HomeArchiveखड्डे आहेत तरी...

खड्डे आहेत तरी कुठे?

Details
खड्डे आहेत तरी कुठे?

    20-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
विनोद साळवी..
 
 
कुठंही जा वाहनचालक आणि नागरिकांचं आपलं खड्डेपुराण सुरूच आहे. इथे खड्डे तिथे खड्डे. मुंबई-गोवा महामार्गावर तर खड्डे नावाचा सिनेमा काढायचं ठरलं तर तेही शक्य आहे. अगदी सर्वांगाचा कसा खुळखुळा होतो. एसटीचा लाल डब्बा किती खोल खड्ड्यात आदळून माणसाला आपटतो, हे प्रतिक्रियांसह आवश्यकता असल्याच काहींच्या मोडलेल्या हाडांचे एक्स रेही घेता येतील. उगाच आपलं सरकार आणि सदा कार्यतत्पर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने शंखनाद करायचा. अहो, आताच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सिंधुदूर्गला जाऊन आले. त्यांना कुठेच काही दिसलं नाही. याच खड्ड्यांवरून आणि रस्त्याच्या दुरवस्थेवरून भाजपवासी होण्याच्या तयारीत असलेले नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी एका सरकारी अधिकार्याचच्या अंगावर चिखलगाळाने भरलेली बादली ओतली होती. आपण किती आक्रमक लोकप्रतिनिधी आहोत, हे दाखवण्यासाठी. आता मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला उभे राहताना त्यांना कुठेच खड्डे अथवा खराब रस्ते दिसले नाहीत. असो कोकण, नाशिक, मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि सर्वदूर कुठेही रस्त्यांवर खड्डे नाहीत. चंद्रावर असला तर.. माहित नाही.
 
 
मुख्यमंत्री नाशिक दौर्यानसाठी निघताच आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौराही एक दिवसांवर असताना नाशकात नावालाही खड्डा दिसू द्यायचा नाही, असा पणच महापालिकेने केला. तरीही आपलं नुसत खड्डे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, याचं उत्तर आणि सरकार, महापालिका, नगरपालिकांची कार्यतत्परता पाहून लागलीच यावं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पालघर जिल्ह्यांत वसई, विरार, डहाणूचा दौरा करत असताना फक्त गुळगुळीत रस्ते दिसले. खड्ड्याचं नामोनिशाणंही नव्हतं. खड्ड्यांत गेलेला पालघर-मनोर रस्ता अवघ्या १२ तासांत बुजवण्याची तत्परता फक्त व्हीआयपी, व्हीव्हीआयपी किंवा नेता आल्यावर दाखवली जाते, हे थोडकं नव्हे का, उठसुठ आपलं खड्डे प्रश्नावर सरकारला झोडपायचं. हेच आदित्य ठाण्यातही जनआशीर्वाद यात्रेसाठी आले त्यांना एसी बस आणि अलिशान गाडीतून फिरताना जराही रस्त्यावर खड्डाखुड्डा असल्याचं जाणवलं नाही. ते कल्याणला जाणार म्हणून तेथेही खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावर खडी-रेती-डांबराचा मुलामा देण्यात आला. आणखी कायं हवयं?
 
