Details
डॉक्टर आणि पेशंटमध्ये सुसंवाद आवश्यक!
01-Jul-2019
”
वैभव मोहन पाटील
[email protected]
डॉक्टर ह्या नावाबद्दल समाजात प्रचंड आदर असतो. डॉक्टर हा आजारातून बरे करणारा, जीव वाचवणारा व रूग्णाची काळजी घेणारा असल्यामुळे कुटुंबासाठी तो एक प्रकारचा वरदानच ठरतो. निरनिराळे आजार व त्यावरील आधुनिक संशोधन यामुळे वैद्यकीय क्षेत्र फार झपाट्याने बदलू लागले आहे. मात्र या बदलांबरोबरच आजारपण किंवा डॉक्टरी इलाजातील खर्चातदेखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळेच आजच्या बदलत्या काळात डॉक्टर व पेशंट यांच्यातील दरी दिवसेंदिवस रूंदावत आहे. सुसंवादाचा अभाव तसेच विविध कारणांतून निर्माण झालेले गैरसमज हे त्यामागील एक प्रमुख कारण आहे. जीवनदान देणारा डॉक्टर कोणत्याही रूग्णाला देवापेक्षा अधिक जवळचा असतोच. मात्र महागड्या वैद्यकीय सेवांमुळे पेशंट व त्यांचे नातेवाइक अस्वस्थ आहेत. आजारातून कायमस्वरूपी मुक्त तर व्हायचे आहे; पण त्यासाठी पैसे कसे उभे करायचे, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. वैद्यकीय जगतातील बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या महागड्या सुविधा आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या पेशंटपर्यंत पोहोचविण्याची धडपड डॉक्टर मंडळींकडून केली जाते. यासाठी पेशंटचे समुपदेशन करण्यापासून शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्नदेखील केला जातो. गरीब कुटुंबातील रूग्ण अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेण्यापर्यंत पोहोचत नाहीत. आर्थिकदृष्ट्या सबळ रूग्ण मात्र सर्वप्रकारच्या वैद्यकीय सुविधा सहज मिळवतो. ही दरी आरोग्य क्षेत्रात प्रकर्षाने पाहयला मिळते.
वैद्यकीय कारणांसाठी कर्ज, आर्थिक विवंचना ही कारणेदेखील रूग्णाचे मनोबल खच्ची होण्यास कारणीभूत ठरतात. मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेला रूग्ण फार काळ तग धरत नाही किंवा आजारातून लवकर बरा होत नाही. त्यामुळे या परिस्थितीत डॉक्टरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. अनेक डॉक्टर रूग्णाला मानसिक विवंचनेतून बाहेर काढण्यात यशस्वी ठरतात. दोन विचारांचा समांतर प्रवास दोन्ही बाजूंना एकमेकांना समजून घेण्यात झाला पाहिजे. मात्र आजकाल हा सुसंवादाचा अभाव व गैरसमजुतीतून निर्माण झालेली दरी यामुळे ह्या क्षेत्रातील वातावरण काही फार बरे राहिलेले नाही. परिणामी, रूग्णांच्या नातेवाईकांकडून हॉस्पिटल्सची तोडफोड वा डॉक्टरांना मारहाण, कर्मचाऱ्यांना मारहाणीचे प्रकार घडत आहेत. दुसरीकडे उपचारांचे पैसे भरले नाही म्हणून मृतदेह अडवून ठेवण्याचा निर्जीवपणाही रूग्णालयांच्या मानसिकतेत रूजत आहे हे लक्षात येते. अशा स्थितीत डॉक्टर व पेशंटचा नियमित सुसंवाद व रूग्णाच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन उपचारांचा प्रवास सुरू झाला तर ती बाब दोन्ही बाजूंच्या विश्वासार्हतेला व पारदर्शीपणाला बळ देणारी ठरणार आहे. त्याचा अंगिकार पेशंट व त्यांच्या नातेवाईकांनीही नवे बळ व आत्मविश्वास देणारा नक्कीच ठरेल.
डॉक्टर व रूग्ण यांच्यातील सततच्या वादाचे मुद्दे यानिमित्ताने विचारात घेतले पाहिजेत. किरकोळ कारणांवरून डॉक्टर किंवा रूग्णालय प्रशासन आणि रूग्णाचे नातेवाईक यांच्यात नेहमीच खटके उडत असतात. रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसतात, नर्स लक्ष देत नाहीत, डॉक्टर आमच्या रूग्णाच्या आजाराबाबत आम्हाला व्यवस्थित माहिती देत नाहीत, हॉस्पिटलचे बिल प्रमाणापेक्षा जास्त आहे, हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित रूग्णसुविधा मिळत नाही, डॉक्टर पेशंटला जास्त वेळ देत नाहीत, स्वच्छता नाही, वैद्यकीय क्षेत्र हे सेवा कार्य असले तरी व्यावसायिक दृष्टीने डॉक्टर्स वागतात, कट प्रॅक्टीसवर भर देतात, अनेक डॉक्टरांशी संधान असल्याने गरज नसताना अनेक चाचण्या केल्या जातात, पेशंटच्या नातेवाइकांना शिस्त लावण्याच्या नावाखाली अरेरावी केली जाते, पार्किंग सुविधा नसते, हॉस्पिटलमध्येच मेडिकलची परवानगी देऊन त्यात भागीदारी ठेवली जाते व पेशंटला तेथूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जाते, एकाच आजारावरील उपचार खर्चाची दोन वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये वेगवेगळ्या रकमेची बिले कशी होऊ शकतात अशा अनेक तक्रारी पेशंटच्या व त्यांच्या नातेवाइकांच्या नेहमीच असतात. मात्र डॉक्टर मंडळींच्या मते पेशंटच्या अचूक रोगनिदानासाठी आवश्यक वैद्यकीय चाचण्या गरजेच्या असतात. या चाचण्या व त्यांची उपयुक्तता ही पेशंटच्या नातेवाईकांना सहज समजण्यासारखी नसते. तरीही तिच्याविषयी आवश्यक ती माहिती दिली जाते, तरीही सविस्तर सांगण्याचा निष्कारण आग्रह धरला जातो. आपल्याच पेशंटच्या आरोग्यासाठी डॉक्टरांची सुरू असलेली धडपड मात्र विचारात घेतली जात नाही. डॉक्टरांनी सतत आपल्याच पेशंटकडे लक्ष ठेवले पाहिजे, अशी अवाजवी अपेक्षा ठेवली जाते. हॉस्पिटल्समध्ये दुसरे पेशंट जरी असले तरी त्यांनाही आराम पडावा म्हणून सहकार्याची भावना ठेवली जात नाही, परिसर स्वच्छतेसाठी रूग्णाच्या नातेवाईकांकडून प्रयत्न होत नाहीत, पेशंट डिस्चार्जला आला की दबाव आणून बिल कमी करण्याबाबत दबाव टाकला जातो, मारामारी, शिवीगाळ, हमरीतुमरी, अरेरावी व तोडफोडीचे प्रकार लगेच सुरू होतात. डॉक्टर आपल्याला लुटतात असा भ्रम करवून घेऊन दहशतीने हॉस्पिटल वेठीस धरण्याचे प्रकार होतात ह्या डॉक्टर व रूग्णालयाकडील बाजू आहेत.
