HomeArchiveचंद्रिका ते प्रियांका...

चंद्रिका ते प्रियांका – शिवसेना धडा शिकणार केव्हा?

Details
चंद्रिका ते प्रियांका – शिवसेना धडा शिकणार केव्हा?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशभरातील प्रादेशिक राजकीय पक्षांची चर्चा ऐरणीवर आली. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सामना करण्यासाठी विरोधी काँग्रेसच्या साथीला प्रादेशिक राजकीय पक्ष सरसावले आहेत. मात्र राज्यापुरते सांगायचे तर प्रादेशिक अस्मिता स्वीकारून शिवसेना प्रभावी प्रादेशिक राजकीय पक्ष मान्यता पावला आहे. मराठीचा मुद्दा राजकीय शक्ती ठरू न शकल्याने हिंदुत्वाच्या नावाने याच शिवसेनेने भारतीय जनता पक्षाशी गेल्या २५ वर्षांपासून युती केली. मागील विधानसभेच्या निवडणुकीत ही युती तुटली. ती तुटल्याचा लाभ भाजपलाच झाला. यापूर्वी शिवसेना हा मोठा राजकीय पक्ष होता. आता थोरल्या भावाची भूमिका भाजपकडे गेली आहे. याचा अर्थ प्रादेशिक पक्ष म्हणून जो शिवसेनेचा दबदबा होता, तो अर्थातच कमी झाला. मात्र शिवसेनेला सत्य पचविता येत नाही.

शिवसेना म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे शिवसेना असे समीकरण बाळासाहेब ठाकरेंनी सिद्ध केले. पुढे राष्ट्रीय पातळीवरही शिवसेना पोहोचली पाहिजे अशी स्वप्ने पडू लागल्याने अनेक अमराठी मान्यवरांना राज्यसभेची खासदारकी देऊन शिवसेनेने उपकृत केले. महाराष्ट्राबाहेर शिवसेना पोहोचावी हा हेतू असण्यात काही गैर नाही. मात्र ज्यांना शिवसेना कळलीच नाही, ज्यांचे मराठी माणसांशी, मराठी मातीशी इमान नाही. असे अमराठी लोक शिवसेनेचे खासदार झाले. त्यांनी शिवसेनेला काय दिले? दिल्लीत खासदारकी मिळविली. मान-सन्मान मिळविला, मात्र मराठी माणसांना अशा मान्यवरांनी आपलसं केले नाही. केवळ खासदारकी मात्र उपभोगली. अशा आयात केलेल्या लोकांनी फक्त शिवसेनेचा फायदा उठविला. नंतर हे चेहरे कोठे दिसले नाहीत.

मराठी-मराठी आणि भूमिपुत्र करतकरत शिवसेनेने राज्यसभेच्या खासदारकीसाठी परप्रांतियांसाठी पायघडया घातल्या. सुरूवात झाली ती चंद्रिका केनिया यांच्यापासून. खेळात प्राविण्य असलेल्या केनिया त्यावेळी काँग्रेसमधून राज्यसभेसाठी शिवसेनेत आल्या. त्यांची कारर्कीद कुणालाच कळली नाही. केनिया यांच्यानंतर मराठावाडयातील उद्योगपती राजकुमार धूत यांना शिवसेनेने राज्यसभेत पाठविले. पत्रकार प्रीतीश नंदी यांनाही राज्यसभेचे महाद्वार खुले केले. नंतर अमराठी संजय निरूपम यांना खासदार केले. समाधानाची बाब हीच की पत्रकार भारतकुमार राऊत यांना खासदारकीचा मान उद्धव ठाकरेंनी दिला. म.टा.चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार उद्धव ठाकरेंना मिळाला. त्यानंतर राऊत यांना राज्यसभेचे बक्षीस मिळाले. खासदारकी गेल्यावर राऊतांनी शिवसेनेला चार पावले दूरच ठेवले.

भारतकुमार राऊत याच्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना राज्यसभेची दुसरी टर्म मिळाली. राऊतांच्या जागी राऊत आले. मात्र हे राऊत शिवसेनेचे आणि बाळासाहेबांचे कडवट निष्ठावंत. बाळासाहेबांची ठाकरी भाषा संजय राऊत यांच्या नसानसात आहे. शब्दांचे प्रहार करुन हे राऊत अनेकांना रक्तबंबाळ करुन सोडतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांना राऊत यांनी अंगावर घेतले. जेथे उद्धव ठाकरे कमी पडले तेथे याच राऊतांनी तोफखाना चालवून भाजपला सळो की पळो करून सोडले. भाजप शिवसेना युती होणार नाही, अशीच भूमिका घेतली. शेवटी शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातोश्रीचे उंबरठे झिझवावे लागले. पडद्यामागे राऊतांची भूमिकाच यशस्वी झाली.

संजय राऊत यांनी लेखणीच्या माध्यमातून शिवसेना तळपत ठेवली. सामनाची सारी जबाबदारी आज राऊतांच्या खांद्यावर आहे. हे राऊत शिवसेना आक्रमक ठेवण्यासाठी कायम झटत आहेत. खऱ्या अर्थाने राऊत आज शिवसेनेचे दिल्लीतील वाघ आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. राऊत यांच्यासारखे अनेक गुणी नेते आज शिवसेनेत आहेत. बाहेरून नामवंतांना बोलावून खासदारकी देताना, अशा गुणी आणि निष्ठावंताचा विचार झाला नाही, हे कटू सत्य आहे. भाजपमधून आलेल्या मनिषा कायंदे यांना थेट विधान परिषदेची हुकुमी आमदारकी दिली गेली. सोबत टीव्हीवर चमकण्याची संधीही.. असो.

आता अलीकडची बाब म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियांका चर्तुवेदी यांना शिवसेनेने उपनेतेपद बहाल केले. लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रसने उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी त्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली. भाजपच्या सल्ल्याने त्या मातोश्रीवर पोहोचल्या आणि त्यांनी शिवबंधन जवळ केले. काल आल्या आणि उपनेत्या झाल्या. शिवसेनेत अनेक गुणी, निष्ठावंत असताना त्यांना संधी दिली जात नाही. बाहेरच्यांना मात्र सत्तेची, मानाची पदे कशी काय मिळतात? हा मराठी बाणा असा कसा? शिवसेनेच्या वाढीसाठी कष्ट घेणारे अशावेळी दिसत कसे नाहीत? प्रादेशिक पक्षांची भूमिका त्या-त्या राज्यात प्रबळ आणि आक्रमक असताना आपला महाराष्ट्र मात्र याला अपवाद कसा? शिवसेनेने एकेकाळी मराठी माणसांची मने जिंकली होती. पण आज पन्नाशीनंतरही मते का मिळत नाही, हा सवाल निर्माण होतोच. पण लक्षात कोण घेतो? हेच खरे!”
 
“विलास मुकादम, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...

रणवीरने पहिल्याच दिवशी पछाडले शाहरुख खानला!

19 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंदर 2 : द रिव्हेंज'ने बॉलीवूडच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले. पहिल्याच दिवशी तब्बल ₹ 102.55 कोटी नेट कलेक्शन आणि जागतिक पातळीवर ₹ 200 कोटींचा आकडा पार करत हा चित्रपट बॉलीवूडचा सर्वकालीन सर्वात मोठा ओपनर...

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....
Skip to content