 
सामान्य माणसांनी कितीही खड्डे दाखवले किंवा अगदी याच खड्ड्याचं श्राद्ध घालण्याचं आंदोलन केलं तरी फारसा फरक पडत नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री, एखाद्या पक्षाचा प्रमुख नेता आडवाटेला आला रे आला की खड्डाचं दिसू द्यायचा नाही. आपल्या महाराष्ट्रात खड्ड्यात पडून मृत्यू होण्याच्या छोट्या-मोठ्या दुर्घटना दरवर्षी घडत असतात. पण, आपला प्रदेश मोठा असल्याने खड्डेमय रस्त्यांसारख्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी आपलं सरकार, महापालिका, नगरपालिकांना फारसा वेळ नसावा. तरीही आपलं विचारायचं कुठून ठेवलाय महाराष्ट्र माझा, पाऊसही असा पडतो की वर्षानुवर्षे मजबूत आणि टिकाऊ बनवलेले रस्तेही उखडून पडतात. यात कंत्राट आणि प्रशासनाचा दोष तो काय, जुलै २०१८मध्ये कल्याण शहरात पाच नागरिकांचा खड्डेबळी गेला. भ्रष्टाचारापासून कोसो दूर असलेली कल्याण-डोंबिवली महापालिका आपल्या बजेटमध्ये फक्त खड्डेदुरस्तीसाठी ९ कोटींची तरतूद करते. पण, २०१८मध्ये त्यांना कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यावर फारसे खड्डे न दिसल्याने अवघा १ कोटीचा निधी खर्च केला. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश या चार राज्यांपुरता विचार केल्यास दहशतवादी हल्ल्यांपेक्षा किंवा सीमेवर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांपेक्षा नागरिकांचे बळी गेले आहेत. ते फक्त खराब आणि खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांमुळे.
 
 

 
 
 
वर्ष २०१७च्या आकडेवारीवर नजर टाकता ३५९७ जणांचा बळी हा खराब रस्त्यांनी गेल्याचे सप्रमाण आकडेवारी सांगते. त्यात महाराष्ट्रातील ७२६ बळींचा समावेश आहे. २०१६ मध्येही उत्तर प्रदेश ७१४ मृत्यूच्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र होता. एकूण खराब रस्ते बळींची संख्या ३२९ होती. ११ ऑगस्ट २०१९ रोजी कल्याण पत्री पुलाचा रस्ता खड्ड्यात गेल्याने अरूण महाजन या ५५ वर्षीय नागरिकाचा अपघाती मृत्यू झाला तर विलास रेडकर हे ६० वर्षीय नागरिक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर कल्याणमधील ऑटोरिक्षा युनियन आणि काही राजकीय संघटनांनी या मार्गावर रस्ते दुरूस्तीसाठी तीव्र आंदोलन केले. परंतु, आंदोलने व वृत्तवाहिन्यांसमोर खड्डेप्रश्नावर नागरिकांनी आकांडतांडव केले तरी त्याची दखल नाहीच. पण, तुमच्या भागात पंतप्रधान, मुख्यमंत्री, कुणी बडा नेता येणार असेल तर आपोआप खड्ड्यांच्या रांगोळीवर आपोआप पडदा पडावा. जेणेकरून साहेबांना खड्ड्यांमुळे कुठे धक्काही बसू नये, हानी पोहोचू नये. आता तर आदित्य ठाकरे कल्याण-डोंबिवलीत जाणार असल्याचे कळताच प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी खराब रस्ते नीटनेटके करण्यासाठी तत्परतेने बाहेर पडले. अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना खड्ड्याखुड्यांचा त्रास होता कामा नये, ही कार्यतत्परताच खड्डे आहेत तरी कुठे? असा उलट सवाल करून आपली पंचाईत करते.

 ”

 

 
 
विनोद साळवी..
 
 
“कुठंही जा वाहनचालक आणि नागरिकांचं आपलं खड्डेपुराण सुरूच आहे. इथे खड्डे तिथे खड्डे. मुंबई-गोवा महामार्गावर तर खड्डे नावाचा सिनेमा काढायचं ठरलं तर तेही शक्य आहे. अगदी सर्वांगाचा कसा खुळखुळा होतो. एसटीचा लाल डब्बा किती खोल खड्ड्यात आदळून माणसाला आपटतो, हे प्रतिक्रियांसह आवश्यकता असल्याच काहींच्या मोडलेल्या हाडांचे एक्स रेही घेता येतील. उगाच आपलं सरकार आणि सदा कार्यतत्पर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने शंखनाद करायचा. अहो, आताच आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने सिंधुदूर्गला जाऊन आले. त्यांना कुठेच काही दिसलं नाही. याच खड्ड्यांवरून आणि रस्त्याच्या दुरवस्थेवरून भाजपवासी होण्याच्या तयारीत असलेले नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी एका सरकारी अधिकार्याचच्या अंगावर चिखलगाळाने भरलेली बादली ओतली होती. आपण किती आक्रमक लोकप्रतिनिधी आहोत, हे दाखवण्यासाठी. आता मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला उभे राहताना त्यांना कुठेच खड्डे अथवा खराब रस्ते दिसले नाहीत. असो कोकण, नाशिक, मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि सर्वदूर कुठेही रस्त्यांवर खड्डे नाहीत. चंद्रावर असला तर.. माहित नाही.”
 