वास्तविक डॉक्टर व पेशंट ही एकमेकांना पूरक अशी जीवनप्रणाली आहे. एकमेकांच्या विश्वासावर चालणाऱ्या या समांतर व्यवस्थेत नियमित समन्वय राहणे आवश्यक आहे. आजच्या गतिमान जीवनात अनेकविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. बाहेरचे निकृष्ट खाणे, फास्टफूड, धावपळीचे काम, कामातील ताणतणाव, पुरेशा विश्रांतीचा अभाव, व्यसनाधीनता, व्यायाम व हालचालीतील अभाव अशा अनेक कारणांनी मानवी आरोग्य जीवन धोक्यात सापडले आहे. शारीरिक व मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे. रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मेंदू रोग, किडनी विकार, पोटाचे विकार, नेत्रविकार, दंत विकार, पाठदुखी, कंबरदुखी, फुफ्फुसाचे आजार या नेहमीच्या आजारांसह डेंगी, स्वाइन फ्लू, चिकनगुनिया व अन्य आजाराचे विविध प्रकार वाढले आहेत. एकीकडे असे नवनवीन आजार वाढत असताना वैद्यकीय क्षेत्रही नवनवे शोध लावण्यात व्यस्त आहे. रोगाचे अचूक निदान करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र तंत्रज्ञान बदल झाला आहे. अनेक मोठ्यामोठ्या मशीन्स अवघ्या काही सेकंदात आजाराचे नेमके निदान करू लागल्या आहेत. अशा आधुनिक साधनांची सज्जता ही प्रत्येक हॉस्पिटल्सची गरजही झाली आहे. मात्र, या सज्जतेसाठी आर्थिक पाठबळही महत्त्वाचे असते. यासाठी तेव्हढी रूग्णसंख्या हॉस्पिटलला मिळणेदेखील तितकेच गरजेचे असते. रूग्णांनी आपल्याच हॉस्पिटलमध्येच उपचार घ्यावेत, यासाठीचे निरनिराळ्या क्लृप्त्या लढवल्या जातात.
मात्र यामुळे प्रकारांमुळे डॉक्टर व रूग्ण यांच्यातील संवादात दरी पडू लागली आहे. ती सांधण्याची जबाबदारी आता दोन्ही बाजूंवर आली आहे. आपल्या व अन्य रूग्णांना आधुनिक उपचारांतून जीवनदान मिळावे यासाठी प्रत्येक डॉक्टर सदैव प्रयत्नशील असतो हे रूग्णांच्या नातेवाईकांनी जसे समजून घेणे गरजेचे असते, तसेच पेशंट गरीब आहे की श्रीमंत असा भेदभाव न करता जीवनदान देण्यासाठी आपले वैद्यकीय ज्ञान वापरण्याची मानसिकता डॉक्टरांनी अंगिकारणे गरजेचे असते. पेशंटची आर्थिक ताकद समजून घेऊन त्यानुसार त्याच्यावर उपचार करणे तसेच फार आवश्यकता नसलेल्या विविध महागड्या चाचण्या टाळल्या पाहिजे. यासाठी समुपदेशन व सुसंवाद या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांना त्यांच्या आजाराविषयी घाबरवून न सोडता, संवादातून त्यांना आधार देणे व त्यांची मानसिकता प्रबळ करणे आवश्यक आहे. शासकीय रूग्णालयेदेखील कात टाकत आहेत त्यामुळे सरकारी वैद्यकीय सेवांचा लाभ घेणे फायदेशीर आहे. रूग्णसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या सरकारी यंत्रणेचा वापर नागरिकांनी करायला हवा. न परवडणाऱ्या उपचारांचे वैद्यकीय क्षेत्रासमोर उभे राहिलेले आव्हान पेलण्यासाठी शासकीय आरोग्यसेवा बऱ्यापैकी मदत करू शकतील. ग्रामीण भागात या सेवांची वाढलेली व्याप्ती व त्यात होत असलेल्या सुधारणा या बाबी रूग्णांना आरोग्यसेवेच्या अधिक जवळ आणण्यास मदत करतील अशी आशा आहे.”
“वैभव मोहन पाटील