाची १३५ विमानतळ सुरक्षेसाठी विविध गॅजेट्स नि तंत्रज्ञान वापराचे अधिकार आहेत. प्रारंभी संवेदनशील नि मेट्रो शहरात अँटी ड्रोनचा वापर केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. केवळ सरकारवर यासाठी अवलंबून न राहता सामान्यांनीदेखील चौकस राहून ड्रोनबाबत सहकार्य देण्याची भूमिका घेतल्यास देशांतर्गत सुरक्षितता अधिक मजबूत होईल, असे वाटते. बरोबर ना!”
ड्रोनने हवाई हल्लेभारतसौदीआरामकोआयडिया फोर्ज’आयआयटी मुंबईलष्कर ए तोयबाजैश ए मोहम्मददिल्ली’सिस्टीम विथ व्हाइट लिस्टिंग’