 
“मुख्यमंत्री नाशिक दौर्यानसाठी निघताच आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौराही एक दिवसांवर असताना नाशकात नावालाही खड्डा दिसू द्यायचा नाही, असा पणच महापालिकेने केला. तरीही आपलं नुसत खड्डे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, याचं उत्तर आणि सरकार, महापालिका, नगरपालिकांची कार्यतत्परता पाहून लागलीच यावं. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना पालघर जिल्ह्यांत वसई, विरार, डहाणूचा दौरा करत असताना फक्त गुळगुळीत रस्ते दिसले. खड्ड्याचं नामोनिशाणंही नव्हतं. खड्ड्यांत गेलेला पालघर-मनोर रस्ता अवघ्या १२ तासांत बुजवण्याची तत्परता फक्त व्हीआयपी, व्हीव्हीआयपी किंवा नेता आल्यावर दाखवली जाते, हे थोडकं नव्हे का, उठसुठ आपलं खड्डे प्रश्नावर सरकारला झोडपायचं. हेच आदित्य ठाण्यातही जनआशीर्वाद यात्रेसाठी आले त्यांना एसी बस आणि अलिशान गाडीतून फिरताना जराही रस्त्यावर खड्डाखुड्डा असल्याचं जाणवलं नाही. ते कल्याणला जाणार म्हणून तेथेही खड्ड्यात गेलेल्या रस्त्यावर खडी-रेती-डांबराचा मुलामा देण्यात आला. आणखी कायं हवयं?”
 
 
“सामान्य माणसांनी कितीही खड्डे दाखवले किंवा अगदी याच खड्ड्याचं श्राद्ध घालण्याचं आंदोलन केलं तरी फारसा फरक पडत नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री, एखाद्या पक्षाचा प्रमुख नेता आडवाटेला आला रे आला की खड्डाचं दिसू द्यायचा नाही. आपल्या महाराष्ट्रात खड्ड्यात पडून मृत्यू होण्याच्या छोट्या-मोठ्या दुर्घटना दरवर्षी घडत असतात. पण, आपला प्रदेश मोठा असल्याने खड्डेमय रस्त्यांसारख्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी आपलं सरकार, महापालिका, नगरपालिकांना फारसा वेळ नसावा. तरीही आपलं विचारायचं कुठून ठेवलाय महाराष्ट्र माझा, पाऊसही असा पडतो की वर्षानुवर्षे मजबूत आणि टिकाऊ बनवलेले रस्तेही उखडून पडतात. यात कंत्राट आणि प्रशासनाचा दोष तो काय, जुलै २०१८मध्ये कल्याण शहरात पाच नागरिकांचा खड्डेबळी गेला. भ्रष्टाचारापासून कोसो दूर असलेली कल्याण-डोंबिवली महापालिका आपल्या बजेटमध्ये फक्त खड्डेदुरस्तीसाठी ९ कोटींची तरतूद करते. पण, २०१८मध्ये त्यांना कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यावर फारसे खड्डे न दिसल्याने अवघा १ कोटीचा निधी खर्च केला. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश या चार राज्यांपुरता विचार केल्यास दहशतवादी हल्ल्यांपेक्षा किंवा सीमेवर धारातीर्थी पडलेल्या सैनिकांपेक्षा नागरिकांचे बळी गेले आहेत. ते फक्त खराब आणि खड्ड्यांत गेलेल्या रस्त्यांमुळे.”
 
