HomeArchiveज्येष्ठ साहित्यिक वसंत...

ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना जनस्थान पुरस्कार जाहीर!

Details
ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना जनस्थान पुरस्कार जाहीर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
ज्येष्ठ लेखक, साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांना मराठी साहित्य वर्तुळात महत्त्वाचा मानला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरूप असून येत्या २७ फेब्रुवारीला नाशिक येथे सभारंभपूर्वक हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी घोषणा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मंगळवारी केली.

वसंत आबाजी डहाके यांचे योगभ्रष्ट, शुभवर्तमान, चित्रलिपी, वाचाभंग हे कवितासंग्रह, यात्रा-अंतर्यात्रा व मालटेकडीवरून हे लेखसंग्रह, साहित्य आणि दृश्यकला यासारखे समीक्षालेखन प्रसिध्द झाले आहेत. तसेच मराठी वाड्मयकोशात त्यांनी मोलाची भर घातली असून समकालीन वास्तवाचे भान जागृत करणाऱ्या या लेखकाची जनस्थान पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संजय जोशी, सदानंद बोरसे, मोनिका गजेंद्रगडकर, विलास खोले, रेखा इनामदार-साने आणि जयंत पवार यांचा या निवड समितीमध्ये समावेश होता. दर दोन वर्षांनी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. यंदाचा हा १८ वा पुरस्कार असून यापूर्वी विजय तेंडूलकर, इंदिरा संत, विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ आदी ज्येष्ठ साहित्यिकांना देण्यात आला आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content