Details
जागतिक सिनेमा म्युझियममध्ये दादासाहेब फाळके यांचा पुतळा!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचे म्युझियम बनणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासाठी शासन आग्रही असल्याचे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा अतिशय दिमाखदार पद्धतीने पार पडला. 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळा रविवारी ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, उज्ज्वल निरगुडकर, संकलक कॅरॉल लिटलटन, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सांस्कृतिक कार्यमंत्री यांच्या पत्नी वर्षा तावडे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनील शिंदे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या चित्रपट सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना तावडे म्हणाले की, अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर ॲवॉर्डस) कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत आवश्यक ती सर्व मदत राज्यशासनामार्फत करण्यात येईल. आज भारतात सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. त्यामुळेच बॉलिवूड नगरी असलेल्या भारतात बेली पहिल्यांदा येत असताना अत्यंत आनंद होत आहे. ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहेत. मात्र मुंबईत कार्यालय सुरू केल्यास येथे आशियातले एक केंद्र म्हणून या केंद्राकडे पाहता येईल.
56 व्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याुमध्ये यंदा उत्कृष्ट चित्रपट भोंगा ठरला तर उत्कृष्ट अभिनेता के. के. मेनन व उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे यांनी पुरस्कार पटकााविला. वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले तर परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रूपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. भरत जाधव यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 3 लाख रूपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सोहळ्यात देण्यात आलेले पुरस्कार
सर्वोत्कृष्ट कथा- सुधाकर रेडी (नाल)
सर्वोत्कृष्ट पटकथा- शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे (भोंगा)
सर्वोत्कृष्ट संवाद- विवेक बेळे (आपला माणूस)
सर्वोत्कृष्ट गीत- संजय पाटील (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट संगीत- राजेश सरकाटे (मेनका उर्वशी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- विजय गवंडे (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- ऋषिकेश रानडे (व्हॉट्सअप लग्न)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- प्रियंका बर्वे (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- उमेश जाधव (मेनका उर्वशी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता- के. के. मेनन (एक संगायचाय अन्सेड हॉर्मनी)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- मुक्ता बर्वे (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता- स्वानंद किरकिरे (चुंबक)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री- छाया कदम (न्यूड)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता- फिरोज शेख (तेंडल्या)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री- गौरी कोठवदे (पुष्पक विमान)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती- शांताई मोशन पिक्चर्स (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन- सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर (तेंडल्या)
सर्वोत्कृष्ट चित्रपट- भोंगा”
“केएचएल न्यूज ब्युरो