HomeArchiveचिंतामुक्त जीवन हीच...

चिंतामुक्त जीवन हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!

Details
चिंतामुक्त जीवन हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

वैभव मोहन पाटील
[email protected]
मनुष्याने आपले आरोग्य स्वतः जपले पाहिजे. डॉक्टरी उपचार घेण्यापेक्षा आजार जडू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टी आपले आरोग्य अबाधित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आज प्रत्येकजण आरोग्य व सामाजिक स्थैर्य प्राप्त करण्याऐवजी धनप्राप्तीच्या मागे अधिक लागल्याचे पाहयला मिळत आहे. धन मिळवण्यासाठी आरोग्याची हेळसांड करणे व मिळवलेले धन हे निरोगी आयुष्य पुन्हा मिळवण्यासाठी खर्च करणे हा आजचा पायंडा बनत चालल्याचे अनेक कुटुंबांकडे पाहिले तर लक्षात येईल.

खरेतर आवश्यकतेपेक्षा जादा द्रव्याचा संचय करणे म्हणजे अनेक प्रकारच्या व्याधी लावून घेणे. त्यातूनच पुढे मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे जीवघेणे आजार उत्पन्न होतात. म्हणून आपल्या जीवनात शिस्त लावून घेऊन आपल्या आवश्यकतेइतकेच कमवावे, हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आज मानवी आयुष्यापेक्षा पैसा सर्वात श्रेष्ठ झाल्याचे दिसत आहे. पैशासाठी आरोग्‍याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची संख्‍या आज मोठी आहे. जीवनात नियोजनही केले पाहिजे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेल इतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकारांचे मूळ आहे. त्यातूनच सर्व व्याधींना सुरूवात होते. त्यामुळे आवश्यक गरजेपुरते कमवा आणि त्यानंतर चिंताविरहित जीवन जगा, हेच सूत्र आपल्या जीवनात कायम ठेवायला हवे. त्यामुळे तुम्हाला कधीही निराश व्हावे लागणार नाही.

सध्या वाहिन्यांचे मायाजाल सुरू आहे. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अनेक मालिका आज घराघरात हैदोस घालत आहेत. त्यातील पटकथा, संवाद व संदेश यांचा संबंध क्वचितच प्रबोधनाशी येतो. या वाहिन्यांवरील मालिकाही आपले जीवन बिघडवू शकतात. त्यामुळे लहान व किशोरवयीन मुलांना अशा मालिकांपासून लांब ठेवणे गरजेचे आहे. तसेच स्त्रियांनीही तथाकथित कौटुंबिक व स्त्रीप्रधान असे म्हणविणाऱ्या मालिकांपासून दूर राहिले पाहिजे. कारण त्यामध्ये स्त्री ही पाताळयंत्री, प्रचंड चिथावणीखोर व भांडखोर असल्याचे सर्रास भासविले जाते. आपल्या परंपरागत संस्कारातूनच मुलांची जडणघडण झाली पाहिजे. त्यामुळे परस्परांमध्ये असलेले नातेसंबंध आणि माणसा-माणसांतील आवडी-निवडी जपायला हव्यात हेदेखील तितकेच खरे आहे.

कुटुंबवत्सलता व सुसंस्कृतपणा हरवण्याला पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव कारणीभूत ठरताना दिसत आहे. जीवनात शिस्त महत्त्वाची असून, दैनंदिन नियोजनही आवश्यक आहे. अधिक प्रमाणावर धनप्राप्ती चिंतेचे मूळ आहे आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे. त्यामुळे गरजेपुरते कमवा आणि चिंताविरहित जीवन जगा. आपले दैनंदिन आयुष्य खूप ताणतणावांनी भरलेलं आहे. दिवसभरात आपण वेगवेगळ्या भावनांच्या कटाक्षातून जात असतो. भीती, राग, व्देष, ईर्षा, मत्सर या भावनांच्या अंमलाखाली जगताना होणारी दमछाक सगळ्यांच्या अनुभवाची आहे. मनाला सतत टोचणी देणारे विचार येत राहतात ते येऊ नये अशी आपली कितीही इच्छा असली तरी अशा वेळेस मन आपले ऐकत नाही व आपण भरकटतो. बऱ्याच विद्वानांनी म्हटलंय ‘मन’ हे एक माकड आहे जे सतत अस्वस्थ असते आणि त्यात ते भावनेच्या आहारी गेले की व्यसनी माकडासारखे वागते. त्यामुळे एकाग्रता, साधना हीदेखील विचलित मनाला संयमित ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

आधुनिक संशोधनानुसार साधारणतः ९५ टक्के विचार असे असतात जे रोज तुमच्या डोक्यात पुन्हा पुन्हा येत असतात आणि हाच मनाचा तो स्वभाव आहे. भूतकाळातील आठवणींबद्दलचे विचार, भविष्याबद्दलची चिंता आणि लोकांना आपल्याबद्दल काय वाटते अशा प्रकारचे विचार निर्माण करतात. काही विशिष्ट ध्यानधारणा व श्रद्धा मनामध्ये एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करते. ही ऊर्जा सकारात्मक विचारांना प्रोत्साहित करते. परदेशात ट्रान्स्डेनटल मेडिटेशन नावाचा प्रकार खूप लोकप्रिय झाला असून हे दुसरं काही नसून जप साधनाच आहे. कित्येक सिनेकलावंत मंडळी ह्या ट्रान्सडेन्टल मेडिटेशनने त्यांच्या आयुष्यात घडवलेल्या बदलाबद्दल अनुभवसंपन्न आहेत. त्यामुळे निरोगी आयुष्यासाठी ही ध्यान व जपसाधना अत्यंत आवश्यक आहे. मनुष्याच्या आयुष्यावर दैनंदिन वर्तणूक व एकाग्रता मोठा परिणाम करतात. निरोगी व समाधानाचे आयुष्य जगण्यासाठी छोटेमोठे बदल आयुष्यात घडवायलाच हवेत. धन व संपत्ती हे चिंतेचे कारण असून आपल्या आयुष्यात चिरकाल टिकणारे नाही. मात्र स्वतःचे आरोग्य जपणे हे सुखी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे चिंतामुक्त जीवन जगा व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आत्मसात करा.”
 
“वैभव मोहन पाटील

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content