Friday, October 18, 2024
HomeArchiveऊर्जा बचत करणारे...

ऊर्जा बचत करणारे ईसीएमटी इन्व्हर्टर एअर कुलर्स

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेड या २.४ अब्ज डॉलर्सच्या सीके बिर्ला ग्रूपचा भाग असलेल्या कंपनीने ईसीएमटी (इलेक्ट्रॉनिकली कम्युटेटेड मोटर टेक्नॉलॉजी) या ऊर्जा बचत करणाऱ्या इन्वहर्टर एअर कुलर्सची नवी रेंज सादर केली आहे. यामुळे विजेचा वापर आणि वीजबिलात ५० टक्क्यांपर्यंतची बचत होऊ शकणार आहे. यात नवे मॉडेल्स सादर करून कंपनीने आता या क्षेत्रातील सर्वाधिक प्रकारांसह सर्वात व्यापक श्रेणीतील एअर कुलर्स उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यामुळे सर्व प्रकारच्या गरजांची पूर्तता होऊ शकेल. ओरिएंटच्या कुलर्समध्ये आयओटी समर्थित स्मार्ट एअर कुलर्स आहेत. हे कुलर्स वाय-फायवर चालतात आणि आवाजानेही नियंत्रित करता येतात. पुढील दोन वर्षांत एअर कुलर विभागात बाजारपेठेतील २५ टक्के वाटा मिळवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
 
“ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश खन्ना म्हणाले की, आमच्या संपूर्ण उत्पादन यादीतून आम्ही अशी नाविन्यपूर्ण उत्पादने देण्याचा प्रयत्न करतो जी आरोग्यदायी, सुरक्षित, ऊर्जास्नेही असतील आणि आयुष्य अधिक सोयीस्कर करतील. भारतातील ऊर्जा आणि वीजेची मागणी सातत्याने वाढते आहे आणि त्यामुळे ऊर्जेचा परिणामकारक वापर आणि संवर्धनाची नितांत गरज आहे. ऊर्जा बचत करणाऱ्या ईसीएमटी समर्थित इन्व्हर्टर एअर कुलरची आमची नवी रेंज म्हणजे या दिशेने केलेले प्रयत्न आहेत. ग्राहकांच्या गरजांचा सखोल अभ्यास करून हे ऊर्जास्नेही, ५० टक्के वीजबचत करणारे, अधिक चांगल्या दर्जाची हवा देणारे, आवाज न करणारे आणि आयओटी आणि आवाजाच्या साह्याने नियंत्रित करता येणारे कुलर्स आम्ही तयार केले आहेत. कुलर्समधील इन्व्हर्टर तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होईलच शिवाय मी साधारण अंदाजे असं सांगू शकतो की देशातील सर्व एअर कुलर्सऐवजी इन्व्हर्टर तंत्रज्ञानावर आधारित एअर कुलर्स लावले गेल्यास भारतात दरवर्षी ९२०० GWh वीज म्हणजेच वर्षाला ७३५० कोटी रूपये वाचू शकतात.”
 
“ओरिएंट इलेक्ट्रिक लिमिटेडच्या होम अप्लायन्सेसचे बिझनेस हेड सलिल कपूर म्हणाले की, देशातील एअर कुलर्सच्या विभागातील आम्ही एक सर्वाधिक वेगाने वाढणारा ब्रँड आहोत आणि भारतात प्रथमच ईसीएमटी समर्थित इन्व्हर्टर एअर कुलर्स सादर करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पारंपरिक इंडक्शन मोटर्सऐवजी इलेक्ट्रॉनिकवर चालणाऱ्या मोटर्समध्ये व्होल्टेज रेक्टिफायर्स आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सर्किट असतात. ज्यामुळे घर्षण आणि मोटरचा आवाज कमी होतो आणि परिणामी कार्यकाळ वाढतो आणि यात इंडक्शन मोटर्सच्या तुलनेत ५० टक्के कमी वीज वापरली जाते. हे एअर कुलर कमी आणि बदलत्या व्होल्टेजमध्येही चालतात आणि प्रत्येक कुलरमागे वर्षाला विजेच्या बिलात साधारण १५०० रूपयांची बचत होते.”
 

Continue reading

यंदाची विधानसभा निवडणूक बिनचेहऱ्याची!

महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि सर्वच राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरू झाली. राज्यातल्या सत्तारूढ महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. मंगळवारी होणारी ही पत्रकार परिषद देशाच्या मुख्य निवडणूक...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात...

प्रेम, नुकसान आणि उपचार म्हणजेच जिंदगीनामा!

जिंदगीनामा, सोनी लिव्हवरील सहा भागांचा काव्यसंग्रह, शक्तिशाली कथनातून मानसिक आरोग्याच्या गुंतागुंतीचा शोध घेतो, ज्यातील प्रत्येक अद्वितीय आव्हाने हाताळते. मालिका सहानुभूती वाढवण्याचा आणि अनेकदा न बोललेल्या विषयांबद्दल संभाषण वाढवण्याचा प्रयत्न करते. प्रिया बापटसाठी, हा प्रकल्प फक्त दुसऱ्या भूमिकेपेक्षा अधिक होता–...
Skip to content