 

 
 
 
“वर्ष २०१७च्या आकडेवारीवर नजर टाकता ३५९७ जणांचा बळी हा खराब रस्त्यांनी गेल्याचे सप्रमाण आकडेवारी सांगते. त्यात महाराष्ट्रातील ७२६ बळींचा समावेश आहे. २०१६ मध्येही उत्तर प्रदेश ७१४ मृत्यूच्या खालोखाल दुसऱ्या स्थानावर महाराष्ट्र होता. एकूण खराब रस्ते बळींची संख्या ३२९ होती. ११ ऑगस्ट २०१९ रोजी कल्याण पत्री पुलाचा रस्ता खड्ड्यात गेल्याने अरूण महाजन या ५५ वर्षीय नागरिकाचा अपघाती मृत्यू झाला तर विलास रेडकर हे ६० वर्षीय नागरिक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर कल्याणमधील ऑटोरिक्षा युनियन आणि काही राजकीय संघटनांनी या मार्गावर रस्ते दुरूस्तीसाठी तीव्र आंदोलन केले. परंतु, आंदोलने व वृत्तवाहिन्यांसमोर खड्डेप्रश्नावर नागरिकांनी आकांडतांडव केले तरी त्याची दखल नाहीच. पण, तुमच्या भागात पंतप्रधान, मुख्यमंत्री, कुणी बडा नेता येणार असेल तर आपोआप खड्ड्यांच्या रांगोळीवर आपोआप पडदा पडावा. जेणेकरून साहेबांना खड्ड्यांमुळे कुठे धक्काही बसू नये, हानी पोहोचू नये. आता तर आदित्य ठाकरे कल्याण-डोंबिवलीत जाणार असल्याचे कळताच प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी खराब रस्ते नीटनेटके करण्यासाठी तत्परतेने बाहेर पडले. अगदी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना खड्ड्याखुड्यांचा त्रास होता कामा नये, ही कार्यतत्परताच खड्डे आहेत तरी कुठे? असा उलट सवाल करून आपली पंचाईत करते.”

Continue reading

‘जीनोम सिक्वेन्सिंग’मुळेच रत्नागिरीतला हापूस पोहोचला सातासमुद्रापार!

जगप्रसिद्ध जीनोम शास्त्रज्ञ जे. क्रेग वेंटर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ जागतिक विज्ञान क्षेत्राचीच हानी झाली नाही, तर कोकणच्या आणि पर्यायाने भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला 'डिजिटल' ताकद देणारा एक आधारवड हरपला आहे. वेंटर यांनी विकसित केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग...

डिजिटल लॉकर सुविधा असलेली ॲक्सिस बँकेची पहिली शाखा कार्यरत

भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने नवी दिल्लीतल्या कॅपिटल ग्रीन, डीएलएफ मिडटाउन प्लाझा येथे डिजिटल लॉकर सेवांवर लक्षकेंद्रित करणारी आपली पहिली शाखा नुकतीच सुरू केली. प्रगत स्वयंचलित प्रणाली (ऑटोमेशन), उत्कृष्ट सुरक्षाव्यवस्था आणि अत्याधुनिक लॉकर सेवांच्या...

मिसिंग लिंकवर सेल्फी काढाल तर पावती फाटेल मोठ्या दंडाची!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे म्हणजेच यशवंतराव चव्हाण द्रूतगती मार्गावरील मिसिंग लिंकवर प्रवासादरम्यान सेल्फी, फोटो घेण्यासाठी वाहनचालक केबल स्टेड ब्रिज व बोगद्याजवळ वाहने थांबवत असल्याचे एमएसआरडीसी प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. द्रूतगती मार्गावर वाहने थांबवण्यास परवानगी नसून अशाप्रकारे वाहन थांबवणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या दंडाला सामोरे जावे...
Skip to content