Details
उशीर झाला.. बाद!
01-Jul-2019
”
वैभव मोहन पाटील
[email protected]
रविवारी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उमेदवारांना काही मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेला बसू न देण्याचा घडलेला प्रकार बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. राज्यातील लाखो बेरोजगार पदवीधरांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी एमपीएससी परीक्षेचा मोठा आधार असतो. त्यामुळेच काही मोजक्या जागांसाठी लाखो बेरोजगार अर्ज करतात. या बेरोजगारांकडून एमपीएससीकडून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत परीक्षा फी म्हणून दर परीक्षेला उकळली जाते. परीक्षेची वेळ दहाची असताना त्यांना साडेआठ वाजताच परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात येतात.
सुरक्षा व तपासणीच्या कारणास्तव लवकर बोलावण्याचे प्रयोजन असल्याचे सांगण्यात येत असले तरी ह्या बेरोजगार तरुणांची काटेकोर तपासणी करायला ते काही गुन्हेगार नक्कीच नाहीत. त्यात दुरून येणाऱ्या, वाहतूककोंडी व इतर कारणांमुळे काही मिनिटे उशीर झालेल्या उमेदवारांना प्रवेश नाकारला जात असेल तर ती बेरोजगारांच्या दुर्दैवात भर आहे असेच म्हणावे लागेल. दहा वाजताची परीक्षा असताना साडेनऊच्या ठोक्याला परीक्षा केंद्रात उमेदवारांचा प्रवेश बंद करण्यात येतो. आधीच बैठक क्रमांकाच्या घोळावरून या परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या असतानाच परीक्षा देण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या बेरोजगार उमेदवारांना दोन तीन मिनिटे उशीर झाल्याने परीक्षेलाच बसू दिले जात नसेल तर सरकारने यात हस्तक्षेप करून धोरण बदलण्याची गरज आहे जेणेकरून सर्व उमेदवारांना स्पर्धा परीक्षांत सहभाग घेण्याची संधी मिळून न्याय मिळेल.”
“वैभव मोहन पाटील