Details
झीनत अमान यांना आर. डी. बर्मन जीवनगौरव पुरस्कार प्रदान!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
विख्यात अभिनेत्री झीनत अमान म्हणजे ७० च्या दशकातील बॉलीवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री, जिने चाकोरीबाहेरील बिनधास्त भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले. झीनत यांना फिल्म इंडस्ट्रीतील योगदानाबद्दल नुकताच ‘आर. डी. बर्मन जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला.
झीनत अमान नायिका असलेल्या सुमारे २४ हिंदी चित्रपटांना आर. डी. बर्मन यांचे संगीत लाभले. नायकाशी जमावी तशी ही जोडी जमली होती. त्यामुळेच यंदा या पुरस्कारासाठी झीनत यांची निवड झाली होती. एक लाख रूपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी झीनत अमान आणि पंचमदांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी रसिकांनी गर्दी केली होती. स्वरदा कम्युनिकेशन्स अँड इव्हेंट्स आणि एकदंत प्रतिष्ठानने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बोरिवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार व शिवसेनेचे विभागप्रमुख विलास पोतनीस, मुंबई महापालिकेच्या विधि समितीच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या महाराष्ट्र राज्य प्रमुख चित्रा उबाळे आणि हिमांशू मणियार, विनायक सामंत आदी यावेळी उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो